मायबोलीकर साईप्रकाश बेलसरे उर्फ डिस्कव्हर सह्याद्री ह्याचे हार्दिक अभिनंदन !!!

Submitted by सह्याद्रीमित्र on 14 July, 2014 - 05:26

आपला सर्वांचा लाडका "डिस्कव्हर सह्याद्री" उर्फ डिस्क्या उर्फ साईप्रकाश बेलसरे ह्याने मुलुंड येथे १३ जुलै रोजी संपन्न झालेल्या १३ व्या गिरिमित्र संमेलनाच्या ब्लॉगर्स स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक मिळवून उदंड यश प्राप्त केले आहे !!!

साईचं लिखाण,त्याचं फिरणं,फोटोज ह्याचे तर आपण सर्वच "डायहार्ड पंखे" आहोत. आज गिरिमित्र संमलेनासारख्या गिर्यारोहण क्षेत्रातील सर्वोच्च व्यासपीठाने त्याची दाखल घेऊन त्याच्या www.discoversahyadri.in ह्या ब्लॉगला गौरविले आहे.

आणि मायबोलीकरांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट म्हणजे गेले तीन वर्ष मायबोलीकर गिर्यारोहक गिरीमित्रच्या ब्लॉगर्स स्पर्धेत प्रचंड यश मिळवत आहेत. २०१२ साली हेमंत पोखरणकर उर्फ हेम व नचिकेत जोशी उर्फ आनंदयात्री, २०१३ साली मी ओंकार ओक उर्फ सह्याद्रीमित्र तर ह्या वर्षी साईने बाजी मारली आहे !!

पुढच्या महिन्यात १४,१५ व १६ ऑगस्ट रोजी किल्ले धोडप येथे संपन्न होणा-या मायबोली सह्यमेळाव्यात आपण साईचा छोटासा कौतुक समारंभही करणार आहोत.

साई… आम्हाला तुझा प्रचंड अभिमान आहे (मला तर जास्तच कारण या स्पर्धेत मीही भाग घेतला होता आणि तू जिंकलास म्हणजेच मी जिंकलो असं समजतो. कारण मित्रासाठी हरल्याचा आनंद आहे !!). असंच उदंड लिखाण करत रहा आणि आम्हाला सर्वांना अशीच मेजवानी देत रहा !!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@रश्मी..
तुम्हाला लेख सापडला आणि आवडला, याचा आनंद वाटला.
मासिकात जागा मर्यादित असते. पण ब्लॉगवर लेखासोबत भरपूर फोटू आहेत.
लिंक: http://www.discoversahyadri.in/2016/08/SahyadriExperienceShravan.html

साईप्रकाश तुम्हाला ब्लॉग आणी फोटो तसेच लेखासाठी मन व पोट भरुन धन्यवाद.:स्मित:

अतीशय आनंद देणारे आणी मन भारावुन टाकणारे फोटो आहेत. निसर्गाचा अमुल्य ठेवा आमच्या बरोबर शेअर केलात हे खूप आवडले.

Pages