मराठी शाळा

Submitted by झिप्रा on 24 July, 2014 - 07:26

नमस्कार,

माझा मुलगा आत्ता २ वर्षांचा आहे. पुढील वर्षी त्याला शाळेत घालायचे आहे. मला कोथरुड, बावधन किंवा चिंचवड परिसरामधील चांगल्या मराठी शाळा सुचवाल का? फक्त अभ्यास केंद्री नसुन सर्वांगीण विकासासाठी परिपुर्ण शाळा आहेत का? द्यान प्रबोधिनी आणि अक्शर नन्दन या दोन शाळा कळल्या आहेत. त्याशिवाय अजुन कुठली शाळा माहित असल्यास कळवावे.

धन्यवाद

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या दोन्ही मुली अक्षर्नंदन मधे आहेत.आपण म्हणता त्याप्रमाणे सर्वांगीण विकास साधण्यासाठी अतिशय उत्तम शाळा आहे. तिथले दुकान जत्रा,स्वयंअध्ययन, शाळेत मुक्काम्,स्वयंपाक कृती,सुतारकामा सारखे अनेक उपक्रम बघता आणि मुलांचा शाळेत जाण्याचा उत्साह बघून खूप छान वाटते.आणि बर्‍याचदा मनात येते, अरे आपल्या वेळेस का नव्हती ही शाळा? आपल्या मुलासाठी जरूर विचार करा.

शाळेत प्रवेशासाठी काही अटी असतात का त्यांच्या? कारण ४० मुलांनाच प्रवेश देतात ना तिथे दर वर्षी?
शाळेच्या बस आहेत का, जाण्यायेण्यासाठी?

शाळेच्या बस नाहीयेत.कारण एका वर्गात ४० च मुले व एकेका इयत्तेचा एकच वर्ग. त्यामुळे छोटा गट ते दहावी अशी सर्व मिळून ४८०-५०० मुलेच आहेत शाळेत... पण खूप लांबून मुले येतात.अगदी धनकवडी ते सांगवी पासून.शाळेत फोन करून बाकी माहिती विचारू शकाल . शाळेचा फोन नं २५६३२२२४ आहे. शाळेची वेळ ९.३५ ते ३.४५ आहे.

चांगली मराठी शाळा आणि फक्त चाळीसच मुले एका बॅचला .. खट्टू वाटले जरासे. Sad
सिमन्तिनी आपण लकीच म्हणायला हवे मग. Happy

मुंबईमध्ये आहेत का चांगल्या मराठी शाळा ?
आजच्या तारखेला हा, दहापंधरा वर्षांपूर्वीची परिस्थिती नको.

धन्यवाद माहितीबद्दल Happy
शाळेलाप्रत्यक्ष भेट देउन आलो. आत्ता फार माहिती नाही मिळाली. ३.५ वर्शा आधी प्रवेश देत नाहित म्हणाले आहेत. त्यामुळे तेव्हाच बघु आता.

असामि, लगे हातो मुलाला मराठी शाळेतच का घालताय हे पण लिहुन टाका ना.

(त्याचे काय आहे कि मला इतराम्ची मुलांना शाळेत घालतानाची निर्णयप्रक्रिया (थॉट प्रोसेस म्हणा) जाणुन घेण्यात खुप दिलचस्पी आहे.) यासाठी वेगळा धागा काढायचा विचार होता पण याच विषयाचे बरेच धागे झालेत Happy

मलाही माझ्या मुलीला मराठी माध्यमाच्या शाळेत घालायची इच्छा आहे. आम्ही सध्या अमेरिकेत आहोत. मुलगी ४ वर्षाची आहे. ती पहिलीत जायच्या वेळेस पुण्याला परत जायचा विचार आहे. तिला मराठी मुळाक्षर आणि जोडाक्षर नसलेले शब्द वाचता येतात.
ज्यांची मुलं सध्या मराठी माध्यमात शिकत आहेत अश्या पालकांचे विचार वाचायला आवडतील. मुलीला मराठी माध्यमात घालायचं आहे हे वाक्य आमच्या फ्रेंड-सर्कल मधे म्हटलं की, बहुतेक लोक आम्हाला वेड्यात काढतात. अमेरिकेत आणि पुण्यात असाच अनुभव येतो. त्यामुळे खरच मराठी शाळांची परिस्थिती काय आहे हे जाणून घ्यायला आवडेल.

