दैव

Submitted by Hasim Nagaral on 15 July, 2014 - 09:24

हि कथा या आधी मी फेसबूक वर My Horror Experience या पेज वर प्रसीद्ध केली आहे

शहरापासून खूप दूर, एकांतवासात एक जोडपं अगदी प्रमाणे एखादा गुलाब
फुलावा असा स्वतःचा संसार फुलवत होते. शांततामय वातावरणात एक
छोटेसे घर भाड्याने घेऊन ते दोघे त्यामध्ये अगदी प्रेमाने संसार करीत
होते.. घराचा मालक दुसऱ्या शहरात राहत असे, २-३ महिन्यातून
एकदा भाडे घेण्यासाठी चक्कर मारीत असे. खूप सुख नानाडत होते
त्यांच्या घरात.नवरा मिळेल ते काम करायचा आणि पोट भरायचा. दिवसेन्
दिवस त्यांचा संसार बहरत चालला होता. त्यांच्या सुखात भर
घालणारी घटना घडली, ती म्हणजे ते दोघे, दोघाचे तीन झाले होते.
त्यांना पुत्रप्राप्ती झाली होती. त्यांच्या आनंदाला पारावर
राहिला नव्हता. दिवस्न्मागून चालले होते. पाहता पाहता ६ महिने लोटले
आणि त्यांचा मुलगा ६ महिन्यांचा झाला . सगळ अगदी सुखात चालल
होत...

पण नियतीने त्यांचा घात केला... आणि कामावर असताना 'त्याचा' अपघात
झाला आणि 'तो' जागीच मरण पावला.'त्या' बिचारीवर दुख:चा डोंगर
कोसळला, 'तिची' तर जणू देवाने थट्टाच केली होती. ४-५ दिवस रडली .
पण लवकरच 'तिच्या' लक्षात आले कि, रडण्यात काही फायदा नाही.
'तिला' जगायचे होते ते 'त्याच्या'
शेवटची निशाणी आणि स्वतः च्या बाळासाठी. टी ताडकन उठली, क्षणभर
मनाशी विचार केला आणि भरल्या डोळ्यांनिशी 'ती' घराबाहेर पडली.
तो तान्हुला जीव तसाच घरात झोपवला, आणि ती चालू लागली वाट
ती शहराची. डोळ्यापुढे नवर्याचा चेहरा, डोळ्यात अश्रू आणि हृदयात
ज्या जीवासाठी जगायचं आहे त्या जीवाची सावली. तिला नव्याने जीवन
सुरु करण्याचा जणू हुरूप चढला होता. तिला आता काही काम करून पैसे
कमावून त्या इवल्याशा जीवाला जागवून मोठे करायचा होत. तिची फक्त
पावलं आणि शरीर चालत होत., पण मन मात्र घरात
झोपलेल्या त्या बाळाच्या विचाराने त्रस्त होते. रडायला लागल तर आजू-
बाजूला आवाज ऐकणार कोणी नाही, झोपेतून उठून घाबरला तर???,
त्याला भूक लागली तर ??? असे एक न अनेक विचार तिच्या मनात येऊ
लागले. त्या विचाराने तिची पावले झप-झप चालू लागली.
शहरात पोचल्यावर तिला एका इमारतीमध्ये काम चालू आहे दिसल्यावर
ती तिथे काम करण्यासाठी गेली, तिथे तिला विटा उचलण्याचे काम लागले..
ती तिहते जरी काम करीत असली तरी तिचा सगळा लक्ष घर्मध्ये
झोपलेल्या तिच्या बाळाकडे लागलेहोते. एकदाची संध्याकाळ झाली,
तिची कामावरून सुट्टी झाली, तिला थोड हायस वाटल.
तिला दिवसभराच्या कामाचे ५० रुपये मिळाले,
तिच्या हास्याची काळी थोडी खुलली, आणि ती लागलीच दुकानात
गेली आणि दुधाची बाटली आणि थोड तांदूळ खरेदी करून घरी निघाली, दिवस
मावळत चालला होता, काळोख सूर्यास्ताला साद घालून निमंत्रण देत होता.
तिची पावल घरच्या ओढीने तिला पात पात चालायला मजबूर करीत होती.
तिच्या बाळाचे दिवसभरात काय हाल झाले असतील ह्याचा विचार
तिला सहन होत नव्हता, याच विचारात टी रस्ता क्रॉस
करायला लागली.....

