और माझ्या शायरीचा बाज आहे!

Submitted by profspd on 10 July, 2014 - 12:23

और माझ्या शायरीचा बाज आहे!
मुरडुनी ते नाक म्हणती माज आहे!!

वाटले आश्चर्य मज अजिबात नाही....
काय ते लिहिणार मज अंदाज आहे!

शेर म्हणजे कल्पनेची ना भरारी....
शेर माझ्या आतला आवाज आहे!

कुटिलता डोकावते कोठे न कोठे....
बोलणे वरुनी जरी निर्व्याज आहे!

नागमोडी वाट प्रामाणीक वाटे....
सरळ रस्ता मात्र धोकेबाज आहे!

चेह-याने फक्त दिसतो संत-सज्जन....
वागणे पण फार कावेबाज आहे!

राग कोणाचाच मजला येत नाही....
मीच माझ्यावर अता नाराज आहे!

कंबरेचे तू भले गुंडाळ डोई.....
पाहणा-याला परंतू लाज आहे!

लगडले सौंदर्य ते आपादमस्तक....
ती जणू आभूषणांचा साज आहे!

लोक वाजवतात आता रोज मजला...
मी जगाचा जाहलो पख्वाज आहे!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुटिलता डोकावते कोठे न कोठे....
बोलणे वरुनी जरी निर्व्याज आहे!

नागमोडी वाट प्रामाणीक वाटे....
सरळ रस्ता मात्र धोकेबाज आहे!

राग कोणाचाच मजला येत नाही....
मीच माझ्यावर अता नाराज आहे!

कंबरेचे तू भले गुंडाळ डोई.....
पाहणा-याला परंतू लाज आहे!

लगडले सौंदर्य ते आपादमस्तक....
ती जणू आभूषणांचा साज आहे!

लोक वाजवतात आता रोज मजला...
मी जगाचा जाहलो पख्वाज आहे!<<<

छान!

(फक्त पख्वाज मधील ज जेवणातला तर बाकीचे ज जगण्यातले आहेत) Happy

छान गझल

मी" विना काहीच ह्या गझलेत कोठे
मीपणाची केवढी ही खाज आहे <<<

मी" विना काहीच ह्या गझलेत कोठे
विठ्ठलाची केवढी ही खाज आहे - असा शेर तुम्हाला शोभला असता वैवकु Happy

लाज हातांना तुझ्या काहीच नाही.....
केवढी मोठी तुझी रे खाज आहे!<<<

वैवकुंइतका गझलेबाबत गंभीरपणे विचार करणारा नवा शायर (मी तरी कुठे जुना आहे, पण तुलनेने) माझ्या पाहण्यात नाही.

कृपया जबाबदारीने वागावेत अशी विनंती!

त्याचा जीव केवढा, त्याचे साहित्यिक वयोमान केवढे व बोलणे केवढे
आपण कोणाला संबोधतो आहोत याचा जराही मुलाहिजा नसतो त्याला
असे करून माणूस आपले संस्कारच जगाला दाखवत असतो

साहित्यिक दानत ही शायराजवळ असयला हवी

..

...

....

कोकण्या | 11 July, 2014 - 00:20 नवीन

क्रुपया गाळलेल्या जागा भरा... lol.gif
<<<

आठ वर्षे एकवीस आठवडे झाले तुम्हाला इथे! आधी कृपया हा शब्द नीट लिहा, मग गाळलेल्या काय, भरलेल्या जागाही नीट भरू आम्ही!

profspd | 11 July, 2014 - 00:26 नवीन

धन्यवाद
<<<

तुम्ही कोणाला मध्येच धन्यवाद देताय प्रोफेसर साहेब?

चाललंय काय, तुम्ही बोलताय काय 'अवांतर'?

profspd | 11 July, 2014 - 00:38 नवीन

माझ्या धाग्यावर कुणीही काहीही खुडबुड केली की, मी त्याला धन्यवाद देतो, एक रिवाज म्हणून
<<<

आपण सगळे मायबोलीवर खुडबुड करत आहोत. वेबमास्टरांनी एकदाही आभार मानलेले नाहीत. रिवाज म्हणूनसुद्धा!
हे किती दुर्दैवी आहे!

profspd | 11 July, 2014 - 00:38 नवीन

माझ्या धाग्यावर कुणीही काहीही खुडबुड केली की, मी त्याला धन्यवाद देतो, एक रिवाज म्हणून

बेफ़िकीर | 11 July, 2014 - 00:39 नवीन

profspd | 11 July, 2014 - 00:38 नवीन

माझ्या धाग्यावर कुणीही काहीही खुडबुड केली की, मी त्याला धन्यवाद देतो, एक रिवाज म्हणून
<<<

आपण सगळे मायबोलीवर खुडबुड करत आहोत. वेबमास्टरांनी एकदाही आभार मानलेले नाहीत. रिवाज म्हणूनसुद्धा!
हे किती दुर्दैवी आहे!

profspd | 11 July, 2014 - 00:44 नवीन

ते उगाचच लुडबुड करत नाहीत

>>>>>>

वेमांनी खुडबुड करायचा काही संबंध आहे का इथे? Uhoh

माझ्या धाग्यावर कुणीही काहीही खुडबुड केली की, मी त्याला धन्यवाद देतो, एक रिवाज म्हणून
----- धन्यवादाचे सततचे आघात थाम्बवायचे असतील तर त्यान्च्या धाग्यावर उगाचच खुडबुड करु नका असे गझलाकारान्ना नम्रपणे धमकावयाचे असेल... Happy

उंदीर खुडबुडतात, झुरळे तिडबिडतात, पाखरे चिवचिवतात, कोणी गुरगुरतात, कुणाकुणाला थांबवणार?

उदय, मग ते स्वतःच खुडबुदतात आपल्या धाग्यावर.

वाहवा लिहितात किंवारोज एक शेर टकतात आणि स्वतःलाच धन्यवाद देतात Uhoh