इंग्रजी माध्यमातल्या मुलांना मॅनर्स प्रचंड असतात.ते एटिकेट्स पाळतात.
मराठी माध्यमात मात्र अस्सल संस्कार शिकवले जातात.पण इंग्रजी माध्यमासारखे ते युनिफॉर्म घडतात असे दिसून आलेले नाही.कारण मराठी शाळांमधले वातावरण फारच ढिसाळ असते.आता इकडे काही मराठी माध्यमाच्या शाळा आहेत्,त्यात एकेकच तुकडी शिल्लक आहे.जिथे पूर्वी चार तुकड्या असायच्या.जी तुकडी-वर्ग आहे तोही सेमी-इंग्लीश अभ्यासक्रम शिकवतो.अशा तुकड्या जिवंत आहेत कारण्,इंग्रजी शाळांची कमी पडलेली असते म्हणून किंवा ज्यांना त्या शाळांही फी परवडत नाही म्हणून.फार कमी लोक खरेच मराठीच माध्यम हवे म्हणून मुलांचा प्रवेश घेतात.

पण माझं वैयक्तीक मत म्हणाल तर मराठी माध्यमात शिकलेल्या विद्यार्थ्यांची काँपीटन्सी जास्त असते.त्यांची सहनशीलता,संयम कुठल्याही वातावरणात स्वतःला जुळवून घेण्याची क्षमता अफलातून असते.म.मा चा विद्यार्थी टेक्नीकल किंवा फॉर्मल चांगले बोलू शकतोच शिवाय आता सेमीइंग्लिश चा पर्याय त्यांच्यासमोर आहे.पालक इंग्रजी चांगले जाणत असतील तर आणाखीच सोपे झाले काम.

बाकी इंग्रजी माध्यमात शिकावे असे वाटणे का,हे काही कळले नाही बॉ?त्याची दोन-एक चांगली कारणं जाणून घ्यायला आवडेल.नुसते इंग्रजी फाडफाड बोलता येणे ही काही 'नीड' असू शकते का?आम्ही घरी मराठी शिकवतोच की हा युक्तीवाद,अपुरा म्हणावा लागेल.कारण्,इंग्रजी माध्यमाबद्दल तिटकारा नसला तरी त्यातली मुलं काहीशी उद्धट असतात असा अनुभव आहे.

विदा - अगदी थोडक्यात मुद्देसूद प्रतिसाद. धन्यवाद Happy

सोहा - आम्ही हा प्रयोग केलेला आहे, अगदी असाच. मुलगी ४ वर्षांची झाल्यावर परदेश सोडून देशात परत येऊन मराठी माध्यमाच्या शाळेत घालणे. खुप नावे ठेवली लोकांनी सुरूवातीला, पण आता खुप कौतुक आहे सर्वांना मुलांचे. Happy

महेश- तुमचे अनुभव जाणून घ्यायला आवडेल. आम्ही अक्षरनंदन, ज्ञानप्रबोधिनी, बालशिक्षण ह्या सारख्या नामवंत शाळांचाच विचार करत आहोत. पण लोकांचं म्हणणं पडलं की ह्या शाळांमधेसुध्द्दा शिक्षक चांगले नसतात. वर्गातली मुले आर्थिकद्रुष्ट्या कनिष्ठ मध्यमवर्गीय घरातील असतात. तुमच्या मुलीला मैत्रिणी मिळायला फार त्रास होईल. (माझ्या मुलीने फक्त श्रीमंत मुलांशीच मैत्री करावी असं आमचं मत अजिबात नाही. पण चांगल्या अभ्यासू, होतकरू मैत्रिणी मिळाव्या असं वाटतं.) ह्या बाबत तुमचा अनुभव काय आहे?
दुसरा प्रश्ण असा की, अभ्यासेतर उपक्रम मराठी माध्यमांच्या शाळात कितपत चांगले असतात? बर्याचश्या CBSE, ICSE शाळांमधे प्रोजेक्ट वर्कवर बराच भर असतो. तसं मराठी माध्यमाच्या शाळेत असतं का?
(हा लेखनाचा धागा करता येईल का? म्हणजे इथले पोस्टस वाहून जाणार नाहीत.)

