वाशी ग. ट. ग. २०१४

Submitted by kamini8 on 20 July, 2014 - 09:35

१९ तारखेला वाशीमध्ये नि. ग्.ट्.ग झाले. मी आधीपासुनच ओळखत होती म्हणुन माझ्या मनावर काहीही दडपन नव्हते. सर्वाना भेटायचं होतचं. सगळे आल्यावर ओळखा पाहु कामे पार पडली.

दिनेशदा आले, त्याची पिशवी पाहुनच मला ते निसरगावर किती प्रेम करत आहेत हे दिसले. त्यानी जादुचा पेठारा आणला होता. त्यातुन एक एक छान छान वस्तु बाहेर येत. मी ९०% वस्तु प्रथमच पहात होती.
दिनेशदा जादुगारासारखे एक एक छान जादु दाखवत होते. ते फार प्रेमळ आणि उत्साही होते. खुप ठीकाणी ते फिरले पण त्याच्या चेहरा फ्रेश आणि मनावर थकवा जाणवत नव्हता. ते ग्रेटच आहेत त्याना सा. दंडवत. त्याना सुख आणि छान आरोग्य जीवन मिळावे अशी देवाकडे प्राथना. त्याची पिशवी हातात घेवुन पाहावी असा मोह झाला पण तो मान साधनाला मिळाला. त्यावरची सफेद जास्वदाची फुले छान दिसत होती.
जागुचा परीवार जागुप्रमाणेच सगळ्यात मिसळणारा आहे. तिच्या दोन्ही मुली किती शांत आहेत. तिला त्रास बिलकुल देत नव्हत्या, छोटी राधा तर किती गोड . सगळे असतानाही रडली नाही तिच्याजागी दुसरी कुणी असती तर भोंगाच वाजवला असता. दिनेशदानी आणलेला खाउ तीला फार आवडला होता. दुसरी खाण्याच्या सवइ बाबत आई बाबांवर गेलेली दिसत नव्हती.
जिप्सीला लवकर जायचे नव्ह्ते पण इंद्रा थांबायला तयार नव्ह्ता इंद्राचा दरबार होताना म्हणुन इंद्राला जावेच लागले.
बिच्यारा जिप्सी त्याने खडतर प्रवास करुन इन मिन तीन साठी सफरचंद आणले होते पण इन मिन तीन ने पिशवीच आणली नव्हती त्याला तिथे विकतही पिशवी मिळाली नाही म्हणुन जिप्सीने ते सफरचंद आम्हाला वाटुन दिले. इन मिन तीन तसाच रिकामा घरी गेला. आम्हाला एकच सफरचंद दिला होता पण तो प्रत्येकाला किती जड वाटत होता. सफरचंद पेक्षा चेरी जड ना म्हणुन त्याने सफरचंद आणली होती. चेरी घरी लगेच संपली पण सफरचंद काही केल्या संपतच नव्हती त्याने म्हणुन ग ट ग ला आणली वाटायला.
जागु इंद्रा आणि इन मिन तीन साठी मासे तळुन आणनार होती ती मासे घेण्यासाठी समुद्रावर गेली होती पण तिला पाहताच मासे पाण्यात पळाले ती तरी काय करणार ?
साधना एशुला घेउन आली नव्हती कारण तिला खुप वेळा घरचा आहेर मिळतो म्हणुन असेल कदाचीत. थोडी गंमत आली असती. त्या दोघी छान संभाषण करत असतात नेहमी.
साधना म्हणाली होती येताना लाल गुलाबाचे फुल घेउन या ओळखण्यासाठी तर सामी आणि पलक परीधान करुन आल्या होत्या.
गोव्याच्या अंजली चितळे आल्या होत्या त्याच्या कविता बद्दल दिनेशदा लिहतीच.
जिप्सी आणि उजु किती तिखट खातात. तरीही ते गोड कसे ?
कांचन आणि मनीमोहर आल्या होत्या, त्याच्याशी बोलुन छान वाटले.
आम्ही छान गप्पा मारल्या. नि.ग. कमी झाल्या पण त्यासाठी राणी बागेत जाणार आहोत. दिनेशदा असतील तर बहरच येइल्. झाडे त्याना पाहुन आनंदुन जातील म्हणतील की आमचा जीवलग सखा आला आहे. त्याच्यावर फुलांचा सडा शिंपडुन देतील.

