माणसे गेली पुढे जी माठ होती!

Submitted by profspd on 30 June, 2014 - 07:56

माणसे गेली पुढे जी माठ होती!
जानव्याची आड आली गाठ होती!!

ब्रह्मदेवाने तुझ्या-माझ्यात सखये....
बांधली ही रेशमी निरगाठ होती!

वेंधळा मी, हेच का विसरून गेलो?
मी मनाला बांधली खुणगाठ होती!

त्या टवाळांना अता समजेल नक्की.....
की, कुणाशी आज पडली गाठ होती!

माझिया पाठीसही डोळेच होते!
वाटले मारेक-याला पाठ होती!!

शोधले त्यांनी नवे कोरे बहाणे....
मज जुनी सारी निमित्ते पाठ होती!

चालले काळापुढे काही न त्यांचे....
माणसे झुकलीच ती, जी ताठ होती!

गोडवा हृदयात फणसाचाच होता....
माणसे वरुनी दिसाया राठ होती!

गझल, प्रेमानेच ओथंबून गेली.....
प्रेम, करुणा आत काठोकाठ होती!

लगडल्या गझला तरूंना त्या भटांच्या.....
ठिकठिकाणी पेरलेली बाठ होती!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ताठ

माणसे गेली पुढे जी माठ होती!
जानव्याची आड आली गाठ होती!!

ब्रह्मदेवाने तुझ्या-माझ्यात सखये....
बांधली ही रेशमी निरगाठ होती!

या दोन्हीमध्ये काय संबंध आहे का?

त्यालाच गझल म्हणतात हो. पूर्वी तवायफला म्हणे म्हातारे, मध्यमवयीन, तरुण वगैरे सगळ्यांची मर्जी राखायला प्रत्येक गटाला आवडतील असे शेर म्हणायला लागायचे. तीच परंपरा हे लोक अजून चालू ठेवतात. तर ते असो.

मला काव्यलेखनातले काही कळत नाही. पण हल्ली मायबोलीवर आले की काव्यलेखनाशिवाय दुसरे काही दिसत नाही. वेळ जात नव्हता म्हणून काहीवेळा काव्यलेखनाचे वाचन होते. आता खूपच वेळ आहे तर हे काव्य जाणून घ्यायचा यत्न करते.....

माणसे गेली पुढे जी माठ होती!
जानव्याची आड आली गाठ होती!!>>>>धावण्याची शर्यत चालू आहे. पण जानव्याची गाठ कुठेतरी रुतते म्हणून ती सोडण्यात वेळ गेला आणि माठ(जाडी?) माणसे सुद्धा पुढे पळून गेली.

ब्रह्मदेवाने तुझ्या-माझ्यात सखये....
बांधली ही रेशमी निरगाठ होती!>>>>जुळून येती रेशीम गाठी

वेंधळा मी, हेच का विसरून गेलो?
मी मनाला बांधली खुणगाठ होती!>>>काहितरी मनाशी पक्के ठरविले होते. पण नक्की कॉय बरं?

त्या टवाळांना अता समजेल नक्की.....
की, कुणाशी आज पडली गाठ होती!>>>चांगली अद्दल घडवली!!!

माझिया पाठीसही डोळेच होते!
वाटले मारेक-याला पाठ होती!!>>>ते मारायला आले, त्यांन्ना वाटले कि माझे लक्षच नाहीये पण माझे लक्ष होतेच.

शोधले त्यांनी नवे कोरे बहाणे....
मज जुनी सारी निमित्ते पाठ होती!>>>मला त्यांचे सगळे बहाणे माहित आहे म्हणून नवीन बहाणा करून त्यांनी मला कटवले.

चालले काळापुढे काही न त्यांचे....
माणसे झुकलीच ती, जी ताठ होती!>>>उंच माणसे म्हातारी झाली कि वाकतात.

गोडवा हृदयात फणसाचाच होता....
माणसे वरुनी दिसाया राठ होती!>>>कडक माणूस पण मनातून गोड फणस!

गझल, प्रेमानेच ओथंबून गेली.....
प्रेम, करुणा आत काठोकाठ होती!>>>प्यारभरी गझल.