सोहा, आमच्याही अशाच माफक अपेक्षा होत्या, पण पहिली २ वर्षे त्या फोल ठरल्याने नंतर शाळा बदलली.
सद्ध्याची ही शाळा खुप चांगली आहे. मी येथे सविस्तर लिहिणार नाही. तुम्ही मला संपर्कातुन तुमचा मेल आयडी कळविल्यास माहिती सांगू शकेन.

इंग्रजी माध्यमातल्या मुलांना मॅनर्स प्रचंड असतात.ते एटिकेट्स पाळतात.
मराठी माध्यमात मात्र अस्सल संस्कार शिकवले जातात.
मराठी माध्यमात शिकलेल्या विद्यार्थ्यांची काँपीटन्सी जास्त असते.
त्यांची सहनशीलता,संयम कुठल्याही वातावरणात स्वतःला जुळवून घेण्याची क्षमता अफलातून असते.
>>> ही अशी जबरद्स्त आत्मविश्वासाने अफाट आणि अचाट सरसकटीकरण करण्याची क्षमता कोणत्या माध्यमातील शिक्षणाने येते?

(त्याचे काय आहे कि मला इतराम्ची मुलांना शाळेत घालतानाची निर्णयप्रक्रिया (थॉट प्रोसेस म्हणा) जाणुन घेण्यात खुप दिलचस्पी आहे.) यासाठी वेगळा धागा काढायचा विचार होता पण याच विषयाचे बरेच धागे झालेत >>> होईनात का भरपुर धागे.
काढा हो तुम्ही धागा. आणि हो तुम्ही होमस्कुलिंग करताय ना? त्याबद्दलही लिहा की डिटेलमध्ये. होमस्कुलींग करायचं का ठरवलं? त्यात काय अडचणी आहेत. एकूण्च माहिती आणि अनुभव. याविषयावर जास्त ऐकलं नाहीये. जे काही वाचलं आहे ते बाहेरच्या देशातल्यांबद्दलच आहे.

मी येथे सविस्तर लिहिणार नाही. तुम्ही मला संपर्कातुन तुमचा मेल आयडी कळविल्यास माहिती सांगू शकेन. >>>> महेश, जमल्यास इथे लिहा की. आम्हालाही एखादा अजून सुटून गेलेला नविन मुद्दा समजेल.

अल्पना +१
होमस्कूलींगबद्दल विशेषतः भारतातल्या, समजून घ्यायला खूप आवडेल. कधी आम्ही खरोखर होमस्कूलींगबद्दल ठरवलं तर अर्थातच तुम्हाला संपर्क साधणार. Happy

धारा, लिहायला हरकत नाही, पण काही कारणांसाठी नको वाटते.

१. स्वतःची वैयक्तिक माहिती विस्तृत प्रमाणावर देणे नको वाटते
२. आमचा हा निर्णय कसा चुकीचा आहे हे सांगणारी भयानक बोचरी टीका नको वाटते.
३. काही मुद्दे असे आहेत की ते जर लिहिले तर कदाचित लोक त्याला भलत्याच वळणाने घेऊन जातील, मुळ मुद्दा लक्षात न घेता.

तरी देखील प्रयत्न करीन लिहिण्याचा लवकरच.

बाकी इंग्रजी माध्यमात शिकावे असे वाटणे का,हे काही कळले नाही बॉ? >>> नोकरीचे स्वरुप हे मुख्य कारण आहे. भारतातल्याच वेगळ्या शहरात किंवा देशाबाहेर जावे लागल्यास मुलाला आणि बाबाला वेगळे राहायला लागू नये किंवा मग मुलाचे शिक्षणाचे माध्यम बदलून त्याला कठीण परिस्थितीतून जावे लागू नये हा विचार प्रामुख्याने होता.

दुसरे कारण म्हणजे आम्ही मराठी शाळेत गेलो तेव्हा आजूबाजूचे बहुतांशी मध्यमवर्गीय आणि सुशिक्षित घरातले लोकं मुलांना मराठी माध्यमात घालत होते आणि अतिशय महत्त्वाचे म्हणजे शिक्षक चांगले होते. आता ती परिस्थिती उरलेली नाही.
तसेच मराठीच्या इतर बोलीभाषांबद्दल मला आदर आहे. पण शाळेत शिकवणार्‍या शिक्षकांची बोली भाषा कुठलीही असेल तरी त्यांना प्रमाण पुस्तकी मराठी भाषेत शिकवता आले पाहिजे ह्याबाबत मी आग्रही आहे. ही अपेक्षा पूर्ण होत नसल्याने मी ज्या नामवंत शाळेत शिकले त्याच्या मराठी माध्यमात त्या गावात राहणारे माझे समवयस्क त्यांच्या मुलांना घालू इच्छित नाहीत असे कळते.