मला सगळ्यात आवडली गोष्ट म्हणजे सगळे साधे होते. कोणीही हवेत तरंगणारे नव्हते. सगळे मातीशी अतुट नातं धरुन होते. जिप्सीतर किती फेमस आहे तरीही त्याचे पाय जमिनीवर होते. त्याच्या डोक्यात इतरांसारखी हवा गेली नव्हती.
खुप लिहु शकते पण आता वेळ नाहीं. नंतर लिहीन म्हटले तर राहुनच जाइल म्हणुन कसेतरी लिहीत आहे. गोड मानुन घ्या. काही चुकले तर सांगा.
फोटो देत नाही कारण जिप्सी रागवेल आणि पुन्हा फोटो द्यायचा बंद होइल. मग नि.ग. धागा चुकल्यासारखा होइल.
जाणकार लेखक / लेखिका फोटोसहीत लेख लिहतीलच माझे आपले पालखी आधी रांगोळी.

काहि घटणा अश्या असतात की त्या कधीही विसरता येत नाही त्यातली ही एक.
DSC00842.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सफरचंद पेक्षा चेरी जड ना म्हणुन त्याने सफरचंद आणली होती. चेरी घरी लगेच संपली पण सफरचंद काही केल्या संपतच नव्हती त्याने म्हणुन ग ट ग ला आणली वाटायला.>>>>:हहगलो:

हि घ्या अजुन काही सफरचंद Proud

मस्त वाटले सगळ्याना भेटून.. साधना आणि सामी सोडून बाकी सगळ्याना पहिल्यांदाच भेटत होते. दिनेशदा तर एकदम हसरं व्यक्तिमत्व. पहिल्यांदा वाटले होते २ तास काय करायचे?? थोडावेळ जाऊन भेटून यावे. पण तिकडे गेल्यानंतर पाय निघवत नव्हता.(सिक्युरिटीच्या फेर्या आणि त्याचे एक्स्प्रेशन हा एक वेगळा चच्रेचा विषय होऊ शकतो...) Happy
घरी आल्यानंतर सुद्धा सगळी धम्माल आठवत होती. खुप रिफ्रेशिंग वाटत होते. थँक्स सगळ्यांना....

छान वृतांत लिहलाय कामिनी....

माझा हा पहीलाच गटग होता, सगळे पहिल्यांदाच भेटले पण अस वाटलच नाही की आपण पहिल्यांदा भेटत आहे. हा माबो effect.

दिनेशदा आमच्या मधे मला अगदी फॉरेनर वाटत होते.खुप प्रेमळ वाटले
खुप ठीकाणी ते फिरले पण त्याच्या चेहरा फ्रेश आणि मनावर थकवा जाणवत नव्हता. ते ग्रेटच आहेत त्याना सा. दंडवत. त्याना सुख आणि छान आरोग्य जीवन मिळावे अशी देवाकडे प्राथना.>>+++++++++खुप सारे

अळुवड्या, जिलेब्या,गोव्याचे काजू, फणसाचे चीप्स,गोरखचिंचेचे सरबत,मोहनथाळ खुप मस्त खादाडी पण झालि.

सगळ्याना भेटून खुप खुप छान वाटल. खरच निसर्ग माणस कशी नकळत जोडतो.

सिक्युरिटीच्या फेर्या आणि त्याचे एक्स्प्रेशन हा एक वेगळा चच्रेचा विषय होऊ शकतो>>>>>अगदी अगदी. स्मित>>>>>>>>>एवढं छळलतं त्याला? Proud
जिप्स्या, साधनाने सांगितलेल ऐकलस की एकटाच गेला होतास? Wink

जिप्स्या, साधनाने सांगितलेल ऐकलस की एकटाच गेला होतास?

वाट बघा तो आणतोय याची... सफरचंदासारखे तो नुस्ते फोटो दाखवणार....

