समस्त मायबोलीकरांनो .....
सालाबादप्रमाणे याही वर्षी घेऊन येत आहोत, मायबोलीकरांकरता आणि त्यांच्या कुटुंबीयांकरता आपल्या लाडक्या मायबोलीचा `वर्षा विहार २०१४'...वर्ष बारावे....
यात नवीन असे काय ? असा प्रश्न पडला असेल तर ज्या मायबोलीकरांनी अनुभवलाय त्यांना विचारा...
मायबोली वर्षा-विहार हा एक असा उपक्रम ज्यात मायबोलीवरचे सभासदच नव्हेत तर त्यांचे कुटुंबीयही सहभागी होऊ शकतात. मायबोलीवरचं लेखन, इथे चालणार्या गप्पा, चर्चा, चेष्टा-मस्करी (आणि क्वचित काही तात्विक मतभेद सुध्दा तसेच इतर अनेक उपक्रम याबद्दल समस्त मायबोलीकरांचे कुटुंबीय रोज काही ना काही ऐकतच असतात. त्या गप्पा, ती धमाल त्यांना प्रत्यक्ष अनुभवायला मिळते ती वर्षाविहाराच्यादिवशी. वविच्या दिवशी नवीन भेटीगाठी होतात, ओळखी होतात, आधीच्या ओळखींचं मैत्रीत रुपांतर होतं, मैत्रीचे नवीन धागेही विणले जातात. सगळे वाद, स्पर्धा बाजूला ठेवून , मतभेद बाजूला सारुन, नवीन ओळखी आणि मित्र बनवण्याचा हमखास मेळा म्हणजे मायबोली वर्षाविहार ...
यंदाचा हा मैत्रीचा सोहळा संपन्न होणार आहे २७ जुलै २०१४ या दिवशी, एस पी फार्म्स (पेण पासुन ५ किमी. अंतरावर) येथे.
पण मंडळी, तो दिवस साजरा करण्याची पूर्वतयारी म्हणून काही गोष्टी नियमानुसार आणि ठराविक दिवसांत करणं गरजेचं आहे.
त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे वविला येणार्यांची नावनोंदणी.
वविला registered मायबोलीकर आणि त्यांचे कुटुंबीय (पती/पत्नी/मुले) येऊ शकतात.
नावनोंदणी करण्यासाठी इथे टिचकी मारा. टिचकी मारल्यानंतर येणार्या नोंदणी फॉर्ममध्ये दिलेली सर्व माहिती भरणे आवश्यक आहे.
नावनोंदणीची अंतीम तारीख आहे १९ जुलै २०१४.
नावनोंदणीचे काम पूर्ण झाले की पुढचे महत्त्वाचे काम म्हणजे पैसे जमा करणे.
वर्षाविहार-२०१४ ची वर्गणी आहे :
मुंबईसाठी :-
प्रौढ आणि दहा वर्षावरील मुले : रु. ९५० /-प्रत्येकी. (रिसॉर्ट : रु. ६७५, बस : रु. २५० , सांस खर्च : रु. २५)
मुले (वय ३ ते १० वर्षे) : रु. ३५०/- प्रत्येकी. (रिसॉर्टः रू.३५०)
पुण्यासाठी:-
प्रौढ आणि दहा वर्षावरील मुले : रु. १००० /-प्रत्येकी. (रिसॉर्ट : रु. ६७५, बस : रु. ३००, सांस खर्च : रु.२५)
मुले (वय ३ ते १० वर्षे) : रु. ३५०/-प्रत्येकी (रिसॉर्ट : रु. ३५०)
*बसमध्ये या मुलांसाठी बसायला स्वतंत्र जागा हवी असेल तर बसचे जास्तीचे पैसे भरावे लागतील.बसमध्ये स्वतंत्र जागा हवी आहे की नाही यासाठी नोंदणी फॉर्ममध्ये माहिती दयावी.
