सहर्ष निमंत्रण

Submitted by प्रभा on 5 July, 2014 - 13:31
ठिकाण/पत्ता: 
श्री. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ-- अमरावती

IMG-20140704-00548.jpg
समस्त मायबोलीकर,
आपणास कळविण्यास आनंद होतो कि ,आमचे सासरे स्वर्गीय. हरिहरराव देशपांडे यांचे द्वारा लिखित सन १९२८ ते १९६१ ह्या कालावधीत प्रकाशित सहा पुस्तकांचे ---
पुनर्मुद्रण व प्रकाशन सोहळा -- शनिवार दि. १२ जुलै २०१४-- गुरुपोर्णिमा --या मुहुर्तावर सकाळी १० -३० वा. आयोजित केला आहे. आपण सर्व या कार्यक्रमास आमंत्रित आहात. सोबत पत्रिका पाठवते आहे.IMG-20140704-00548.jpg
कै. हरिहर वामन देशपांडे लिखित सहा पुस्तक
१]अवनतीमय भारत,
२]दोन प्रख्यात युद्धतंत्रे,
३]राजपुत संस्क्रुती,
४]राजपुत राज्यांचा उदय व र्हास,
५]१८५७च्या वीर महिला,
६]शिखांचा शत-सांवत्सरिक इतिहास
कै. ह. वा. देशपांडे [१९०५ - १९६५] हे विदर्भातील एक सुविख्यात बहुआयामी व्यक्तिमत्व होते. स्वातंत्रसेनानी, कुशल संघटक,लेखक, पत्रकार, शिक्षण व शारीरिक शिक्षंणात तरबेज बहुश्रुत वक्ता, राजकीय विश्लेशक, आयुर्वेद, इतिहास, धर्मकारण इ. विषयाचे गाढे अभ्यासक व संशोधक, संस्क्रुत, मराठी, इंग्रजी व हिंदी भाषांवर प्रभुत्व, स्थानिक स्तरापासुन तर आंतररास्ट्रीय स्तरापर्यंत जनसंपर्क ठेवणारे अशी त्यांच्या व्यक्तिमत्वाची ओळख तत्कालिन समाजाला होती. विविध विषयां वरील त्यांचे समयोचित व विपुल लिखाण काळाच्या ओघात विलुप्त होण्यापुर्वी व आजही ज्याची महत्ता यत्किंचितहि कमी झाली नसतांना पुन्हा एकदा तरुंण पिढीच्या वाचन व चिंतनासाठी उपलब्ध करुन द्यावे व त्यांचा साहित्य सुगंध दरवळत रहावा या उद्देशाने त्यांच्या काही पुस्तकांचे पुनर्मुद्रण व काही हस्तलिखितांचे प्रथम प्रकाशन करण्याचे
उद्देशाने हा उपक्रम हाती घेतला आहे.

माहितीचा स्रोत: 
ह. व्या. प्र. मं
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
तारीख/वेळ: 
शुक्रवार, July 11, 2014 - 21:30
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कार्यक्रमासाठी खुप खुप शुभेच्छा. निमंत्रणा बद्दल आभार.

आपल्या श्वशुरांच्या कार्याची चांगली ओळख करुन दिली आहे.