जन्मभर उपवास पडुनी मूक होती!

Submitted by profspd on 28 June, 2014 - 07:10

जन्मभर उपवास पडुनी मूक होती!
स्वाभिमानी केवढी ती भूक होती!!

मी चुका केल्या, न शिकलो शष्प काही....
हीच माझी फार मोठी चूक होती!

मी चढण चढलो खरे, अवघड परंतू......
वाट परतीची किती अंधूक होती!

पाहुनी मजला गगन झाले स्तिमित का?
झेप गगनाला कुठे ठाऊक होती?

ना भुकेची, ना तहानेचीच चिंता....
माणसे वारीतली भावूक होती!

विश्व माझे वेगळे, त्यांचे निराळे....
मी गरुड, ती माणसे मंडूक होती!

नाचवाया लागला दुनियेस सा-या....
त्याचियापाशी म्हणे बंदूक होती!

जाहली चर्चा न माझ्या वंचनेची....
बाब ती माझी जरा नाजूक होती!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< मी चुका केल्या, न शिकलो शष्प काही.... >>

कठीण आहे.
एकतर अर्थ चुकीचा सांगितलाय कोणीतरी किंवा अर्थ माहितच नाही आणि केवळ दुसरे म्हणतात म्हणून लिहिलाय.

समजून उमजून लिहिला असेल तर मात्र आपण उपचार वगैरेचं बघाच कृपया !

वृत्ताचे बंधन आहे म्हणून नाही तर तिथे 'घंटा' जास्त शोभला असता आणि कसा अगदी नियमित वापरातला असल्याने लगेच रिलेटही झाला असता.