विषय क्रमांक-२ नात माणूसकीच

Submitted by Hasim Nagaral on 14 July, 2014 - 13:02

रोजचा आपल्या धावपळीत कधी कधी असे लोक
आपल्याला भेटून जातात.....ज्यां
चा आपल्या आयुष्याशी तसा काहीच संबंध नसतो....पण
जाता जाता ते अस काही बोलून जातात की ज्याने
आपल्या विचाराला किंवा आपला आयुष्या बद्दलचा पूर्ण
दृष्टीकोन बदलून
टाकतात....आणि मनाचा एका कोपर्यात कायम एक आठवण
नावच घर करून राहून जातात......
साधारण 4-5 वर्षापूर्वी मी कोल्हापूर मध्ये जॉब
करायचो....तस शिक्षणही चालूच होत....पण
शिक्षणासाठी कोणावर अवलंबून रहायच नव्हतं....रोज
सकाळी 5 ला उठणे आणि मग सायकल वरुन हातकणंगले
ला जाने....माझा घरापासून साधारण 10-12 किलोमीटर
च अंतर होत....आईपण माझा साठी सकाळी उठून
जेवणाचा डबा बनवून द्यायची.....आणि दिवसभर काम
करून संध्याकाळी 6 पर्यन्त घरी....मग राहिलेल्या वेळात
अभ्यास.....हाच रोजचा दिनक्रम होता....
रेल्वे स्टेशन चा जवळ सायकल
लावण्यासाठी जागा होती....30 रुपये महिना द्यावे
लागायचे....तिथे सायकलींवर लक्ष ठेवण्यासाठी एक
म्हातारी बाई बसलेली असायची......चार बांबू लावून वर
कडबा आणि ताडपत्री लावून तयार केलेलं छत
होत....त्यातच ती आजी राहायची.....अंगावर एकदम
जुनी फाटकी साडी...ती पण मळलेली.....डोक्यावरचे केस
पूर्ण पिकलेले होते....साधारण 70-75 वय असावे....तिथे
एक जून गोणपाट होत...त्यावरच
बसलेली असायची....थंडी पासून बचावा साठी एक
काली चादर पण होती...थंडीचा दिवसात कायम अंगावर
घेतलेली ती दिसायची....समोर एक जर्मन च
ताट...आणि एक स्टीलची चेपलेली वाटी.....एवढच......एवढं
असूनही चेहर्यावर कायम स्मितहास्य असायचं......
एक दिवस संध्याकाळी घरी जाताना मी सायकल काढत
होत तेंव्हा तिने मला विचारलं...,"बाळ.....नाव काय
तुझ...??
मी बोललो..."हासीम....
कदाचित त्यांना ऐकू नाही गेल किंवा नाव समजलं
नाही....त्यांनी पुन्हा विचारलं....काय..??
मी पुन्हा बोललो..."हासीम...
त्या हसत हसत बोलल्या..."अच्छा....आसिम....छान आहे
नाव....
मनात आल त्यांची चूक दुरुस्त करावी आणि सांगावं...आसिम
नाही हासीम.......परत म्हटलं राहू दे....म्हणू दे
काहीतरी.....
त्यांनी मग इतर चौकशी केली म्हणजे घरी कोण असत..??
गाव कोणत...??
नंतर सायकलीला अडकवलेल्या माझा बॅग कडे पाहून
विचारलं....,"डब्या मध्ये काही शिल्लक आहे का...??
मी क्षणभर गोंधळलो.....मग बोललो...,"नाही ओ आजी....."
का कुणास ठाऊक खूप वाईट वाटलं नाही बोलताना....
मग पुन्हा तोच हसरा चेहरा करून बोलल्या.....,"क
ाही हरकत नाही...पण कधी काही शिल्लक राहील तर
टाकून देण्या पेक्षा आणत जा आणि मला देत जा..."
हे
सांगताना त्यांचा चेहरा जरी हसरा असला तरी त्यांचे
डोळे ओशाळलेले वाटत होते....कदाचित त्यांना लाज
वाटत होती अस काही मागण्याची.....पण
मजबूरी होती त्यांची.....उपाशी पोट
कोणाकडूनही काहीही करवून घेत.....
मी हो बोललो आणि निघालो......
घरी आल्यानंतर रात्री आई जवळ
बसलो आणि त्या आजी बद्दल सांगितलं...तिला पण खूप
वाईट वाटलं......दुसर्या दिवशी सकाळी तिने न
सांगता डब्यात 2 चपाती जास्त
भरल्या आणि बोलल्या त्या आजीला दे....मला खूप बर
वाटलं....मी निघणार तेवढ्यात बाबांचा आवाज
आला....,"आता गेल्या गेल्या दे....म्हणजे आताच ताज खाऊन
घेतील...."
मी हो बोलून
निघालो....त्या आजी झोपल्या होत्या....त्यांना उठवून
चपाती आणि भाजी त्यांचा ताटात काढून दिल....
त्या आजीचा चेहर्यावर वेगळाच आनंद
होता....त्याचा चेहर्यावरील आनंद पाहून मनाला खूप
समाधान मिळालं.....
दुपारी ऑफिस मध्ये जेवताना अचानक त्या आजीची आठवण
