सुंदरसे रुखवत
देण्याघेण्यावरुन अनेक नवविवाहीतांना खुप छळ सहन करावा लागतो. अगदी बाई नवविवाहीत असते तेंव्हा पासुन ते तीच्या पोराबाळांच्यालग्नात सुध्दा तिच्या लग्नातल्या देण्याघेण्याचा उध्दार केला जातो. आज मात्र काही वेगळेच ऐकले.
कॉलेजमध्ये गेले तेंव्हा आमच्या जोशी मॅडम भेटल्या. त्या काल एक लग्नाला जायच्या होत्या. आज त्या लग्न कसं झालं हे सांगायला लागल्या तेंव्हा क्षणभर मी दुर्लक्ष केलं कारण लग्न म्ह्टले की मानपान, साड्या, दागीने, जेवण हेच तर विषय असतात आणि त्यावर खुप गप्पा माराव्यात असे काही मला वाटले नाही.त्यामात्र खुप उत्साहात सांगत होत्या. “ मॅडम, अहो काल लग्नाला गेले होतेना, तीथे रुखवत इतकं छान होतं, असं मी कधीच पाहीलं नव्हतंहो! मी गप्पच. म्हटलं काय पुर्वीच्या काळी मुलींना आपल्या अंगचे कला, गुण, कौशल्य लोकांना कळण्याचा काहीच मार्ग नव्हता. असे छान गुण, कला लोकांपर्यंत विशेषता ही मुलगी ज्या घरची सुन होणार आहे त्यांना कळावे हा खरा रुखवताचा उद्देश होता. अलीकडच्या काळात मात्र काहीजणांनी त्याचाही बाजार मांडला आहे.
जोशी मॅडमचा उत्साह मात्र वाढतच होता.”मॅडम रुखवतात काय असेल सांगा बरं? मी फक्त प्रश्नार्थक चेहेरा केला.त्या सांगायला लागल्या “ अहो मुलाकडच्यांनी सांगीतले की आमच्याकडे सर्वकाही भरपुर आहे. आम्हाला रुखवत वगैरे काहीही नको. मुलीच्या वडीलांनी तरिही छानसे रुखवत मांडले. आपल्या लाडक्या लेकीच्या वाचनाची आवड स्मरुन रुखवतरुपाने अनेक पुस्तके मांडली होती. त्यात सगळ्या प्रकारची पुस्तकं होती. पाकशास्त्र, ललित, आत्मचरित्र,प्रवास वर्णनं,माहितीपर…… मला एकडम भरुन आलं. मनातल्या मनात त्या मुलीच्या वडीलांना मी मनापासुन नमस्कार केला.लाडु, चिवडा, शेवयाची शिदोरी लेकीला फारतर वर्षभर पुरली असती.पण या द्रष्ट्या पित्याने आपल्या लेकीला जन्मभर पुरेल अशी शिदोरी दिली.त्यापुढे त्या नववधुला मी सांगेन “बाईग तुझ्या पित्याने जो वसा घेतला तोच तु पण घे. ऊतुनको मातु नको घेतला वसा टाकु नको. त्याच त्या स्टाफरुमचा कोपरा एकदम लख्ख प्रकाशानं भरुन गेलाय असं मला वाटलं आणि असंही वाटलं आता खरी पहाट झाली, नक्कीच थोड्यावेळात उजाडु लागेल.
*************
अविस्मरणिय रुखवत.
Submitted by सुभाषिणी on 28 June, 2014 - 05:50
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मुलीच्या वडीलांनी तरिही छानसे
मुलीच्या वडीलांनी तरिही छानसे रुखवत मांडले. आपल्या लाडक्या लेकीच्या वाचनाची आवड स्मरुन रुखवतरुपाने अनेक पुस्तके मांडली होती. त्यात सगळ्या प्रकारची पुस्तकं होती. पाकशास्त्र, ललित, आत्मचरित्र,प्रवास वर्णनं,माहितीपर…… >>>>> क्या बात है ....
खरेच, अशा नॉव्हेल प्रकारांना खूप प्रसिद्धी मिळाली पाहिजे ....
हा आगळावेगळा अनुभव शेअर केल्याबद्दल मनापासून धन्स ....
mast
mast
छानच..
छानच..
छानच
छानच
वा!
वा!
छानच कल्पना आणि लिहिलयं ही
छानच कल्पना आणि लिहिलयं ही छान.
मस्त कल्पना
मस्त कल्पना
माझ्या सख्ख्या मैत्रीणीच्या
माझ्या सख्ख्या मैत्रीणीच्या लग्नात असेच रुखवत होते, पुस्तकांचे!
छान
छान
कल्पना खूपच आवडली.
कल्पना खूपच आवडली.
वा! मस्त कल्पना.
वा! मस्त कल्पना.
