काय उरले अता बोलण्यासारखे?

Submitted by profspd on 27 June, 2014 - 09:47

काय उरले अता बोलण्यासारखे?
हे तडे ना अरे, जोडण्यासारखे!

तू नि मी भरदुपारी असे जायचो.....
ऊन्ह वाटायचे चांदण्यासारखे!

मी अनुप्रास साक्षात, गझलेतला.....
नाव माझे न हे खोडण्यासारखे!

मी न दु:खे कधी थाटली, सजवली.....
हे प्रदर्शन नसे मांडण्यासारखे!

फाटके शीड, तुटके सुकाणू असे....
हे न गलबत जळी सोडण्यासारखे!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तू खरा, मीच खोटा, जरी मानले.....
हे न मुद्दे अरे, भांडण्यासारखे!

................प्रा.सतीश देवपूरकर