पाउस पाडण्यासाठी काही उपाय :)

Submitted by mansmi18 on 6 July, 2014 - 06:06

नमस्कार,

सध्या पावसाची काय अवस्था आहे हे मी लिहायला नकोच आहे..रोज सकाळी मी .. आजतरी पाउस पडेल या आशेने जागा होतो आणि लख्ख उन पडलेले असते. काल रात्री पावसासारख्या आवाजाने जाग येउन खिडकीबाहेर पाहिले तर सगळे कोरडे होते..(आमच्याच बिल्डींगचा पाण्याचा पाईप फुटला होता त्याचा आवाज होता..म्हणजे दुष्काळात तेरावा महिना Happy ) असो.
Accuweather.com वर तरी चांगला अंदाज असेल असे वाटले होते.. त्यांनी ५ पासुन Thunderstorm and cloudy असे लिहिले होते पण आताही लख्ख उन पडले आहे. अरबी सनुद्रात तो कुठला पट्टा तयार व्हायला काय प्रॉब्लेम येतोय कळत नाही.
थोडक्यात काय? आकाशाकडे नजर लावुन बसणे याशिवाय फारसे काही आपण करु शकत नाही असे एकंदरीत मत झालेले आहे पण तरीही आपण काही अन कन्वेन्शनल मार्गाने पाउस पाडु शकतो का यावर मी विचार सुरु केला आणि काही उपाय वाचनात आले..ते मी देत आहे..आपल्यालाही माहित असल्यास लिहा..

१. होम हवन,यज्ञ करतात पण हा बराचसा खार्चिक आहे आणि आम्ही पुण्याचे असल्याने आधी इतर उपाय करुन पाहु आणि शेवटी नाइलाज झाला तर या खार्चिक उपायाचा विचार करु Happy
२.असे वाचलेय की बेडुक बेडकीचे लग्न लावल्यास पाउस येतो.
३."मल्हार" रागाचे गायन केल्यास पाउस येतो असे ऐकीवात आहे त्यामुळे जे कोणी गाणारे असतील त्यांनी कृपया मल्हार रागावर सध्या फोकस करावे.
४. महाभारतात अर्जुन धनुष्याला बाण लावतो आणि काहीसे पुटपुटत आकाशात बाण सोडतो आणि लगेच वीजा चमकायला लागुन पाउस पडतो असे पाहिले आहे तेव्हा तो मंत्र (पर्जन्यास्त्र) कोणाला येत असल्यास विनाविलंब अमलात आणावा.
५. कृत्रिमरित्या पाउस पाडता येइल पण तो फारतर २ मिमी पडेल असे आपले मा.(याचा फुलफॉर्म माननीय असा आहे..इतर कुठला अर्थ निघत असल्यास आम्ही जबाबदार नाही) मंत्री श्री. जयंत पाटील म्हणाले आहेत त्यामुळे हा उपाय असला तरी तो फारसा कामाचा नाही.
६. गोकुळात कृष्णाने पूजा न केल्याने इंद्राने संतप्त होउन पाउस पाडला होता. इंद्राला आपण तर केव्हाचे इग्नोर करत आहोत तरीही त्याला राग येत नाही असे दिसतेय तेव्हा त्याला एक्तर प्रसन्न किंवा आणखी संतप्त करता येइल असे काहीतरी करावे.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरच काळजीचा विषय आहे पण काळजी तरी किती करावी ?

अस म्हणतात की स्वतःच्या लग्नात नवरा- नवरीने काम केले की पाऊस पडतो. आपल्याकडली मुहुर्तावर लागणारी लग्ने काही आता लागणार नाहीत.

ज्यांची लग्ने ठरली आहेत आणि नजिकच आहेत त्यांनी लग्नाच्या कामाला लागावे म्हणजे स्वतःच आमंत्रणे करावीत.