मात्र पूर्ण मराठी/ इंग्लिश माध्यमात घालण्यापेक्षा सेमी इंग्लिशचा पर्याय मला कधीही आवडला असता. सायन्स आणि गणित इंग्लिशमधून शिकणे केव्हाही व्यवहार्य आहे.

अगो, माझी मुले ज्या मराठी माध्यमाच्या शाळेत आहेत, तिथे इंग्रजी भाषा पहिलीपासुन आहे. तसेच ५ वी पासुन गणित आणि विज्ञान इंग्रजी मधुन आहे. तसेच संगणक हा विषय देखील पहिलीपासुन आहे.

महेश, खरच जरा सविस्तर लिहाना. ओळखीतली अक्षरशः हाताच्या बोटावर मोजण्याइतकी मुले मराठी मध्यमात आहेत. तुमचे विचार वाचायला आवडतील Happy

मात्र पूर्ण मराठी/ इंग्लिश माध्यमात घालण्यापेक्षा सेमी इंग्लिशचा पर्याय मला कधीही आवडला असता. सायन्स आणि गणित इंग्लिशमधून शिकणे केव्हाही व्यवहार्य आहे. >>>>
माझी मुले अक्षरनन्दन शाळेत आहेत. तिथे सेमी इंग्लिशचा पर्याय नाही, पण शिकवताना विज्ञान-गणितातील इंग्रजी प्रतिशब्द आवर्जून सांगितले जातात तसेच परीक्षेत काही प्रश्नांची उत्तरे इंग्रजीतून लिहायची असतात. तांत्रिक शब्दसंग्रह पुरेसा असला की विज्ञान-गणित इंग्रजीतून समजणे पुढेही अवघड जात नाही.
त्याचबरोबर इंग्रजी ही एक भाषा म्हणून - प्रकल्प, शिबिरे, संभाषण या माध्यमातून -तिथे छानच शिकवली जाते. मुलांमध्ये इंग्रजीबद्दलचा न्यूनगंड रहाणार नाही हे बघितले जाते.

मैत्रिणी मिळणे हा मुद्दा मला अजूनही महत्वाचा वाटतो. केवळ शाळेतच नाही तर घराच्या जवळपास (सोसायटी मधे, गल्ली मधे वगैरे). बाकीची सगळी मुल इंग्लिश माध्यमाची असतील तर आपलं मुलं एकटं पडतं का?
माझ्या लहानपणी काहीवेळा असं झालेलं आहे. आमच्या गल्लीतली बरीचशी मुलं इंग्रजी मिडियमची होती. ती मला आणि माझ्या भावाला त्यांच्यात खेळायला घ्यायची नाहीत. पण मग आमच्या घराच्या मागे एक नविन सोसायटी झाली. त्यात बरीच मराठी मिडियमची मुलं होती. मग माझा छान ग्रुप जमला.
महेश- तुम्हाला ईमेल आयडी कळवते.

बाकीची सगळी मुल इंग्लिश माध्यमाची असतील तर आपलं मुलं एकटं पडतं का?>>>>
माझ्या मुलांच्या बाबतीत नाही असा अनुभव आला. आपण मराठी माध्यामात शिकतो ही कमीपणाची गोष्ट नसून अभिमानाची गोष्ट आहे हे त्यांना (आणि आपल्यालाही) पटलेले असले पाहिजे.

माझ्या मुलांच्या बाबतीत नाही असा अनुभव आला. आपण मराठी माध्यामात शिकतो ही कमीपणाची गोष्ट नसून अभिमानाची गोष्ट आहे हे त्यांना (आणि आपल्यालाही) पटलेले असले पाहिजे. =>> अगदी बरोबर

अतीशय सुंदर चर्चा. महेश तुम्ही कृपया कोणतीही भीडभाड न बाळगता इथेच लिहाच.
मतमतांतरे सगळीकडे असणारच. पण कृपया इथे वाचायला जास्त आवडेल.