वाट बघा तो आणतोय याची... सफरचंदासारखे तो नुस्ते फोटो दाखवणार....>>>>>>>>>>>>>ते पण क्वचितच. तु काजळाची डबी नेली होतीस ना? Wink Happy

अजुन तिट लावायला वेळ आहे..>>>>.....दृ.ला.न. म्हणून. तू ’तिकडे” म्हणाली होतीस ना? Proud
साधने, एक बरं आहे. आता तो इथे आपल्याला बोलणार नाही. "निसर्गाच्या गप्पा मारा" म्हणून. Lol

अरे वा, मस्त व्रुंतांत.
माझी जरा धावतीच भेट झाली पण सगळ्यांना भेटून मस्त वाटले.
दिनेशदा, जागू , साधना या सिनीअर मायबोली करांना भेटायचे होतेच. दिनेशदांना भेटणे सारखे हुकत होते. शेवटी परवा योग जमला. त्यांच्याशी खूप बोलायचे होते , पण बोलणे झालेच नाही. Happy
साधना , जागू, उजु , पलक, कामिनी , अंजली ताई, हेमा ताई, कांचन सगळ्या अगदी जुन्या मैत्रीणि असल्यासार्ख्या बोलत होत्या. सगल्ळ्यांनी भरपूर खाऊ आणला होता. उगाच जेवून गेले असे वाटले. अगदीच नाही तरी रिकामे डबे तरी घेऊन जायला हवे होते. Happy
खादाडी गटग नाही याची आठवण नितीन यांनी आल्या आल्या सर्वांना सोनचाफ्याची फुले वाटून करुन दिली. त्यांचे खरोखर खूप कौतुक वाटले.

पण त्या खादाडी मागे मुळ प्रेरणा निसर्ग च होता. जागू ने घरातल्याच अळू च्या पानांच्या वड्या आणल्या होत्या, आणि कमिनी ने घरातीलच हळदी च्या पानांच्या पाटोळ्या. हेमा ताईने गावचे फणसाचे चिप्स तर अंजली ताई ने गोव्याचे काजू.

गोरखचिंचेचे सरबत कधी पिण्यात आले? बहुतेक मी गेल्यावरच Sad

जिप्सी ने दिले ला मोगरा घरी गेल्याबरोबर कुंडीत लावला. दिनेशदां नी दिलेला तिखट खाऊ खायचा आहे आणि जागू ने दिलेल्या अळूवड्या घरी सगळ्यांना खूप आवडल्या.

तर असे हे गटग मला खूप खूप आवडले . Happy

सगळ्यांनी गप्पा मारण्यासाठी निदान दिवस भर भेटणे तरी आवश्यक आहे. राणी च्या बागेचा प्लॅन लवकरच करूया.

मस्तच झालंय गटग Happy

मी फोन करणार होते पण नॉर्मली गटग असलं की आपल्या आपल्यालाच एकमेकांशी बोलायला वेळ पुरत नाही त्यात कोणाचे फोन आले की आणखी डिस्टर्ब होतं म्हणून नाही केला Happy

पण मला अपडेट्स मात्र मिळाले हं Wink

जिप्स्या, तुझा निषेध! वविला काही येऊ नकोस. मी नसते त्याच गटगला जा Angry
भेटुच नकोस मला
दुष्ट नुसता Proud

काल वृतांत वाचुन प्रतिसाद दिला.
आज प्रतिसादाना प्रतिसाद देतेय.
सगळेच प्रतिसाद मस्त. मजा आली वाचायला.

सुंदर गटग. न भेटताच सगळ्यांना भेटल्यासारखे वाटत आहे. दिनेशदा आखाती वारी ठरवा आणी आम्हालाही जादुचा पेटारा आणा. कामिनी छान वृत्तांत.

व्वा मस्त झालेलं दिसतय गटग... कामिनी खुप छान व्रुत्तान्त...
माझा कधी योग येतोय तुम्हा सगळ्यांना आणि दिनेश दा ना भेटायचा...

मस्त खादाडी पण केलेली ना! तसही मीटींग विथ आउट इटींग तर मग मज्जाच नाही Happy

नितीन सोनचाफा Sad :- >>>> भ्या भ्या रडणारी बाहुली...

साधना , जागू, उजु , पलक, कामिनी , अंजली ताई, शोभा ताई, कांचन सगळ्या अगदी जुन्या मैत्रीणि असल्यासार्ख्या बोलत होत्या. सगल्ळ्यांनी भरपूर खाऊ आणला होता. >>>>>>>>:अओ:

साधना , जागू, उजु , पलक, कामिनी , अंजली ताई, शोभा ताई, कांचन सगळ्या अगदी जुन्या मैत्रीणि असल्यासार्ख्या बोलत होत्या. सगल्ळ्यांनी भरपूर खाऊ आणला होता. >>>>>>>> सॉरी हेमा ताईंचे चुकून शोभा ताई केले. वरती बदलते आता.