चांगला धागा.
वरूण यंत्राचा वापर
शेतकरी सहज हे तंत्र वापरू शकतात.पण अतिप्रमाणात याचा वापर जमिनीच्या खारफूटीला आमंत्रण देऊ शकेल असे वाटते.

धोंड्या बनविणे असा एक प्रकार खानदेशात असतो.

एक कुणी बाप्या एका मध्यम साईजच्या मडक्यात एक बेडकी ठेऊन, ते मडके डोक्यावर धरतो. याच्या कमरेला फक्त लिंबाचा पाला बांधलेला असतो. बाकी उघडाबंब. हा घरोघरी जाऊन पाणी मागतो. सोबत पोरेटोरे असतात.
"धोंड्या धोंड्या पाणी दे
साय माय पिकू दे"
हा मंत्र गात असतात. (ळ साठी य किंवा ड वापरणे हा इकडचा प्रघात. उदा. अमळनेर गावाचा उच्चार अमयनेऽ असा होतो.) घराघरातून आयाबाया पाणी आणून त्या मडक्यात ओतत रहातात. धोंड्या भिजत रहातो.

हा पाऊस पाडण्याचा रामबाण उपाय समजला जातो Wink

डीविनिता | 6 July, 2014 - 16:58 नवीन

कृत्रिम पाऊस उत्तम उपाय, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव काय करायचे?
<<
काकांना फोन करून पहा.
अगस्तीचे वंशज आजही महाराष्ट्रात जिवंत आहेत Wink

काय योगायोग!
काल रात्री मी हा धागा वाचत होते तितक्यात बाहेर मोठ्ठा पाऊस सुरू झाला.
आता बुकमार्क करून ठेवते.
पुढच्या दुष्काळाच्या वेळेस उपयोगी पडेल.
Happy

दुष्काळाचा सामना भविष्यात कसा कराल या प्रश्नाला ज्यांनी "मै जबसे सीएम बना हूं तबसे पिछले १२ सालसे राज्यमे इस समस्या के बारे मे सुना नही है " हे उत्तर दिलं होतं, त्यांना सर्व देशभर फिरवावं, पावसाचे अच्छे दिन आपोआप येतील.

पावसाचा डिले झाला आहे.आणि तो होणार होता हे सहाजिक होतं. कृत्रिम उपाययोजना करण्यासाठी शासनाला दोष देणं आधी थांबवा.कारण मुळात कृत्रिम पावसासाठी लागणार्‍या अवस्था तरी आहेत का?

वारा तर वाहतो आहे पण बाष्पाचं प्रमाण खूप कमी आहे.म्हणजे कमी दाब तर तयार होतोय मग पाऊस कुणी ओढून नेला? या प्रश्नाचं उत्तर खूप रोचक आहे. ते कळलं की पाऊस न पडण्याचं कारण लक्ष्यात येईल.

अरे कुणाला इथे "अल निनो" नावाचा प्रकार माहीत आहे का ? नसल्यास गुगलुन पहावे...

तसेच इथे काही जणांना पावसाची चिंता नसुन मोदी सरकार ची जास्त आहे म्हणुन असले धागे निघत आहेत.. अन्यथा इतके वर्ष महाराष्ट्रात देशात भीषण दुष्काळ होता तेव्हा कुठे असले धागे निघालेले ???

उदयन तेवढ्यासाठीच पाऊस कोणी ओढून नेला असं म्हणालो. कदाचीत नेहमीसारखेच तुम्हीच एक जाणकार दिसताय.बाकी सगळे शासनाला दोष देण्यासाठी नेहमीसारखे प्रतिसाद येतायत.

रच्याकने, चिली आणि द.अमेरीकेची पश्चिम किनारपट्टी इथे गेले दोन वर्षे बराच पाऊस झाला.कुणी आहे की नाही राव माचूपिचू,ब्राझिलवाले माबोकर?? आणि आपल्याकडे ड्रॉट कंडीशन? का?