आणि ट्रक च्या ब्रेक चा कर्कश्य आवाज परिसरात घुमला, महिलेची एकाच
किंकाळी मावळत्या सूर्याला भिडली. बघ्यांची गर्दी झाली. "ती"
रक्ताच्या थारोळ्यात पडलेली,
तिची अवस्था शेवटच्या प्रवाश्यासारखी झाली होती, नजर
फुटलेल्या दुधाच्या बाटलीतून सांडणाऱ्या दुधावर खिळली होती,
तिच्या नजरेपुढे भुकेने व्याकूळ असे रडणारे तिचे बाळ येत होते. 'माझ बाळ'
हा शेवटचा शब्द तिच्या तोंडून फुटला आणि ती गतप्राण झाली. .
.
.
.
या घटनेला २ महिने उलटून गेले. नेहमी प्रमाणे घरमालक घरभाडे
घेण्यासाठी त्या घरी गेला, सायंकाळी ७ ची वेळ होती, बाहेर अन्धुअकस
पडल होत. घरमालक टोर्च घेऊन घराकडे आला पण त्याला दारावर कुलूप
दिसले म्हणून त्याने विचार केला कि पाहू तरी घराची काय अवस्था आहे
म्हणून त्यने नकली चाविनिशी कुलूप उघडले असता,
दरवाज्याच्या गांजलेल्या बिजागार्यांचा कर्कश्य आवाज
घरमालकाच्या काळजाचा ठोका चुकवून गेला. त्याने दार उघडताच, २-४ वाट
वाघळे आणि अजून काही पक्षी घराबाहेर उडून गेले.
घरमालकाची थोडी टरकली होती. घरात कोळ्यांनी सुद्धा जाळे विणू घातले
होते. वायर सुद्धा उंदरांनी कुरतड्ल्या होत्या. टोर्च च्या उजेडात
त्यांनी सगळे घर पहिले. आणि 'बरेच दिवस कोणी राहत नाही वाटत इथे',
असे ते मनाशी पुटपुटले, आणि कापत्कडे वळून कपाट उघडले तर
कपाटाचा दरवाजा त्यांचं हातात आला. घरमालक घर्तून बाहेर
पडण्यास्ठी वळले असता त्यांची बेड वर नजर गेली, त्यांनी तिकडे टोर्च
धरून पहिले, तर त्यला जे काही दिसले त्याने घरमालकाला ४ पावले मागे
सरकण्यास भाग पडले. तिथे एक काळा बाहुला होता, जो कि त्या बेड वर
अडवा झाला होता. घरमालक खूप घाबरला. त्याच्या मनात अनेक प्रश्न
पडले, काय असेल हे, कोणी ठेवला असेल इथे. ??? काय झाले असेल
त्या कुटुंबाबर.????? असे अनेक प्रश्न त्या घरमालकाला पडले.
घरमालकाने एक काठी घेतली आणि बेड वर
दिसणाऱ्या काळ्या बाहुल्याला डिवचले. त्या बहुल्यात कसलीतरी हाल -
चाल जाणवली म्हणून घरमालक थोडा मागे सरकून टी कसली हाल-चाल आहे
ते टोर्च च्या उजेडात पाहू लागले. त्याने जे पहिले त्यावर
त्याला स्वतः ला देखील विश्वास बसत नव्हता. त्या बहुल्यातून
शेकडो झुरळ बाहेर पडू लागली, आणि खाली शिल्लक राहिला तो लहान
बाळाच्या हाडाचा सापळा....

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

हसीम तुम्ही माय हॉरर एक्स्पीरीयंस पेज वर माबो वरच्या बर्याचशा कथा टाकलेल्या आहेत..इथे आलाच आहात तर एक विनंती आहे की अशा मायबोली वरील कथा त्या पेज वर विदाउट परमिशन टाकत जाउ नका.. Happy

हासिम नगराळे यांच्या या पेजवर पाषाणभेद यांच्या कथेवरून दुसरी कथा लिहीण्यात आलेली आहे. तिथे काही जणांनी याला आक्षेप घेतला आहे. यावर हाशिम नगराळे यांचं म्हणणं आहे की कथा कॉपी पेस्ट केलेली नाही, माझ्या पद्धतीने फ्रेबदल केले आहेत.

कॉपी पेस्ट न करता मूळ कथेवरूनच उचललेली दुसरी कथा अशी चालवून घेता येईल का ? या लोकांवर कायदेशीर कारवाईचं पाऊल उचलायला हवं.