कट्टा

Submitted by विनय भिडे on 29 December, 2008 - 14:08

नमस्कार मंडळी,
हे गप्पांच पान चालू करायच बरेच दिवस माझ्या मनात होत.

तसा मी नवीनच मायबोलीकर आहे, झाले असतील दोन -तीन महिने.पण झाल काय की आलो आंणि " या आत डोकाऊन पहा....." या पानावर मित्र भेटले आणि गप्पा मारत बसलो.खर पाहता त्या पानाच महत्व इतके आहे की प्रत्येक नवीन मायबोलीकराला ते पान म्हणजे, पहिल्या पावलावर विश्वास वाटाव अस आहे. की " हो मी पुढे जाव."

अ‍ॅडमीन ने आम्हाला प्रेमाने शाल@#तली दिली, पण मला माझ्या मित्रांना भेटायला एक हक्काची जागा हवी होती.

====== कट्टा ====== ही अशी एक जागा आहे की या ठिकाणी गप्पा मारायला प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, वयाची, विषयाची , वेळेची कसलीच मर्यादा नाही.

मी जुन्या मित्रांना भेटायला आणि नवीन मित्र बनवायला फार ऊत्सुक आहे.

मुद्दाम नमूद करतो या पानावर नवीन मंडळींनी याव, नवीन मित्र बनवावेत. त्यांचे माझ्यातर्फे व समस्त कट्टेकर्‍यांतर्फे स्वागत आहे.

विषय: 
प्रांत/गाव: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हाय

'मायबोली गणेशोत्सव २०१८' ह्या ग्रूपचे सदस्यत्व घेण्यासाठी या पानाच्या उजवीकडे दिसणार्‍या 'मायबोली गणेशोत्सव २०१८' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा. नंतर 'सामील व्हा' या शब्दांवर टिचकी मारा.

हाय

आज शुक्रवार, वीकान्त आला!
म भा दि उपक्रमांमध्ये भाग घेण्यासाठी माबोकर नेहमीच उत्सुक असतात.
लेख लिहायला आणि साहित्य वाचनासाठी ध्वनिचित्रमुद्रण करायला वेळ मिळावा म्हणून खुप आधीच म भा दि उपक्रम जाहिर करण्यात आले. तरीही साहित्य वाचन आणि गोजिरे बोल ह्या उपक्रमासाठी साहित्य पाठवण्याची मुदत २५ तारखेपर्यन्त वाढवत आहोत.
आता एकच वीकान्त राहिलाय मंडळी!
साहित्य पाठवण्याची तयारी करताय ना?

IMG-20190209-WA0004.jpg