आली....आणि एक चपाती काढून
ठेवली....आणि मित्रांचा पण डब्यात जे जेवण शिल्लक होत
ते माझा डब्यात भरून घेतलं.....
संध्याकाळी मी तो डबा त्यांना दिला.....मग त्या गोड
हसल्या.....त्यांनी डबा रिकामा करून दिला....
आणि त्यातील अर्धी चपाती काढली त्याचे छोटे छोटे
तुकडे केले....आणि थोड दूर जावून पसरून
ठेवले...आणि त्यांचा जवळचा वाटीत पानी भरून
त्या तुकड्याजवळ ठेवलं.......
मी त्यांची प्रत्येक हालचाल पाहत
होतो....त्या पुन्हा जवळ येऊन
बसल्या.....मी विचारलं..."आजी काय करताय हे...??
त्या हसल्या आणि बोलल्या.....बघ तिकडे....
मी तिकडे पाहिल तर काही चिमण्या आल्या आणि ते तुकडे
खाऊ लागले आणि जवळचा वाटीतील पानी पिऊ लागले....
मधेच एका चिमणीने एक तुकडा उचलला आणि उडून
गेली.......कदाचित
ती तो तुकडा आणखी एखाद्या भुकेल्या पिल्लासाठी घेऊन
चालली होती......
त्यादिवशी जीवनाचा एक वेगळाच रंग
दिसला.....मी माझा डब्यातून काही घास
त्या आजीला दिले होते....आणि त्या आजीने
तिचा घासातील काही घास
त्या चिमण्यांना दिला.....आणि त्या चिमण्यांनी पण
काही भाग तिचा पिल्लांसाठी नेला.....कदाचित हेच
जीवन होत....दुसर्यासाठी थोडसं सुख घेवून जाने.....
जवळ जवळ एक वर्ष असच चालू राहील....नंतर माझ
शिक्षण पूर्ण करून पुण्यात आलो जॉब
साठी...चांगला जॉब मिळाला तेंव्हा आवर्जून
त्या आजींना पेढे देण्यासाठी गेलो....त्यांनी
पेढा घेतला....अर्धा मला भरवला आणि डोळ्यात
पानी आणून बोलल्या....''आठवणीने मला पेढा दिलास
यातच समाधान आहे.....माझा पोटचा पोराने
मला महालक्ष्मी देवीचा दर्शनासाठी आणल
आणि मला इथेच सोडून चुकवून निघून गेला....पण कोण
कुठला तू ...मला प्रेमाने पेढा दिलास खूप समाधान
वाटलं....खूप मोठा हो....साहेब होशील मोठा तू..."
मी त्यांचा पाया पडून आशीर्वाद
घेतला आणि निघालो......तेंव्हा एक गोष्ट लक्षात
आली की या जगात आशीर्वाद आणि आनंद मिळवण खूप सोप
आहे....म्हणजे एखाद्याला आपण आनंद
दिला की त्या बदल्यात आपल्याला.....समाधान,आनंद
आणि आशीर्वाद मिळून जात.....पण आयुष्य संपलं तरी आपण
हे दुसरीकडे शोधत बसतो....
मध्ये वर्ष निघून गेल...जॉब आता पर्मनंट
झाला होता.....म्हणून पेढा देण्यासाठी मी गेलो....पण
त्या तिथे नव्हत्या....त्यांचं साहित्य पण नव्हतं
तिथे....फक्त दूर नेहमीचा जागेवर ती वाटी होती.....
मी जवळचा टपरीवर गेलो आणि विचारलं..."इथल्
या आजी कुठे आहेत...??"
त्याने मला पहिलं आणि बोलला..."अरे वारल्या त्या...2
महीने होवून गेले...
ऐकून खूप वाईट वाटलं....मन सुन्न झालं....
जणू कोणीतरी जवळच गेल होत....
मी त्या वाटीकडे
पहिलं...कोरडी पडली होती...मी माझाजवळची पाण्याची बाटली काढली आणि ती वाटी पाण्याने
भरली....आणि त्यांचा साठी आणलेला पेढा ठेवला तिथेच.....आणि निघालो तिथून....
चालता चालता सहज मागे वळून पहिलं तर एक
कावळा त्या पेढ्यावर चोच मारून खात होता.....
अस बोलतात की पिंडाला कावळा शिवला तर समजायच
की त्या व्यक्तिला मुक्ति मिळाली....त्या कावळ्याला पाहून
वाटलं कदाचित मुक्ति मिळाली त्या आजीला.......!!!!!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर लिहिलं आहे.बिल्कूल नया वाटत नाही!

थोडा त्रास घ्याल का? शीर्षकात नातं माणूसकीचं किंवा नाते माणूसकीचे असा बदल करा.

Ho anishka madam....
bhutataki cha story lihun vaitagalo.....mhatal ata mansachi story lihavi....

ashya tarhech ayushya khup jananchya vatyala yet, tyatlya eka vyaktisathi tumhi kahitari kelat hi khup changli gosht ahe