वेचती कोयीच, गर जातोच वाया!

Submitted by profspd on 29 June, 2014 - 10:39

वेचती कोयीच, गर जातोच वाया!
आणि मी वेड्यांस देतो आमराया!!

दर्शनी हे वृक्ष डेरेदार नुसते....
लागते दानत अरे, देण्यास छाया!

मी न जातो झुंजण्या कोणासवेही....
चालती माझ्यासवे माझ्या लढाया!

दम न एकाही अरे, गझलेत त्यांच्या....
मारती गझलेवरी नुसत्या बढाया!

आडवी करतेच प्रत्येकास अंती....
बाटलीला सारखे बापे नि बाया!

का न ढासळणार इमले सांग, त्यांचे?
ना कुणाचाही अरे, मजबूत पाया!

ही अनागोंदी किती बोकाळलेली....
तूच या देशास वाचव रामराया!

माणसे येतात कामाला अखेरी....
माणसांखेरीज कामाची न माया!

कोण आपण, हे प्रथम जाणून घे तू.....
तू स्वत: म्हणजे तुझी ना दृश्य काया!

शेवटी आई अरे, आईच असते....
स्थान आईचे कसे घेईल आया?

पळभरी बिलगून तू गेलीस मजला....
जन्मभर मी लागलो बघ मोहराया!

दार माझ्याही नशीबाचे उघडले!
स्वप्न माझे लागले साकार व्हाया!!

भावगंधाने गझल गंधीत होते!
अत्तराचा काय रे, करणार फाया?

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

प्रोफेसर देवपूरकर तुमच्या गझला मला आवडतात. गझल, हझल हे प्रकार कळत नसले तरी इथे तुम्ही, बेफिकीर, सुप्रिया, वैवकु, रसप, जयदीप, उल्हास भिडे आणी अजून कोणी लिहीत असेल त्यान्चे नाव विसरल्यास क्षमस्व, सगळ्यान्च्या गझला, कविता मला आवडतात.

पण तुम्ही सोडलात तर इथे बरेच जण रसिकान्चा व वाचकान्चा मान राखुन कधीतरी गझल लिहीत असतात. त्यामुळे गझलान्चा दर्जा, सातत्य यात खरच प्रामाणीक पण राखला गेला आहे.

पण तुम्ही इथे जे एका मागोमाग एक गझला लिहीत आहात/ टाकत आहात, त्यामुळे त्या गझलान्चे आणी पर्यायाने गुलमोहराचे पण गान्भिर्य नष्ट झाले आहे. रसिकान्चा अन्त पहाण्यापेक्षा तुम्ही थोडे सिलेक्टीव्ह का होत नाही?

चकल्या पाडाव्या तशा गझला इथे येत आहेत. लग्नाच्या पन्क्तीत माणसानी रान्गेत उभे रहावे तसे तुमच्या गझला एका मागोमाग येत आहे असे वाटत नाही का तुम्हाला?

सुचनेचा विचार करा. नाहीतर एखादे ललित लिहायला घ्या. नो दिवा प्लीज

@रश्मी..
अशा विनंत्या, अर्ज वगैरे बरच काही करुन झालं आहे, उपयोग होत नाही. बहुतेक लोक्स फक्त प्रतिक्रिया वाचायला आणि टाकायला येतात (गझल न वाचता).

रश्मी, तुम भी इनको समजाने का ट्राय कर रेली हो?
मै पिछली बार थक गयी समजाते समजाते Uhoh

काही उपयोग होत नाही ट्रस्ट मी!
असो!