माझा पर्याय सेमीला आहे.अगदी सुवर्णमध्य.शिकायला सोपे जाते.
एटीकेट्स्,भाषेची अडचण,मराठीची शिक्षक गुणवत्ता या गोष्टी कितीही खर्‍या असल्या तरी,एका जागी स्थिर असणार्‍या लोकांनी मराठी माध्यम सोडू नये अशी कळकळीची विनंती करावीशी वाटते.
डिस्कूलिंगऐवजी शाळा,वेगळ्या प्रकारे शिक्षण आणि घरी शिकवणी अशा एकपेक्षा अधिक पर्यायांचा विचार केला जाणे आवश्यक आहे.पालक तेवढे शहाणे झाले आहेत.तेव्हा वास्तव्,प्रयोग आणि उस्फूर्त या सगळ्याचा विचार एकत्रित शिक्षणात केला जावा.

शाळेत शिकवणार्‍या शिक्षकांची बोली भाषा कुठलीही असेल तरी त्यांना प्रमाण पुस्तकी मराठी भाषेत शिकवता आले पाहिजे ह्याबाबत मी आग्रही आहे. >> ह्या बद्दल मला अशी शंका आहे की इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधले शिक्षक प्रमाण इंग्रजी शिकवतात का? त्यांचे इंग्रजी उच्चार नेहमीच योग्य असतात का? (योग्य इंग्रजी उच्चार कोणते? हा वेगळाच मुद्दा आहे. देश बदलला की इंग्रजी भाषेचा अ‍ॅक्सेंट बदलतो. त्यामुळे भारतात शिकलेल्या प्रमाणित इंग्रजीचा इतर देशात उपयोग होईलच ह्याची खात्री नाही.)

हा धागा बघितलाच गेला नव्हता.

माझी दोन्ही मुले मराठी माध्यमाच्या शाळेत आहेत.

पुण्यात डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या लोकमान्य टिळकांने स्थापन केलेल्या 'न्यु इंग्लिश स्कूल' नावाच्या मराठी माध्यमाच्या शाळासमुहातील माधव सदाशिव गोळवळकर विद्यालय नावाच्या शाळेत ती जातात. सध्या पुण्यात असलेल्या मराठी माध्यमाच्या ज्या शाळा आहेत त्यापैकी एक उत्तम शाळा आहे.

माझ्या माहितीप्रमाणे पहिल्यांदा 'न्यु इंग्लिश स्कूल' साठी प्रार्थमिक शाळा म्हणून ही चालू केली गेली. पण त्यावेळी आपले शासन मराठी शाळांना मान्यता देत नसल्या कारणाने ही शाळा विना अनुदान तत्वावर चालवत होते, त्याचे फायदे जाणवल्यावर हीच शाळा पाचवीच्या पुढच्या वर्गांची देखिल करण्यात आली. ( 'न्यु इंग्लिश स्कूल' च्या बरोबरीने) खरेतर नवीन म्हणता म्हणता ह्या शाळेला देखिल २५ पेक्षा जास्त वर्षे झाली आहेत.

इथे पाचवीपासून सेमी इंग्लिश आहे. शिक्षणेतर उपक्रमांमधे वयानुरुप योगासने, ज्युदो, शास्त्रीय संगीत, स्पोकन इंग्लिश, संंस्कृत संभाषण असे उपक्रम काही शाळेच्याच वेळेत तर काही शाळेव्यतिरिक्त वेळात राबवले जातात.

१ली ते ७वी पर्यंतच्या मुलांना एक वर्षी स्नेह संमेलन तर एक वर्षी क्रीडा संमेलन असते. क्रीडा संमेलनामधे लेझिम, पिरॅमिड्स, सुर्यनमस्कार व योगासने प्रात्यक्षिके ई. प्रकारांचा समावेश असतो.

१५ ऑगस्ट २६ जानेवारी ह्या दिवशी संचलन, दही हंडी, पालखी, असं काही ना काही चालूच असते.

वैज्ञानिक / इतर विषयांवरही प्रकल्प करायला देतात आणि मग त्यांचे प्रदर्शन भरवले जाते. जे बघायला पालकांनाही बोलावले जाते.