काकांना फोन करून पहा.
अगस्तीचे वंशज आजही महाराष्ट्रात जिवंत आहेत >>>>> नको नको नको असे म्हणत हातवारे करत दाही दिशाना पळणारी बाहुली.

विदा
मला खरेच उत्सुकता आहे कृत्रिम पाऊस प्रोजेक्ट राबवता येईल का याचा अभ्यास करायची
प्लीज जरा विस्तृतपणे लिहा ना.

कृत्रिम पाऊस प्रोजेक्ट >>>>>> अहो त्यासाठी ढग जमायला हवे ....... ढग जमत असतील आणि पाउस पडत नसेल तरच हा प्रोजेक्ट होउ शकतो अन्यथा ढग जमण्याइतकी प्रगती विज्ञानाने केलेली नाही आहे.. हा ढग हटवण्याची प्रगती मात्र केलेली आहे

उदयन ढग किती नि कसे जमायला हवेत? उदा. काल रात्रीपासून पुण्यात संपुर्ण नभ व्यापले ढगानी व्यापले आहे पण पाऊस नाही.

ढग जरी आभाळात दिसत असतील तरी त्याला हवे तसे ढग असयला हवेत.ढगांचे बरेच प्रकार आहेत त्यापैकी निंबस आणि क्युम्युलोनिंबस ढग असतील तर त्यात बाष्प नक्कीच पाहीजे.त्यासाठी IMD च्या संकेतस्थळावर वॉटर व्हेपर उपग्रहाकृती(सॅट इमेज) पहा.त्यात बाष्पाचं प्रमाण ठराविक असेल तर तापमान्,वार्‍याचा त्या पातळीवरचा (आवरणातला) वेग तपासला जातो. आणि साधारण त्या ढगांवरती पोटॅशियम आयोडाइड किंवा सिल्व्हर आयोडाइड किंवा ड्राय CO2 चं द्रावण बारीक फवारलं जातं.त्यामुळेच जलकण एकत्र येउन थेंब बनण्याची प्रक्रीया चाली होते.याला 'क्लाऊड सीडींग' किंवा 'मेघपेरणी' असं काहीसं म्हणता येईल्,ती होते.

पण हा उद्योग प्रचंड महागडा आहे.याची रसायनं महाग तर आहेतच शिवाय त्यात सिल्व्हर काँप्लेक्सेस असल्याने आरोग्यावर आणि मातीवर अपाय होण्याच्या शक्यता असतात.जर थोड्या जागेसाठी जरी प्रकल्प राबवायचा म्हटलं तरी ५-१० करोड हातोहात जातात.उदा.२००४-०५ दरम्यान अ.नगरच्या काही भागात आणि मला वाटतं बारामती बाजूला प्रयोग केले त्याचा खर्च १० कोटीच्या वर गेला.एका फेरीचा.त्यावरून हाप्रकार फारच खर्चिक आहे.

त्यात थोडा वेगळा प्रकार वर दिलेला आहे.पाऊस पडणार नाही किंवा तापमान वाढीमुळे असे सगळे होतेय असे म्हणता येत नाही. या आणि पुढच्या वर्षी कदाचीत कमी पाऊस असेल.कारण अल निनो फेजचं हे तिसरं वर्ष आहे.कदाचीत अजून एकदा अल निनो राहील आणि पुढच्या किंवा त्या पुढच्या वर्षी परत चार वर्ष आहे तसा पाऊस राहील.परत पुन्हा चार वर्षं डिले होईल.ही सायकल अशीच वर्षानुवर्षे चालू आहे. Happy

भारत हा मान्सूनमुळेच फूलला-फळलेला देश आहे.मान्सूनची सदैव कृपा राहीली आहेच.त्यामुळे तो उशिरा का होईना पण येईलच. Happy

रेन रेन गो अवे गाणं मुलांना शिकवणं बंद करा. आणि येता जाता मनापासून येरे येरे पावसा किंवा तत्सम गाणं म्हणा.

