नुसत्या पडून माझ्या भरगच्च त्या वखारी....
जमलीच ना कधीही मजला दुकानदारी!
मजलाच कर्ज झाले, फेडायचे अता ते....
नाही वसूल करता आली मला उधारी!
‘नाही’ म्हणावयला जमलेच ना कधीही....
माझा स्वभाव होता जात्या परोपकारी!
दु:खास टाळले ना कवटाळले सुखाला...
दोन्हींमुळेच आली जगण्यामधे खुमारी!
सोडून हाय, गेला एकेक दात मजला....
आता न पान खातो, खातो न मी सुपारी!
डोळे मिटून माझे आयुष्य खेळते हे....
हा कैफ जिंकण्याचा करतो मला जुगारी!
इतकीच फक्त इच्छा, यारास मी म्हणालो....
कर वार पण, असा कर लागेल जो जिव्हारी!
झाली महाग आता प्रत्येक गोष्ट इतकी....
गरिबास जाळते ही आता उपासमारी!
हे हात बांधलेले, अन् ओठ टाचलेले....
हुद्दा महान माझा पण, फक्त नामधारी!
नसतील उच्च पदव्या, असतील फाटकीही....
दिसतेच माणसांची कोठे तरी हुशारी!
निवृत्त जाहल्याने भरपूर वेळ असतो!
मी आणि गझल माझी करतोच मौज भारी!!
-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१
डोळे मिटून माझे आयुष्य खेळते
डोळे मिटून माझे आयुष्य खेळते हे....
हा कैफ जिंकण्याचा करतो मला जुगारी!<<<< अफाट आवडला हा शेर
मी आणि गझल माझी करतोच मौज भारी!! <<< << होणार्यची मौज होते जाणार्याचा जीव जातो

धन्यवाद
धन्यवाद
दु:खास टाळले ना कवटाळले
दु:खास टाळले ना कवटाळले सुखाला...
दोन्हींमुळेच आली जगण्यामधे खुमारी! >>>> क्या बात है ...
धन्यवाद
धन्यवाद