एक मी तलवार आहे, हे कुणाला ज्ञान नाही!

Submitted by profspd on 11 July, 2014 - 07:33

एक मी तलवार आहे, हे कुणाला ज्ञान नाही!
आजतागायत कुणाची कापली मी मान नाही!!

मी बरा अन् शायरी माझी बरे दोघेच आम्ही....
घेतला कोणाकडोनी विकत मी सन्मान नाही!

मित्र जे मज चार होते, तेच माझे यार होते!
आमच्यामधला कुणीही जाहला बेमान नाही!!

बोल तू बोलायचे ते, तो तुझा अधिकार आहे....
बोलणे कळते मला, मी एवढा नादान नाही!

लीनता पिंडात माझ्या, पायही जमिनीवरी हे....
जाहले मजला कधीही ठेंगणे अस्मान नाही!

पाहिली त्यांची अमीरी आणि दानतही बघितली....
फायद्या खेरीज कोठेही दिलेले दान नाही!

लांबचा असला तरीही सरळ रस्ता चालतो मी.....
आडवाटांशी कधीही बांधले संधान नाही!

तो बिचारा गात आहे, लागली त्याची समाधी.....
केवढे स्वर्गीय गाणे, ऐकणारा कान नाही!

वळचणीला या तुझ्या राहीन आनंदामधे मी.....
राहण्याजोगे मला अन्यत्र कोठे स्थान नाही!

पोचल्या निम्म्याहुनी जास्तीच गव-या रे, स्मशानी.....
आणि मी अद्याप माझे बांधले सामान नाही!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

थोडी दुरुस्ती सुचवली तर चालेल का?

मित्र जे मज चार होते, तेच माझे यार होते!
आमच्यामधला कुणीही जाहला बेइमान नाही!!

बोल तू बोलायचे ते, तो तुझा अधिकार आहे....
बोलणे कळते मला रे, मी एवढा नादान नाही!

लांबचा असला तरीही चालतो रस्ता सरळ मी.....
आडवाटांशी कधीही बांधले संधान नाही!

एक मी तलवार आहे, हे कुणाला ज्ञान नाही!
आजतागायत कुणाची कापली मी मान नाही!!

क्या बात है। अपरंपार आवडला हा शेर.

मी आजतागायत कुणाचीही मान कापलेली नाही आणि तरी सुध्दा ह्या मंदबुद्धी दुनियेला मी तलवार असल्याचे ज्ञान (जाणिव/माहित/ज्ञात नव्हे) होऊ नये? खरे आहे, या जमान्याच्या अज्ञानाची, सौंदर्यबोधाची, सौंदर्यबोधाच्या कफ़ल्लक कल्पनाशक्तीची कीव करावी तेवढे कमीच आहे. काय प्रचंड ताकदीचा आणि आजवरच्या समग्र समाजमनाच्या आकलनतेला आव्हान देणारा आणि नवीन दिशेचा सुतोवाच करणारा हा शेर आहे.

श्रीकृष्णाला सुद्धा भगवदगिता सांगताना कर्मयोगाचे दोनच प्रकार सांगता आलेत.

फ़ळाची अपेक्षा ठेऊन केलेले कर्म म्हणजे सकाम कर्म आणि कुठल्याच फ़ळाची अपेक्षा न ठेवता केलेले कर्म म्हणजे निष्काम कर्म
पण
कुठल्याही स्थितीत फ़ळ मिळताच कामा नये, असे ठरवून केलेले कर्म म्हणजे काय, हे कोडे कृष्णाला देखील सुटले नसावे, ते कोडे या शेराने उलगडून दाखविले आहे.

ही तलवार कुणाचे नाक, कान, घसा वगैरे काहिही कापायला तयार नाही.
वांगे, कांदे, टमाटर,पालक, मेथी, कोथिंबीर वगैरे कापण्यासाठी ह्या तलवारीचा उपयोग करावा काय, या विषयीसुद्धा प्रचंड गोपनियता राखण्यात शेराला कमालिचे यश प्राप्त झाले आहे.

शेरातील तलवार असे म्हणतेय की, मी काहिही करणार नाही किंवा करत नाही; तरी सुद्धा माझ्या विरश्रीचे आणि कौशल्याचे जमान्याला ज्ञान होत नाही हे या जमान्याच्या भंगार सौंदर्यबोधाचे लक्षण आहे.

एकदंरीत त्रैलोक्याच्या समाजमनाला उभा-आडवा-तिरपा छेद देणारा ऐतिहासिक शेर!

एक मी तलवार आहे, हे कुणाला ज्ञान नाही!
आजतागायत कुणाची कापली मी मान नाही!!
..

लांबचा असला तरीही सरळ रस्ता चालतो मी.....
आडवाटांशी कधीही बांधले संधान नाही!
..

आवडले !!!

>> ही तलवार कुणाचे नाक, कान, घसा वगैरे काहिही कापायला तयार नाही.
त्यांनी फक्त मान म्हटलंय ना? मग तुम्ही नाक कान घसे का आणता यात?
ते प्रोफेसर आहेत, ईएन्टी स्पेशालिस्ट नव्हेत.

<<< त्यांनी फक्त मान म्हटलंय ना? मग तुम्ही नाक कान घसे का आणता यात? >>>>

कोणी एक देवपूरकर काय म्हणतो यावर तलवारीचा स्वभावधर्म ठरत नाही. तलवारीचे स्वतःचे स्वभाववैशिष्टे आहेत.

तलवार हे शौर्याचं प्रतिक आहे त्यामुळे तलवारीचा सन्मान वाढेल असेच शब्दप्रयोग लेखकाकडून केले जातात.

उदा.

- तलवारीने शीर/मुंडके उडवणे.
- तलवारीने शिरच्छेद करणे.

शिवाजीने शत्रूची तलवारीने मान कापली, असे म्हणणे तलवारीचा अपमान करणे होय. Happy

तलवार म्हणजे दिड रुपयाचा ब्लेड नव्हे दाढी करता करता गाल कापला म्हणायला. Wink

तलवारीसारखा शौर्याचे प्रतिक असलेला शब्द जर काव्यात वापरायचा असेल तर त्या कवीला/गझलकाराला शौर्य म्हणजे काय याची पुसटशी तरी जाणीव असायलाच अन्यथा तलवारीचा "भाजीपाला" होतो.