शाळा सकाळी सव्वासात वाजता भरते पण मुले शाळेत जायला नेहेमीच खुष असतात. जे मला खूप आवडते.

मराठीतून्/मातृभाषेतून शिकणे कुठल्याही मुलासाठी नेहमी सोपे असते.कुठल्याही विषयाचे आकलनही मातृभाषेतून सहज असते.इंग्रजी एक भाषा म्हणून जरूर शिकावी.पण बाकी विषय उदा... इतिहास्,भूगोल हे का बरे इंग्रजीतून? आपल्या मातीतला इतिहास शिकण्यासाठी मातृभाषाच हवी ना! .नाहीतर शिवाजीमहाराजांना ,'राजे' असे न म्हणता मावळे 'सर' असे संबोधतात..

माझी मुले ज्या मराठी माध्यमाच्या शाळेत आहेत, तिथे इंग्रजी भाषा पहिलीपासुन आहे. तसेच ५ वी पासुन गणित आणि विज्ञान इंग्रजी मधुन आहे. तसेच संगणक हा विषय देखील पहिलीपासुन आहे. >>> कुठल्या शाळेत जातात तुमची मुलं ?

सेमीइंग्लिश माध्यमात शिकणार्‍या मुलांबद्दल वाचायला नेहेमीच छान वाटतं. आदर्श पर्याय वाटत आलाय तो कायमच ! मी स्वतःही तशीच शिकले पण आम्हाला आठवीपासून इंग्लिशमध्ये होतं सायन्स, गणित. जितक्या लवकरपासून सुरु होईल तितकं चांगलं खरंतर.
प्रामाणिकपणे सांगायचं तर मुलाच्या विकासापेक्षा आपल्या आणि आजीआजोबांच्या पिढीशी कनेक्ट करणारा, 'बेस्ट ऑफ बोथ द वर्ल्ड्स' असा हा पर्याय वाटतो हे कारण आहे. ( विकास कुठल्याही चांगल्या, मोकळे वातावरण असलेल्या शाळेत आणि घरात होतोच. ) Happy

अवांतर : आम्ही आमच्या मुलाला पूर्ण विचारांती इंग्लिश मिडियममध्ये घातले आहे. आता ते बदलावे असे वाटत नाही. मी जसे मराठी बोलते, वाचते तसे तो बोलणार,वाचणार नाही हे स्वीकारले आहे. ह्यावर्षीपासून त्याला शाळेत मराठी आणि हिंदी अक्षरओळख सुरु झालीय. अगदी उच्च दर्जाचं मराठी नाही तरी काही प्रमाणात मराठी भाषेशी त्याची नाळ जुळलेली राहावी असे प्रयत्न करेन.
बाकी ह्या धाग्यावर वाचनमात्र Happy

माफ करा इकडे जरा उशिराने डोकावलो.
मला जे लिहायचे होते त्यातली शाळेची माहिती हर्पेन यांनी आधीच लिहिली आहे. Happy
आमचे अनुभव आणि अन्य माहिती लवकरच लिहायचा प्रयत्न करतो.

सर्वांनी केलेल्या चर्चेने बरीच आवश्यक माहिती मिळाली.
धन्यवाद Happy

@महेश, हर्पेन,

माधव सदाशिव गोळवळकर विद्यालय, याचे ठिकाण काय आहे? आणि प्रवेशासाठी काही अटी असतात का? कोणत्या वर्षी प्रवेश दिला जातो?

माधव सदाशिव गोळवळकर विद्यालय, याचे ठिकाण काय आहे?>>> न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड.

प्रवेशासाठी काही अटी त्यांच्या फॉर्मवरती तरी सापडल्या नाहीत.. बाकी माहिती शाळेतच मिळेल. त्यांचे माहिती पत्रक घेतलेत की त्या बरोबर शाळेच्या संदर्भातील एक सीडीही देतात. तिच्यात बर्‍याच गोष्टी आहेत.

एकच आहे अजून ह्यांना १०वी पर्यंत मान्यता नाही.. त्यामुळे १० चे विद्यार्थी न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड तर विद्यार्थीनी अहिल्यादेवी हायस्कूल इथून परिक्षेस बसविले जातात. ही माहिती गेल्या वर्षी पर्यंतची आहे.. यंदा काही बदल असतील तर बघावे लागेल.