हेमा ताई च्या नावाचा शोर्ट्फॉर्म कधी 'मनी' (मनीमोहोर) असा पण केला आहे हे आठवले. Happy
सॉरी हेमा ताई.

माझ वरातीमागुन घोडं.......
१९ ला ३ ला वाशीला पोहोचायच म्हणुन लवकर लवकर काम उरकुन टायमात पोहोचायच ठरवल. पण आमच आपल नेहमीप्रमाणे साहेब तारीख देइना म्हणुन उशीर झाला. हेमाताई ठाणा-वाशी ट्रेनला ठाण्यात भेटणार होत्या पण मला लेट होत होता तर मी त्यांना पूढे जायला सांगितल (हो पण त्यांना बजावून ठेवल की जागूनी आणलेल्या अळूवड्या मला उरवा). मी ठरवलेल्या ट्रेनच्या नंतरच्या ट्रेनने निघाले पन वाशीला पहिल्यांदाच ट्रेनने जात असल्यामूळे बाकी सगळ्यांना दहादा विचारून घेतल की सेंटर वन मॉल कुठेय इस्ट की वेस्ट. पण पलक वाशीला माझ्या आधी येऊन पण माझ्यासाठी थांबुन राहीली व मग आम्ही दोघी एकत्रच गेलो.
आम्ही पोहोचेपर्यंत खाउचे डब्बे उघडून आमची वाट बघतायेत असेच वाटले.सगळ्यांशी भरपुर गप्पा आणि खादाडी चालू असतानाच तिथल्या सिक्युरीटिवाल्याने आमच्याकडे तू. क. टाकायला सुरवात केली.अगदी निघेपर्यंत तो आम्हाला कुठून आलेत काय माहित असले एक्सप्रेशन्स देत होता.
कामिनीच्या पातोळ्या आणि जागूच्या अळुवड्या दोन्ही एकदम टेस्टी होत्या.
दिनेशदांच्या पेटार्‍यातून एकएक गोष्ट बाहेर येताच सगळ्यांनाच ती बघायची घाई होत होती. दिनेशदांनी आलेल्या प्रत्येकालाच काही ना काही दिले. त्यांना माहित असलेली,बघितलेली प्रत्येक गोष्ट इतरांना सांगितल्यावरच त्या गोष्टीचा खरा आनंद मिळतो असच वाटत कारण त्यांनी अगदी मॉरिशसच्या व्हिडीओ क्लिप्सपण आम्हा प्रत्येकाला दाखवल्या.जे जे आपणांसी ठावे ते ते ईतरांनाही माहित असावे हा त्यांचा स्वभाव अगदी सहजी लक्षात येत होता. दिनेशदांकडून परत याल तेव्हा पूर्ण दिवसभराच्या पिकनिकला यायचे कबूल करून घेतले सगळ्यांनी.
साधना , जागू, सामी , पलक, कामिनी , अंजली ताई, हेमा ताई, कांचन सगळ्या अगदी जुन्या मैत्रीणि असल्यासारख्याच वाटत होते.
राधा आणि श्रावणी ह्या दोन्ही गोडूल्यांनी पण आमच्या सगळ्यांच्या गप्पांमध्ये अजिबात व्यत्यत येउ दिला नाही, त्याच श्रेय श्री. जागू ह्यांना पण जातं.
हे फक्त खादाडी गटग नसून निग गटगच राहील ह्याची काळजी नितिनने सगळ्यांना सोनचाफ्याची फुल वाटून, जिप्स्यानी मोगर्‍याच्या फांद्या वाटून आणि जागूने निशिगंध, ईंसूलिन, तोंडली अन कसली कसली रोपे वाटून घेतली.
जेन्टस बाप्ये निघून गेले तरी आम्हा लेडीज बायकांचा पाय निघत नव्हता तिथुन शेवटपर्यंत.
सिक्युरीटिवाल्याचा अंत बघायला नको म्हणून निघालो एकदाच्या आम्ही.
अंजली ताई नेक्ट टाईम तुमच्या कवितेच्या पुस्तकाच्या जास्त कॉपी घेउन या.
खरच सगळ्यांना भेटून फा$$$$$$र छान वाटले.