लगडल्या गझला तरूंना त्या भटांच्या.....
ठिकठिकाणी पेरलेली बाठ होती!>>>भटांनी पेरलेल्या बाठीला गझला लगडल्यात असे काही

अहो आवरा तुमचा हा गझल पसारा
गझला वाचुन वेडापिसा झाला माबो सारा

गझल के शेर पढ के गालिब भी हारा
और खुदखुशी कर बैठे वीर - झारा...

बोलो तरारा बोलो तारारा अरारा

----------
आता यमक जुळवायचे असतील तर .. Wink

प्रोफेसर साहेब,

मी एक सामान्य वाचक म्हणुन लिहित आहे. मी कुठल्याही गटाचा नाही, कुठल्या कंपुचा नाही. आपला आधी परिचय नाही आणि मला आपल्याबद्दल आकसही नाही पण हे जे काही चालले आहे हे मला बरोबर वाटत नाही. तुमच्या सगळ्या गझला या कोणाला तरी दोष देण्याच्या, उत्तर देण्याच्या हेतुने लिहिलेल्या आहेत. आपण या हेतुने गझला लिहिण्यात जी उर्जा घालवत आहात त्यापेक्षा तुमच्या हृदयाला भिडेल अशा विषयावर लिहिलेत तर फार चांगले होइल.
मी स्वतः गझला लिहिल्या नसल्या तरी "श्वास तुझा मालकंस..स्पर्श तुझा पारिजात" अशा ओळींमधे भरलेले सौंदर्य मी सामान्य असुनही कळते. माझ्या अनुभवाप्रमाणे मायबोलीवर Biased रसिक फार कमी आहेत.. एखादी चांगली गझल, चांगली कलाकृती दिसली की ती डोक्यावर घ्यायची प्रवृत्तीच आहे मग ती कोणाचीही असो. मी आपल्या लिहिलेल्या गझला कुतुहलाने वाचायला जातो की एकदातरी काहीतरी चांगले दिसेल.. पण अजुनपर्यंत निराशाच पदरी आली आहे.
अशा १० गझला लिहुन हसे होण्यापेक्षा १ च लिहा पण अशी लिहा की सगळ्याना लक्षात राहील. आपण माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहात त्यामुळे आपल्याला उपदेशपर लिहिणे मला बरे वाटत नाही पण आपली चाललेली घालमेल पाहवत नाही. म्हणुन हा लेखनप्रपंच.

धन्यवाद.

माफ करा बाई मी वाचकाना काही कळत नाही असे म्हटले नव्हते तुम्हाला म्हणजे डी विनीताला कळत नाही असे म्हणालेलो इतरांवर ढकलू नका आता

वाचकाना काही कळत नाही असे म्हणणारे नि त्यांचे अपमान करणारे कुठे आहेत आता?
<<
विनिता,
इथं गझलेवर काही बोललं तर अर्वाच्च्य भाषेत अपमान करणारे, पिढ्यानपिढ्या गझला करणारे गझलुद्दिन बरेच आहेत. Wink
तेव्हा मनाला लावून घेऊ नका.

विनिता,
इथं गझलेवर काही बोललं तर अर्वाच्च्य भाषेत अपमान करणारे, पिढ्यानपिढ्या गझला करणारे गझलुद्दिन बरेच आहेत. डोळा मारा
तेव्हा मनाला लावून घेऊ नका.<<<

Lol

"माणसे गेली पुढे जी माठ होती!
जानव्याची आड आली गाठ होती!"

आरक्षणावरची कमेंट दिसते आहे.

>>माफ करा बाई मी वाचकाना काही कळत नाही असे म्हटले नव्हते तुम्हाला म्हणजे डी विनीताला कळत नाही असे म्हणालेलो इतरांवर ढकलू नका आता Lol

एक स्वप्नवत शेर ......आत्ताच पाहिलाय ....सॉरी पाडलाय

देवसर गझलेतुनी निवृत्त झाले
गझलनिवृत्ती लिमिट वय साठ होती

म्हटलं हा एकच काफिया राहिलाय बिचारा त्याला एकटे कशाला सोडायचे