ज्ञान प्रबोधिनी सध्या पुढे चालू राहिल की नाही अशा परिस्थितीत आहे.. हे दुर्दैव आहे पण असे आहे.. शाळा पाचवी पासून पुढे अशीच आहे. आणि पाचवीत अ‍ॅडमिशन घेताना परिक्षा घेतली जाते. पण नुकतेच त्यास विरोध केला गेला आहे.. आणि त्यातून पुढे काही तोडगा निघालेला नाही...

ही शाळा चालू रहायला पाहिजे खरतरं. मुलांच्या विकासासाठी खूप कष्ट घेतात.. इथे शिकलेले किती तरी मित्र आहेत त्यांच्याकडे बघून त्याचा प्रत्यय येतो..

गोळवलकरची दहावीची पहिली बॅच बाहेर पडली देखिल मागच्या वर्षी...

प्रवेशासाठी वयाची अट अशी असते की पहिलीत जाताना पाल्याचे वय पाच पुर्ण असले पाहिजे. बाकी अट वगैरे काही नसते.

ज्ञान प्रबोधिनीची मुलं अगदी झळ्कतात!! इम्प्रेसिव्ह पर्सनालिटी इथे शिकलेल्या मुलांची असं माझे निरिक्षण आहे.
अक्षरनंदन देखील उत्तम शाळा आहे. रमामाधववाला आलोक तिथे शिकला आहे. अगदी वेगळीच शाळा आहे. ५वी पर्यंत बहुधा परिक्षाच नसतात.. नंतर हळूहळू परिक्षा अ‍ॅड होतात..पण सर्वांगीण विकास होतो .. मुलं केवळ परिक्षार्थी/ मार्कांपुरतीच पाहणारी होत नाहीत..

ज्ञान प्रबोधिनी सारख्या बऱ्याच शाळा इंग्लंड मध्ये आहे. ग्रामर स्कूल्स म्हणतात. प्रचंड तयारी करतात लोक. शाळा प्रचंड मेहेनत घेते मुलांवर अगदी कला, क्रीडा वगैरे बाबतीतपण खूप स्कोप राहतो. पण आपल्याकडे दर्जा टिकवणे म्हणजे कठीणच होत चालले आहे. सरकार दर काही वर्षांनी इतके प्रयोग करते आहे आणि मग सगळे बिचारे भरडून निघता आहेत.

ज्ञानप्रबोधिनीवर च्या प्रवेश प्रक्रियेबाबत केस चालू होती, त्याचे काय झाले ? कोणाला कल्पना आहे का ?
प्रवेश परिक्षा असू नये असा विषय होता.

मा.स.गोळवलकर शाळेबद्दल माझ्यापेक्षा हर्पेनच जास्त सांगू शकेल Happy

बाकी निवड का केली आणि कसे घडले याबाबत लिहिणे बाकी आहे ते लिहिन लवकरच.

आनंदक्षण अशी एक नवी शाळा पुण्यात सुरु झाली आहे असे ऐकले आहे. एका परिचितांच्या दोघी मुली तिथे आहेत.

चांगल्या मराठी शाळा येताहेत आणि शिकले सवरलेले लोक त्यात आपल्या मुलांना घालताहेत हे पाहुन मला आता आनंदाने रडु यायचेच बाकी आहे. मी तर मराठी शाळा आणि माध्यम दोन्ही आता बंदच पडणार असे धरुन चाललेले. माझ्या लेकीला मी मराठीत शिकवले पण नातवंडांच्या नशिबी ते सुख नसणार असे मला हल्लीहल्ली पर्यंत वाटत होते.. नशीब म्हणायचे.

मा.स.गोळवलकर शाळेबद्दल माझ्यापेक्षा हर्पेनच जास्त सांगू शकेल असेच काही नाही महेश,

'गोळवलकरची दहावीची पहिली बॅच बाहेर पडली देखिल मागच्या वर्षी...' असे मी वर लिहिले होते ते बरोबर नाही.

गोळवळकर गुरुजी प्रशालेला मागच्या वर्षी, सरकारी मान्यता मिळाली. त्यामुळे यावर्षी बाहेर पडणारी दहावीची बॅच ही त्यांची स्वतःची पहिली बॅच असेल.