खुप सुंदर! मलाही असचं रुखवत
खुप सुंदर!
मलाही असचं रुखवत हवं
वा! छान!
वा! छान!
कल्पना आवडली.
कल्पना आवडली.
छान पण रात्रभर स्टाफरूम मधे
छान


पण रात्रभर स्टाफरूम मधे कोण होते ते नाही कळाले ?
की रूखवत स्टाफरूम मधे ठेवले होते ?
सुरेख कल्पना! सुभाषिणी, लहान
सुरेख कल्पना! सुभाषिणी, लहान मुलान्चे लेखक श्री राजीव ताम्बे यानी पण त्यान्च्या कन्येच्या लग्नात अशीच भेट दिली होती असे लोकसत्तात वाचले होते.:स्मित:
छान कल्पना !
छान कल्पना !
मस्तच. चांगली कल्पना. असंच
मस्तच. चांगली कल्पना. असंच रुखवत असायला पाहिजे.
रश्मी हेच आठवत होते.
रश्मी

हेच आठवत होते.
रच्याकने - रुखवत का ठेवतात.
रच्याकने - रुखवत का ठेवतात. आणि रुखवत मांडण्यामागचे औचित्य काय असावे?
खुप छान... आवडले...
खुप छान... आवडले...
स्तुत्य उपक्रम < रच्याकने -
स्तुत्य उपक्रम
< रच्याकने - रुखवत का ठेवतात. आणि रुखवत मांडण्यामागचे औचित्य काय असावे? >
<<पुर्वीच्या काळी मुलींना आपल्या अंगचे कला, गुण, कौशल्य लोकांना कळण्याचा काहीच मार्ग नव्हता. असे छान गुण, कला लोकांपर्यंत विशेषता ही मुलगी ज्या घरची सुन होणार आहे त्यांना कळावे हा खरा रुखवताचा उद्देश होता.>> हे असं वर लिहिलं आहे , मला माहीत नाही.
सगळयांचे खुप आभाऱ.आणि हो ही
सगळयांचे खुप आभाऱ.आणि हो ही दाद त्या डोळस पित्याच्या कल्पनेला आहे
.
छान !
छान !
खूप छान कल्पना, त्या रुखवताचा
खूप छान कल्पना, त्या रुखवताचा फोटो काढून फेसबूकावर शेअर करावा अशी ...
पुर्वीच्या काळी मुलींना
पुर्वीच्या काळी मुलींना आपल्या अंगचे कला, गुण, कौशल्य लोकांना कळण्याचा काहीच मार्ग नव्हता. असे छान गुण, कला लोकांपर्यंत विशेषता ही मुलगी ज्या घरची सुन होणार आहे त्यांना कळावे हा खरा रुखवताचा उद्देश होता.>> मग पुस्तकांचं रुखवत हे त्या उद्देशात बसतं का? का आमची मुलगी किती प्रकारचं वाचन करते किंवा करू शकते हे दाखवायचा उद्देश?
मुळात आजच्या काळात जेव्हा रुखवतातल्या सगळ्या गोष्टी विकत आणलेल्या असतात तेव्हा रुखवत या प्रकाराला जुन्या चालीरिती निरर्थक पणे चालवणे ह्याशिवाय काय वेगळा अर्थ आहे.
असो. ज्याची त्याची इच्छा
पण जेव्हा लेखाची सुरुवात <<देण्याघेण्यावरुन अनेक नवविवाहीतांना खुप छळ सहन करावा लागतो. अगदी बाई नवविवाहीत असते तेंव्हा पासुन ते तीच्या पोराबाळांच्यालग्नात सुध्दा तिच्या लग्नातल्या देण्याघेण्याचा उध्दार केला जातो. >> अशी होते तेव्हा त्या रुखवताची पद्धतच चूक आहे असे मला तरी वाटते.
अशा रुखवताची कल्पना आवडली.
अशा रुखवताची कल्पना आवडली. मुलीला वाचनाची आवड असेल तर मस्तच आणि तिच्या सासरच्या लोकांनाही असेल तर सोने पे सुहागा!!
पुर्वीच्या काळी मुलींना आपल्या अंगचे कला, गुण, कौशल्य लोकांना कळण्याचा काहीच मार्ग नव्हता. असे छान गुण, कला लोकांपर्यंत विशेषता ही मुलगी ज्या घरची सुन होणार आहे त्यांना कळावे हा खरा रुखवताचा उद्देश होता.>>हो. पण नंतर त्याची जागा विकतच्या कला-कौशल्याच्या वस्तूंनी घेतली....आणि त्याही नंतर स्वयंपाकाची सर्व भांडी, वॉशिंग मशीन, फ्रिज, पलंग, कपाट थोडक्यात घर-संसाराने घेतली.
स्तुत्य .
स्तुत्य .