मनापासून काही मागितलं आनी ते मिळालय असं इमॅजिनलं की ते मिळतं म्हणतात.

विश्वास ठेवून प्रयत्न करायला काय हरकत आहे?

विदा भाऊ,
गरम/थंड पाण्याचे प्रवाह उदा. एल निनो, हवेचा दाब, चक्री वादळे, जमीन्/पाण्याचा गरम थंड होण्याचा वेळ अन त्यामुळे वाहणारे वारे इ वर एक अभ्यासू, विद्वत्ताप्रचुर व माहीतीपूर्ण लेख टंकून टाका ही विनंती. 'हवामानाचे रहाटगाडगे' असं नाव सुचवतो त्यासाठी.

मनापासून काही मागितलं आनी ते मिळालय असं इमॅजिनलं की ते मिळतं म्हणतात.
विश्वास ठेवून प्रयत्न करायला काय हरकत आहे?

<<

हो ना!
रोज मी 'मला एक करोड रुपये महिन्याला मिळतीलच!' असं मनापासून इमॅजिनतो अन विश्वास ठेवून प्रयत्न करतो.

सॅडली, आदपाव करोडही मिळत नाहीत हो Sad
आमचे विश्वासरावच कमजोर असतील कदाचित.

रिया थॅन्क्यु. मला बाहुली आवडली.:स्मित:

इब्लिस नाव छान आहे. विदा आणी उदयन धन्यवाद. विदा जरा छोटेसे ललित रुपी लिहाल तर बरे. किन्वा नवीन धागा उघडा ज्यात विद्ज्ञान आणी तत्सम बाबी सोप्या करुन सान्गीतल्या जातील. कारण विज्ञान आणी गाणित म्हणले लोक धुम ठोकतात.:स्मित:

रोज मी 'मला एक करोड रुपये महिन्याला मिळतीलच!' असं मनापासून इमॅजिनतो अन विश्वास ठेवून प्रयत्न करतो.>>> इब्लिस तश्या चेकची प्रतिकृती, तुम्हाला झोपल्यावर दिसेल अशी तुम्ही तुमच्या बेडरुमच्या छतावर चिटकवली आहे का? दर महिण्याला त्यावरची तारिख बदलता का?

(आणि कॅश हवी असेल तर काय करायचे ते मला माहित नाही, तसेच उलटे झोपायची सवय असेल तर काय करायचे तेही माहित नाहेय उगाच माहित नसताना कशाला खोटे लिहा. )

तुम्ही आपले न समजुन घेता करता आणि पधतीला नावे ठेवता.
संदर्भः गरज असल्यास उपलब्ध करुन देण्यात येइल.

सकाळ दुपार संध्याकाळ रात्र सतत सर्व रेडिओंवर पावसाचीच गाणी लावा. इतकं की ऐकूनच चिंब भिजलेले...रूप सजलेले वाटायला हवे. त्या रेडिओ लहरींनी लहरी ढगांना नक्की पाझर फुटेल.
रोज बादलीभर पाणी उन्हात ठेवा. त्याचे बाष्पीभवन होऊन जलचक्राला हातभार लागेल.
चातक पक्शी पाळा, पावसाची सुटेल शाळा.
भोलानाथकडून स्टँप पेपरवर खुराचा ठसा घ्या पावसाच्या डिलीव्हरी डेटटाईमवर.
प्रेमिकांनी भांडणे करा अबोला धरा.
पावसाच्या कवितांवर हिवाळ्यापर्यंत बंदी घाला. घाबरतोय तो एंट्रीलाच.
रेनकोट छत्र्या ईरली बाहेर काढून ठेवा.
भज्यांसाठी कांदे चिरा,तेल तापत ठेवा... आलाच की तो!!