ज्ञान प्रबोधिनी च्या केस विषयी: २०१३-१४ या आर्थिक व शैक्षणिक वर्षात ज्ञान प्रबोधिनी प्रशालेच्या मूळ संकल्पनेलाच शिक्षण हक्क कायद्याच्या काटेकोर अंमलबजावणीचा फटका बसला. या कायद्यानुसार शाळेमध्ये कोणत्याही प्रकारची चाचणी घेऊन प्रवेश देण्याला बंदी आहे. ज्ञान प्रबोधिनीचे म्हणणे असे होते, की ही बंदी फक्त पहिलीच्या प्रवेशपरीक्षेसाठी आहे. प्रबोधिनी पाचवीसाठी प्रवेशपरीक्षा घेत असल्यामुळे प्रबोधिनीला ही बंदी लागू नाही. परंतु शिक्षणाधिकाऱ्यांनी कायद्याचा अर्थ लावताना १ ली ते ८ वी मधील कोणत्याही इयत्तेच्या प्रवेशासाठी चाचणी घ्यायला बंदी आहे, असा अर्थ लावला. बुद्धिमत्ता चाचणी घेऊन विद्यार्थी निवडल्याशिवाय ज्ञान प्रबोधिनी प्रशालेच्या अस्तित्वालाच काही अर्थ नाही. त्यामुळे प्रबोधिनीने न्यायालयाचे दार ठोठावले. वर्षभरात हायकोर्टात व सुप्रीम कोर्टात किमान पाच–पाच वेळेला जावे लागले. प्रवासखर्च व वकिलांच्या शुल्काचा खर्चही बराच झाला. तो सगळा खर्च आपण प्रबोधिनीच्या चालू अर्थओघातून (Current Cash-flow) केला. अखेर २०१३-१४ चे प्रवेश नियमित झाले व २०१४-१५ वर्षासाठी प्रवेश-चाचण्या घ्यायला परवानगी मिळाली. परंतु हा तात्पुरता दिलासा आहे. सुप्रीम कोर्टाचा अंतिम निर्णय अजून व्हायचा आहे.
ही केस आता सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे.
(आपल्याकडे चालणाऱ्या शाळा कॉलेज ई. च्या प्रवेश प्रक्रियेच्या घोळामध्ये विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागू नये म्हणून सर्वोच्च न्यायालयाने जोवर निर्णय लगत नाही तोवर जे आहे तसे चालू राहील असे एक सार्वत्रिक धोरण जाहीर केले आहे.)

अवांतर: ज्ञान प्रबोधिनी ही विना अनुदान चालणारी शाळा आहे. ह्या अचानक येऊन पडलेल्या खर्चाने शाळेचे/ संस्थेचे पैशाचे अंदाजपत्रक कोलमडून गेले! अर्थात सर्व हितचिंतकांनी/माजी विद्यार्थ्यांनी आपापल्यापरीने आर्थिक मदत केली/करत आहेत. परंतु कायदेशीर लढाई अजून बाकी आहे. जर आपल्यापैकी कोणीही संस्थेला आर्थिक मदत करू इच्छित असेल तर संपर्कातून इमेल करा.

मजकूर संपादीतः
अ‍ॅडमीन

संगोपन विषयातले सगळे धागे बघताना हा सापडला.

वर उल्लेख केलेल्या शाळांपैकी एका मराठी शाळेत माझी मुलगी आहे. आम्ही युरोपात असतानाच बराच विदा अभ्यासून, शिक्षण क्षेत्रातल्या लोकांशी संपर्कात राहून सर्व शंकांचे निराकरण झाल्यावर मराठी माध्यमाचा निर्णय घेतला.
आता मुलगी २ रीत आहे. आनंदात शिकते आहे. पेटी वाजवते, चित्र काढते, पेपर स्टेपल करून स्वरचित गोष्टी लिहिते आणि त्यांना अनुरूप चित्रेही काढते.
सकाळी ७ वाजता शाळेची प्रार्थना असते. ६:५५ ला शाळेत पोहोचावे लागते. अजूनतरी एकदाही उशीर झाला नाही.
या वयात मुलं काय शिकतायत यापेक्षा त्यांना नवं शिकायची भूक लागतेय ना हे महत्त्वाचं. ते आमच्या शाळेत नक्कीच होतंय. Happy

Pages