सर्वानी तुमचा बहुमुल्य वेळ काढुन माझा ग. ट. ग. हा लेख वाचला आणि प्रतिसाद दिलात यासाठी धन्यवाद.
तुम्ही विचारलेल्या प्रश्नांना उत्तर म्हणुन हा लेख.
जागु तुझी अळुवडी नाही विसरले. तु , जिप्सी नाहीतर कुणीतरी फोटोसकट लेख लिहतील असे वाटले. मीच सर्व लिहले तर इतर काय लिहणार. साधना लिहणार नाही हे माहीत होते कारण तिचा भोवतालचा निसर्ग भाग- २ अजुन आलेला नाही आणि घरी बंदी. तसेही जिप्सी खादाडीवर जास्त लिहतो. तुझ्या वड्या छानच होत्या. मी पण अळुवडीच आणणार होती. तु घेवुन येणार होतीस म्हणुन मी मेनु चेंज केला.
तसेही मला जागु-अळुवडी , साधना-जिलेबी, अंजली-काजु, जिप्सी-मिठाई, मनीमोहर्-फणसाचे गरे, नितीन्-सुगंध, दिनेशदा-जादु एवढेच माझ्या लक्षात होते. इतर वस्तु कोणी कुठली आणली हे मी पाहीलेच नाही म्हणुन नाही लिहले. साधनाची जिलेबी मी खाल्लीच नाही नंतर खाईन म्हटले आणि राहुनच गेले. घरी गेल्यावर आठवले. माझे लक्ष खाण्यावर कमी आणि गप्पांवर जास्त होते. चहुबाजुने गप्पा कानावर पडत होत्या, कुठे कुठे लक्ष ठेवु असे झाले होते. वेळ कसा निघुन गेला हे कळलेच नाही. घरी जाण्यासाठी सर्व ऊठले. मी घड्याळ पाहीलेच नाही. मला वाटले की ५ वाजेपर्यतची वेळ असताना ४.३० वा. निघाले सर्व. शनीवार आहे म्हणुन नेहमीप्रमाणे लवकर घरी पळत असतील.
जिप्सी तु दिलेले सफरचंद फारच जड होते. पलकला तर तिची बॅग उचलताच येत नव्ह्ती, तिने ती बॅग सारीवाकडे दिली. माझी बॅग अरे रस्त्यातच तुटली. मी सफरचंदावर जास्त लिहले कारण मला ते फार फार आवडले. अगदी फ्रेश आणि नॅचरल दिसतात.
ईन मिन तिन तु दिलेले सोनचाफ्याचे फुल माझ्याकडे आताही आहे. सुकले असुनही छान सुगंध येत आहे. मला लहानच फुल मिळाले, मोठे हवे होते. :स्मित:स्मित विकतही फुले मिळतात पण कोणीही प्रेमाने दिलेल्या फुलाचा सुगंध काही औरच असतो. तु श्रावणीलाही त्याच प्रेमाने फुल दिले हे मला फार आवडले. राधालाही दिलेस का. तु मनापासुन सोनचाफ्याची फुले आणली होती हे कळत होते. काहीतरी द्या असे भाव नव्हते. पुढच्या ग. ट. ग. ला कुठले सुगंधी फुले घेवुन येणार?
सें. व. मध्ये गेल्यावर मी कसे कोणाला ओळखु माझ्याकडे एकाचाही फोन नं. नव्हता म्हणुन मी ऊशिरा जायचे ठरवले. मला १००% खात्री होतीच कोणीही लाल गुलाबाचे फुल हातात धरुन बसणार नाही. ज्या ठीकाणी खुप जण जमा असतील त्या टेबलाजवळ जावुन चौकशी करेन असे ठरवले होते. तिथे गेल्यावर मी सर्व टेबलांवर नजर फिरवली ग्रुप दिसला नाही. जिप्सी आणि इंद्रा यांना लांबुनच पाहीले, जिप्सीला ओळखता आले. इंद्राचा चेहरा ओळखीचा वाटत होता नाव माहीत नव्हते नंतर कळले.
मला खुप काही विचारायचे होते. पण वेळच मिळाला नाही. सुर्य कधी अस्ताला गेला हे कळलेच नाही.
झाडे वाटप ही छान झाले. जिप्सीने वाटलेल्या ज्याच्या मोगराच्या झाडाला पहीले फुल येईल त्याला तो सुंदर आणि मोठे बक्षिस देणार आहे.
जागु ही सामीची गुरुमाता आहे म्हणुन जागुने सामीला घरी नेण्यासाठी अळुवड्या दिल्या. जिप्सीलाही घरी नेण्यासाठी अळुवड्या दिल्या पण त्याचे कारण वेगळे होते.
मी जेव्हा जेव्हा इंद्राकडे बोलण्यासाठी ,खाऊ पास करण्यासाठी त्याच्याकडे पहायची तेव्हा तेव्हा त्याचे लक्ष त्याच्या हातातील आयुधाकडेच असायचे हो ना इंद्रा.
अंजली चितळे यांच्या कविता वाचनाचा कार्यक्रम वे़ळ कमी असल्याने झाला नाही.
दिनेशदा यांच्या जादुच्या पेठारा बद्दल जास्त लिहु शकत नाही, त्यांची तशी लेखी परमिशन घेतली नाही . दिनेशदा तुम्ही पुढच्या वेळी खुप वेळ काढुन या. आपण भारतातील निसर्ग आणि परदेशातील निसर्ग यावर चर्चा करु. तुम्ही तिकडची अजुन माहीती सांगाल जसे विमानांचे रस्ते, आकार. बरे झाले तुम्ही रस्त्यांबद्दल सांगितले. मलाही साधनाप्रमाणे रस्त्यांबद्दल माहीती नव्हती. तुमचे प्रवासाचे टाईमटेबल वाचले तेव्हा वाटले कशाला हे येवढी दगदग करतात. आम्हाला तुम्ही बनवलेल्या पदार्थाची चवही चा़खायची आहे. जेव्हा तुमची पाककला सादर कराल तेव्हा आपण दक्षिणाला बोलवुया.
आजुबाजुच्या टेबलावरील तरुण तरुणी गुंजन थांबवुन आपल्याच टेबलाकडे कुतुहलाने पहात होते. कुठुन आलेत हे? काय करत आहेत? कोण आहेत हे वेडे? 'आम्ही आहोत निसर्ग वेडे'
फिरणारे पहारेकरी तर चांगलेच वॉच ठेवुन होते. आपण गेल्यावर त्यांनी सुटकेचा श्वास टाकला असेल.