शामची आई पुस्तकात एक 'सांब सदाशिव पाऊस दे' अशी कथा आहे, ती आठवली पाऊस पडत नसेल तर देवळाचा गाभारा पुर्ण पाण्याने भरतात अस होत त्यात. तस काही करता आले तर बघा. देव प्रसन्न होईल आणि पाऊसच पाऊस.:)

चला पावसाची गाणी लिहुया.

येरे येरे पावसा

बरसो रे हे तानसेनमधले गाणे डाऊन लोड करुन कन्टिन्यु वाजवा, नाहीतर विमाना मध्ये बसुन वर जाऊन त्या ढगाना कपडे पिळतात तसे पिळुन या.:फिदी:

डोरेमॉन दिसतोय का कुठे? शोधा शोधा बरे. नवीन काहीतरी गॅजेट काढेल तो.

इब्लिस त्या बाहुलीचे पाय दुखतील पळुन.:खोखो:

पाऊस न पडण्याला हा लेख कारणीभूत असावा असा संशय आहे. इतक्या सगळ्या पावसाळा स्पेशल गोष्टींवर बंदी घाला म्हटल्यावर पाऊस कशाला येईल? Proud

शांत बसा.................... कविता बिविता काही विचार करु नका........... प्रोफेसरांनी ऐकले तर १५-२० गझली येतील पावसावर ....... परवडेल का .....पाउस नको गझल आवर पाळी आणु नका मायबोलीकरांवर

जर मी चुकत नसेल तर कविता हि पाऊस पडल्यावर त्याकडे बघत पावसाचा आनंद लुटत करायची असते.
आजघडीला कित्येक पावसाळी कवी स्वताच पावसाची वाट बघत व्हरांड्यात खुर्च्या टाकून बसले असतील.
त्यातीलच एक जण आंघोळ न करता बसला असेल म्हणून पाऊस येत नसेल.
जर त्याला शोधून आंघोळ घातली तर काम बनू शकते. Happy

आणखी काही उपायः
१. क्रिकेटची वन डे आयोजित करणे.
२. गाईडमधील देव आनंद प्रमाणे कोणीतरी उपासाला बसणे.
३. घराबाहेर कॅलेंडर लटकवणे म्हणजे पावसाला हा कुठला महिना आहे आणि त्याचे काय काम आहे याची जाणीव करुन देणे.
४.घराच्या पाया खोदणीचे काम काढणे.
Happy

On a serious note:
आताच ऐकले की पावसाचे आगमन ११ जुलै पर्यंत लांबणीवर पडले आहे. Sad

रिया थॅन्क्यु. मला बाहुली आवडली.>> मला पण गं रिया!!

विश्वास ठेवत असालच तर हे नियमित म्हणा "ॐ जलबिंबाय विद्‍महे, नीलपुष्पाय धीमहि तन्‍नो अम्बुः प्रचोदयात्‌ ॥"

विदा खरेच छान माहिती अजून वाचायला नक्कीच आवडेल

प्रतिसाद मस्तच आहेत.पण इथे जुन्या कविंच्या पावसाळी कवितांची कडवी टाका की किंवा गाण्यांच्या ओळी वगैरे.
मनस्मी<< भारीएत उपाय.. बाहेर कँलेंडर.. Happy

प्राथमिक शाळेत होतो तेव्हाही पाऊस पडायचं नाव घेत नव्ह्ता.जुलै महिना लागला पण पाऊस एक टिपूस नाही.मग आम्हाला एक सर होते त्यांनी मैदानावर गोळा केलं.आणि साधारण तासभर डोळे बंद करुन हात जोडून 'पाउस पडू दे...पाऊसदेवा पाऊस पडू दे' असं म्हणायला सांगितल. योगायोग असावा पण आम्ही तासाभराने वर्गात गेलो.उन्ह एकदम खाली आलं.ढग साचले आणि त्या दिवशी प्रचंड पाऊ स झाला.आम्ही अक्षरशः उड्या मारत बाहेर... आमचं ऐकलं कुणी?कस? याचाच आनंद होता आणि त्या सरांवरचा विश्वास तर आजही दृढ आहे अगदी.

