याद तुझी रेंगाळत असते!

Submitted by profspd on 2 July, 2014 - 13:28

याद तुझी रेंगाळत असते!
एकांताला सोबत असते!!

कुठे पाहतो, कुणास कळते?
तुला नजर ही शोधत असते!

जड पायांनी चालत असतो......
पण, माझे मन धावत असते!

बेतल्यावरी प्रसंग, कळले......
बेत, दैव पण आखत असते!

मला लागते झोप परंतू........
स्वप्न बिचारे जागत असते!

पुढे निसरडे, मीच वेंधळा.......
वाट मला हे सांगत असते!

मी निजतो पण गझल बिचारी......
अक्षर अक्षर जमवत असते!

वाट तमाची पण, हृदयी या.......
ज्योत एक तेजाळत असते!

सुके भराभर जळते तेव्हा.......
ओले सुद्धा पेटत असते!

मला यायला उशीर होता.......
घर माझे, क्षण मोजत असते!

उपकारांची याद तुला, पण......
कुणी कुणी ते विसरत असते!

चोरपावलांनी येता तू.......
निरोप चाहुल धाडत असते!

खळी तुझी पाहून गोड ती......
कळी कळी बघ, लाजत असते!

कसे तुझ्याशी बोलायाचे?
हृदयी धडधड वाढत असते!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरेच शेर आवडले सर

धन्यवाद!!!

तिसरा शेर सर्वांत जास्त आवडला

Happy

देवपूरकर,

एकदम झ्याक गझल. आवडली. ही गझल कुणाला आवडो ना आवडो पण कुणी नावे ठेवणार नाहीत. यापासून योग्य तो बोध तुम्ही घेतला पाहिजे.

ही फारफार वर्षांपूर्वी लिहिलेली गझल असावी. जेव्हा तुमच्या मेंदूत अहंकाराचा आणि आत्मप्रौढीचा व्हायरस शिरायचा होता.

स्वतःला Factory setting वर Restore करून Backup घ्या. Happy

छान वाटले गझल वाचून
सगळे शेर छान जमून आलेत

बेत ह्या शब्दाच्या छान वापरामुळे तो शेर खास वाटला इतरही आवडलेच आहेतच

धन्यवाद