भोंदू आणि बाबा

Submitted by harish_dangat on 30 December, 2008 - 22:02

गावोगावी झाले | भोंदू आणि बाबा |
तयांचा दबाबा | अज्ञानांसी ||

बाहेरी दिसती | जसे महाथोर |
अंतरात चोर | दडलेला ||

कोणा देई गंडा | कोणा देई पुडी |
दीन न बापुडी | फसती यांना ||

कोणा देई धूप | कोणासी अंगारा |
शेवटी गुंगारा | लुटल्या नंतर ||

कोणा देई धागा | कोणा देई लिंबू |
हालवीती तंबू | अखेरीस ||

कोणाचे हाती हे | बांधती ताईत |
घालती खाइत | गरीबांसी ||

कोणाचीये पाठी | सांगे ग्रहदशा |
करीती दुर्दशा | भोळया लोकांची ||

कोणा सांगतात | भुताचा उतारा |
मग हा भुतारा | पैश्यापाठी ||

कोणा सांगती हे | पुर्व जन्म पाप |
मग घाली माप | खिशामध्ये ||

अशा या भोंदुंचा | नको कधी संग |
दावतात रंग | कठीन काळी ||

अशा या बाबांचा | घेउ नये वारा ||
देउ नये थारा | जवळी यांना ||

गुलमोहर: 

<<<कोणा देई गंडा | कोणा देई पुडी |
दीन न बापुडी | फसती यांना ||

कोणा देई धूप | कोणासी अंगारा |
शेवटी गुंगारा | लुटल्या नंतर ||

कोणा देई धागा | कोणा देई लिंबू |
हालवीती तंबू | अखेरीस ||

कोणाचे हाती हे | बांधती ताईत |
घालती खाइत | गरीबांसी ||

कोणाचीये पाठी | सांगे ग्रहदशा |
करीती दुर्दशा | भोळया लोकांची ||

कोणा सांगतात | भुताचा उतारा |
मग हा भुतारा | पैश्यापाठी ||

कोणा सांगती हे | पुर्व जन्म पाप |
मग घाली माप | खिशामध्ये ||...>>>

हरिष, नेहेमीप्रमाणेच सर्वच छानच आहे. पण वर दिलेल्या ओळींनी थोडी लांबल्यासारखी वाटते. त्या ओळी आवश्यक आहेत. पण ती जागा आणखीही काही लिहीण्यासाठी वापरता आली असती. उदा. बुवाबाजीचे दुष्परिणाम, फसणार्‍या लोकांची असहायता, त्याची कारणे....अर्थात हे माझे मत झाले.
पण कविता छानच जमलीय.
चु.भु.दे.घे.
सस्नेह...

विशाल.
____________________________________________

http://maagevalunpahataana.blogspot.com

भाविक भोळ्यांच प्रबोधन करणारी कविता