Submitted by profspd on 30 June, 2014 - 11:17
दमादमाने मजला कातर!
तुझ्या यशाला व्हावी झालर!!
नको मला तुमची पक्वान्ने....
सुखी खाउनी मीठ नि भाकर!
माझी माझी जमीन म्हणती....
कधी न धरला हाती नांगर!
उघड्यावरही गाढ झोपतो....
भुईच जाजम, नभ ही चादर!
हाकेचे तर अंतर उरले....
उचल पाय अन् चल तू भरभर!
उचंबळू लागते हृदय हे....
गझल झरे मग माझी झरझर!
मधुमेही का इथले शायर?
गझलांची ना चालत साखर!
पहा गरळ ही गझलांवरची....
किती खटकतो माझा वावर!
‘हो’ म्हण किंवा ‘नाही’ म्हण तू....
करू नको पण, नंतर जर-तर!
जणू लोक तांदूळ बास्मती....
अन् मी त्यांच्यामधील कंकर!
हवी तेवढी करा टवाळी.....
मन हे माझे झाले पत्थर!
लिहितो गझला तिच्या कृपेने....
सरस्वतीची मजवर पाखर!
-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पहाड तू आहेस
पहाड तू आहेस विसरतो.....
अश्रू आवर, स्वत:स सावर!
...............प्रा.सतीश देवपूरकर