पाहताक्षणी गुलाम झाले, तिच्यासवे प्रेम काल झाले!

Submitted by profspd on 5 July, 2014 - 02:11

पाहताक्षणी गुलाम झाले, तिच्यासवे प्रेम काल झाले!
तिच्या मनाच्या देवडीवरी मन माझे द्वारपाल झाले!!

पहा तरी प्रेमाची कांती, तिच्यावरी जी विलसत आहे....
सावळ्यावरी प्रेम करोनी, गाल कसे लाल लाल झाले!

स्वाभिमान जपला, जपली अस्मिता आपली जन्मभरी पण....
खरे सांगतो, या जीवाचे हयातभर हाल हाल झाले!

प्रश्न असे काही होते जे जन्मभरी मागेच लागले.....
शोधावी मी किती उत्तरे? उत्तारातुनी सवाल झाले!

दिसायला माणसे चकाचक, संभवीत अन् सोज्वळ निव्वळ....
मनात डोकावता समजले, लोक किती ते बकाल झाले!

मी न बोललो, ती न बोलली शब्द एकही चकार कुठला....
मुके ओठ होते पण सारे डोळ्यांनी जाबसाल झाले!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

म्हणून सोसू शकतो आहे विरहाचा मी तुझ्या कडाका....
ऊब द्यायला धावत आले तुझे स्मरण बघ दुशाल झाले!

-------प्रा.सतीश देवपूरकर