आशा भोसले - तुझ्या नि माझ्या...

Submitted by लाल्या on 4 July, 2014 - 03:20

मी आणि लहु पांचाळ - आम्ही दोघं "लहु-माधव" म्हणून संगीत दिग्दर्शन करतो. आमच्या आगामी "ध्यास" या चित्रपटामधील हे गीत.

स्वर- आशा भोसले.
संगीत - लहु-माधव.
शब्द - मंदार चोळकर.

http://www.youtube.com/watch?v=YZAYH-NQODc

आपली प्रतिक्रिया नक्की कळवा.

- माधव.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लाल्या भाऊ, आमच्या ऑफिसात तु-नळीला बंदी असल्यामुळे ऐकु शकत नाही. त्यामुळे प्रतिसाद देऊ शकत नाही.
बादवे मंदार चोळकर माझा वर्गमित्र त्यामुळे ऐकायला नक्की आवडेल.

मस्त झालंय गाणं....
आवडलं, इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद नाहीतर कधी ऐकायला मिळाले असते देव जाणे Happy

फारच सुरेख आहे हे गाणं. अतिशय परिणामकारक शब्द आणि चाल.

आवाजाबद्दल बोलण्याची तर माझी पात्रता नाही.

अभिनंदन आणि शुभेच्छा. Happy

मंदारला बरेच दिवस आधीपासून ओळखतो. त्याच्या शब्दांची जादू अनेकदा अनुभवली आहे. हे गाणे ऐकले नाही आणि दुर्दैवाने ऑफिसात ऐकणे शक्य नाही ! Sad

आशा ताई दैवत आहेत. त्यांनी गाणे स्वीकारले ह्यातूनच समजून येते की सुंदरच असणार.

अभिनन्दन व मन:पूर्वक शुभेच्छा ! Happy

लहु माधव नाव गाजणार खास.आशाताइंच्या आवाजात पहिल गित होण भाग्याचच. मंदार यांच्या शब्दाला तुमच्या सन्गिताची सुन्दर जोड मिळालि आहे.शेवटचा आलाप भिडणारा..पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.ती नक्किच उज्ज्वल असणार.

शब्द चांगले आहेत, संगीतही छानच आहे, पण आशाताईंचा आवाज फार म्हणजे फारच थकल्यासारखा वाटत आहे.
या गीतामधे असेच अपेक्षित असेल तर काही म्हणणे नाही, पण अन्यथा नेहेमीसारखा उत्साही सूर वाटत नाही. Sad

महेशजी....गाणं विरहाचं आहे....त्यांत उत्साहापेक्षा भावना महत्त्वाच्या....त्या नक्कीच ताईंनी छान व्यक्त केल्या आहेत! आणि एक गोष्ट ध्यानात ठेवावी लागेल....हे गाणं गातांना ताईंचं वय ८० होतं.....माझ्या ओळखीत कोणीही ८० वर्षीय व्यक्ती इतका गाण्यात दम भरू शकत नाही....या ताकदीने आजच्या कोणीही हे गाणं डेलिव्हर करणं माझ्या मते खूप म्हणजे खूप कठीण आहे....आणि हे मी या क्षेत्रातील माझ्या २० हून जास्त वर्षांच्या अनुभवावरून सांगतोय!

प्रतिक्रियेसाठी सगळ्यांचे मनापासून आभार!

जयश्रीजी, अंजलीजी, आणि शोभनाताई...तुम्हा सर्वांचे पण खूप धन्यवाद.

- माधव.

>>माझ्या ओळखीत कोणीही ८० वर्षीय व्यक्ती इतका गाण्यात दम भरू शकत नाही....या ताकदीने आजच्या कोणीही हे गाणं डेलिव्हर करणं माझ्या मते खूप म्हणजे खूप कठीण आहे

हो हे मात्र खरेच, या लोकांच्या एवढी कन्सिस्टन्सी अनेक वर्षे अन्य कोणी देऊ शकेल असे वाटत नाही.
धन्यवाद !

धन्यवाद रियाजी...गाणं ऐकून नक्की प्रतिक्रिया कळवावी.

धन्यवाद गोष्टीगावाचे....(बादवे...गोष्टी गावाचे...तुमच्या युजरनेम वरून आठवलं...जमल्यास मी लिहीलेलं "एक होतं गाव" वाचा....)

महेश...लाखाचं बोललात!

साधनाजी...तुमचे देखील आभार!

सुंदर गाणं:)

शब्द वाह! चाल आहाहा! आवाजाबद्दल मी काय बोलू?
अगदी पोहचतंय गाणं Happy

ऑल द व्हेरी बेस्ट Happy

पुन्हा पुन्हा ऐकतेय हे गाणं मी Happy

खूप खूप खूप सुंदर झालय गाणं.

आशाचा आवाज थकला आहे पण इतक्या सुंदर चालीला न्याय देऊ शकणारा दुसरा पर्याय नाहीच.

पुढील वाटचालीकरता शुभेच्छा.

Pages