धन्यवाद.
रश्मीजी आणि विनिताताई,यात लिहीण्यासारखं खूपसं आहे.गणितासारखे खूप डोके लावण्यापेक्षा नवीन उकली छान कळतात. एखादा धागा विज्ञान समजावं म्हणून काढण्याचा उद्देश्य आहे.पण एखादा भाग फार खोलात जाऊन सांगता येईल का किंवा त्यावरचा अभ्यास करण्यासाठी वेळ काढता येईल का पुढे,असं वाटतं.तेव्हा धागा काढला तर तो चालवलापण पाहीजे पुढे.म्हणूनच जरा 'हिचकीच हो रही है'. Happy तरी दिनेशदांसारखे काही छोटे लेख टंकण्याचे मनात आहे.तसाच वेगळा धागाही काढता येईल की जिथे विज्ञानातले प्रश्न विचारुन उत्तरं देता येतील.तुम्ही सुचवू शकाल का अजून नेमका कसा धागा असावा? काय अपे़क्षित असेल?
इब्लिसजी धाग्याला शिर्षक मजेशीरच आहे. माहीती कलेक्ट करुन रश्मीताई म्हणतात तसा ललीतबद्ध छोटासा लेख टाकेन.आपण सांगितलेली यादी मोठी आहे.एडीटींग करावं लागणार. Happy

विश्वास ठेवत असालच तर हे नियमित म्हणा "ॐ जलबिंबाय विद्‍महे, नीलपुष्पाय धीमहि तन्‍नो अम्बुः प्रचोदयात्‌ ॥"

>>
हे कुठे तरी ऐकलंय Uhoh

आज प्रतिसाद वाचताना परत पाऊस पडतोय.
मी आता पावसाळाभर हा धागा दररोज वाचणार.
Wink

विज्ञानदास, काल आमच्या इथल्या चर्चमध्येपण सन्डे मास नंतर एक तास पावसासाठी विशेष प्रार्थना होती.
पाऊस नक्कीच पडणार असे तिथल्या नन मला म्हणाल्या.
पण मी या धाग्याला क्रेडिट देत्येय. Happy

कळविणेस आनंद आहे की हा प्रतिसाद मी बाहेर पडणार्‍या पावसाच्या सरींच्या साक्षीने टंकत आहे.सातीताईनी पाऊस पाठविल्याबद्दल आभार.धागाकर्त्याचे अभिनंदन.. Happy

इस्राईल सारखा आमच्या सांगली-कोल्हापूर एवढा देश पावसासाठी रडत बसलेला नाही.नाहीतर आपण पाणी असलेले भाग सुद्धा पावसासाठी गळे काढतात.

-------------------------------------------------------------

पेटून कशी उजळेना
ही शुभ्र फुलांची ज्वाला?
तार्‍यांच्या प्रहरापाशी
पाऊस असा कोसळला...

-ग्रेस

हा धागा सकाळी वाचला आणि पावसाला सुरवात झाली .मस्त पाऊस पडून पाणी साचलं.क्रेडीट गोज टू धागा.

amachyakade pathavana paus Sad
mi sakal pasun 3 wela wachalay ha dhaga

kal aai babani pavasasathi jap pan kela

aanakhi kai karayala hav?
pausala fakt khristi prayers ch kalat asavyat ka?

रीया,
२ जुलैला धो-धो पाऊस पडला, त्यावेळी तुझी आठवण झाली होती.( नि.ग .वरील पावसाच्या पोस्टी) खूप मस्त वाटलं होतं ग.

mi sakal pasun 3 wela wachalay ha dhaga>>>>> मनोभावे हा धागा वाचशील तर पाऊस पडेल.मनी नाही भाव, पावसा मला पाव ?

Pages