विकतही फुले मिळतात पण कोणीही प्रेमाने दिलेल्या फुलाचा सुगंध काही औरच असतो. >>
कामिनी वा क्या बात हे अगदी मनाला स्पर्शुन गेल.
मी राधाला फुल नाही दिल कारण तीने मला चॉकलेट नाही दिल Wink ( ती तर फुलराणीच आहे Happy ) ती बाळ कदाचीत फुल तोंडात वैगरे घालेल म्हणुन तीला देण्याच टाळल ( आमच्या घरी असे पराक्रमी वीर आहेत )
पुढच्या गटगला सरप्राईज आणतो मग ( कोबीचे फुल- मजबुत पिशव्या घेऊन या बर सर्वांनी Proud )
मी दिलेली भेट तुम्हा सर्वांना मनापासुन आवडली यातच सर्व आलं, त्या टेबलवर अगदी एखाद्या सणा सारखच वातावरण होत Happy
सालाबाद प्रमाणे साधना आतुंनी जिप्स्याच्या घेतलेल्या फिरक्या,उपस्थीत नसलेल्यांची काढलेली आठवण, दिनेशदा, जागूताई, सामी, उजु ,पलक, कामिनी , अंजली ताई, हेमाताई, ईंद्रा,श्री म्हात्रेसाहेब, एक परिराणी, दुसरी फुलराणी तुम्हा सर्वांची भेट आनंददायी ठरली धन्यवाद Happy

ता.क. - जिप्सिभाऊ कुणाची हरकत नसेल तर प्रचि येऊद्या.

तुमचे सर्वांचे लक्ष खाण्यावर होते. माझे लक्ष तुमच्यावर होते. तसेच आजुबाजुच्या टेबलांवरील भाव टिपण्यात.
(हलके घ्या)

Pages