श्रावणाची सर स्मृतींची येउनी बरसून गेली!

Submitted by profspd on 15 July, 2014 - 12:53

श्रावणाची सर स्मृतींची येउनी बरसून गेली!
आणि सुकलेल्या उन्हाला चिंब ती भिजवून गेली!!

ती झुळुक आली असावी अगंणामधुनी सखीच्या....
गंधअभिसारामुळे नस आणि नस तरसून गेली!

त्या गुलाबी गतक्षणांचे चांदणे घेऊन आली.....
श्वास अन् तो श्वास माझा पौर्णिमा उसवून गेली!

ती नजर अगदी निसटती आणि ओझरतीच होती....
मात्र जाताना किती कोडी मला घालून गेली!

जागणा-या लोचनांना शेवटी आलीच निद्रा....
आणि माझी रात्र स्वप्नांनीच ती सजवून गेली!

एक वेडी आस मजला गझल ती लावून गेली....
जन्मभर डोळ्यांस माझ्या आणि ती खिळवून गेली!

ते न रे चक्रीय वादळ वा न झंजावात होता....
एक हलकीशी झुळुक मजला अरे, उडवून गेली!

प्रथम भेटीतच तिच्या प्रेमामधे मी कैद झालो.....
कोवळी ती प्रीत माझी जिंदगी बदलून गेली!

एक तो वा-याबरोबर वाहणारी धूळ होता.....
पण, परागांसारखे त्याला झुळुक रुजवून गेली!

जिंदगी माझी शहाणी अन् किती सोशीक होती....
वंचनांचे वीष सुद्धा लीलया रिचवून गेली!

काजवे काही स्मृतींचे सोबतीला येत होते....
वाट काळोखातलीही त्यामुळे उजळून गेली!

फरक गगनाला न पडला, मात्र मी व्याकूळ झालो..
मध्यरात्री तारका माझीच का निखळून गेली?

जिंदगी माझी न होती अमृताचा एक प्याला....
मात्र प्रीती, अमृताची माधुरी मिसळून गेली!

वाट मी पाहून थकलो आणि रुसलोही तिच्यावर...
शेवटी आली नि ती माझी कळी खुलवून गेली!

पोचलो साठीत तेव्हा ही मला जाणीव झाली....
की, जवानी माझिया हातातुनी निसटून गेली!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बालपण आठवलं. बालवाडीतील बडबडगीते आठवली.
मग शुभंकरोती कल्याणम च्या चालीत ही रचना ठेक्यात गाऊन पाहिली.

समाधान झालं. आता कसं निवांत वाटत आहे. Happy

ती झुळुक आली असावी अगंणामधुनी सखीच्या....
गंधअभिसारामुळे नस आणि नस तरसून गेली! >> अभिसार की अतिसार? बाकी ते सर, गंध, झुळूक, व्याकुळ, मध्यरात्री वगैरे अतिसाराच्या चालीत एकदम फिट्टं बसतंय. खरं सांगा अश्याच अवघड प्रसंगी रचलीत ना हे गझल.

पोचलो साठीत तेव्हा ही मला जाणीव झाली....
की, जवानी माझिया हातातुनी निसटून गेली! >> आणि मायबोलीकर त्याची पुरेपुर फळं भोगत आहेत.

गझल म्हणजे असंबद्ध कविता. या कडव्याचा त्या कडव्याशी संबंध नाही (प्रो. हे तुम्हाला नाही ).
तरीही पहिल्या तिनात मेडीकलची एकेक शाखा येऊन गेली आहे.

हुप्पाहुय्या तुझा अतिसार इथे कशाला घेऊन आलास रे लागण करायला? >>> मला नव्हे हो तुम्हाला गझलातिसार झाला आहे, म्हणूनच मायबोलीवर मिळेल तिथे टाकत सुटला आहात, जरा म्हणून धरबंद नाही. केवळ 'मी नाही तू' असे म्हंटल्याने आजार जात नाही. काहितरी ऊपाय करा, लवकर बरे व्हा. गझल करणारे एक डॉक्टरही आहेत त्यांचा सल्ला घ्या, कदाचित त्यांची भाषा तुम्हाला समजेल.

हे सर्व तुझ्या डोक्यावरचे आहे! >> तुम्ही एक सोडले तर सगळ्यांच्याच डोक्यावरचे आहे हे. तुम्हाला तरी गझलेतलं काय डोंबलं कळतंय ते धडधडीत दिसत आहेच. तुमचे ह्या युगातले अवतारकार्य संपण्याची वेळ आली आहे.

कळकळीचा एकच आणि शेवटचा आगाऊ सल्ला देत आहे.
कृपया स्वतःचे अधःपतन थांबवा, थोडे आत्मपरीक्षण करा. केवळ निवडक व ईतर गझलकारांच्या तोडीच्या रचनाच प्रकाशित करा. सोशल मिडीआवर लोकांना वेठीला धरणे थांबवा. ईथे चांगल्या गझलांसाठी रसिकवाचक ऊपलब्ध आहे, तुमची निवडक प्रतिभा सादर करा वाहवा नक्की मिळेल आणि ते प्रतिसाद जास्त सुखावह असतील. नुसते हसे करून घेऊन लोकांच्या टीकेचे धनी होण्याने कोणते समाधान लाभते हेच तुम्हीच ताडून बघा. सल्ला अंमलात आणायचा की ऊडवून लावायचा तुम्हीच ठरवा. जसे प्रयत्न कराल प्रतिसादही तसाच लाभेल.

गझलेची कडवी?????
काय डोके फोडायचे आता >>>>>

गझल म्हणजे असंबद्ध कविता. या कडव्याचा त्या कडव्याशी संबंध नाही
( हे मूळ वाक्य). समजायला हवं हा दुराग्रह नाही. Happy