(पुणे आणि मुंबई यांच्या बसच्या खर्चातला फरक हा पुण्यापासून वविच्या ठिकाणाचे अंतर मुंबईपेक्षा जास्त असल्यामुळे आणि प्रति कि.मी.चा पुण्याच्या बसचा दर मुंबईच्या बसच्या दरापेक्षा जास्त असल्यामुळे आहे. वविला येणारे सर्व पुणेकर मायबोलीकर हे नक्की समजून घेतील अशी खात्री आहे.)
३ वर्षांपर्यंतच्या मुलांना काहीही शुल्क नाही. (फक्त बसमध्ये बसायला जर या मुलांसाठी स्वतंत्र जागा हवी असेल तर बसचा खर्च फक्त करावा लागेल. बसमध्ये स्वतंत्र जागा हवी आहे की नाही यासाठी नोंदणी फॉर्ममध्ये माहिती दयावी.)
रिसॉर्ट च्या खर्चात सकाळचा चहा नाश्ता , दुपारचे जेवण , संध्याकाळी चहा स्नॅक्स यांचा आणि रिसॉर्टमधील सुविधांचा ( (तब्बल ६-७) स्विमींग पूल, रेन डान्स इ.) समावेश आहे.
वरील प्रवास खर्च हा मुंबईहून आणि पुण्याहून प्रत्येकी ५० माणसांप्रमाणे धरला आहे. लोकसंख्या कमी झाल्यास नोंदणी करणार्या सभासदांना प्रवास खर्च कदाचित थोडा जास्त येऊ शकतो ( तो खर्च माणसांच्या संख्येवर अवलंबून आहे.) त्यामुळे लवकरात लवकर नोंदणी करा.
पुणे आणि मुंबई येथे २० जुलै २०१४ या एकाच दिवशी वविचे पैसे जमा केले जातील.
वविचे पैसे जमा करण्याचे ठिकाण,दिवस आणि वेळ खालीलप्रमाणे:-
पुणे - स्थळ: बालगंधर्व नाट्यगृहाच्या तिकीटखिडकी शेजारील कट्टा. वेळ: २० जुलै २०१४, सं. ५.३० ते ८.००
मुंबई - स्थळ: शिवाजी पार्क, उद्यान गणेश मंदिराच्या प्रांगणात. वेळ: २० जुलै २०१४, सं. ५.३० ते ८.००
(ठाणे आणि वाशी येथील वेळ-ठिकाण लवकरच जाहीर केले जातील.)
समजा पैसे भरून जर आयत्यावेळी काही कारणाने वविला येणं रद्द केलं गेलं तर बसचे भाडे वजा करून उरलेले पैसे परत करण्यात येतील.
स्वतंत्र येणार्यांनी बसभाडे देण्याची अर्थातच गरज नाही.
ऑनलाईन पैसे भरणार्यांना ज्या अकाऊंटमध्ये पैसे भरायचे आहेत त्याची सर्व माहिती ईमेलने कळविली जाईल.जे बँक डिटेल्स ऑनलाईन ट्रान्सफरसाठी दिले जातील, त्या अकाऊंटमध्ये कृपया कॅश डिपॉझिट करु नये.
ऑनलाईन पैसे भरणार्यांनी २० तारखेपर्यंत कधीही पैसे भरले तरी चालतील. प्रत्यक्ष पैसे भरणार्यांना २० तारखेला पैसे द्यायला येणे काही कारणांनी शक्य नसेल त्यांनी त्या त्या शहरातील वविसंयोजकाना फोन करून २०च्या आधी भेटुन पैसे दिलेत तरी चालतील.
२० तारखेपर्यंत पैसे आले नाहीत तर मात्र नाईलाजास्तव केलेली नोंदणी रद्द करावी लागेल.
मुंबई आणि पुणे सोडुन इतर ठिकाणच्या तसेच भारताबाहेरील कोणालाही वर्षाविहारास येणे शक्य असेल तर त्यांनी जरूर यावे.
वर्षाविहार-२०१४ संयोजन समिती :
पुणे -
१.मल्लीनाथ - मल्लीनाथ करकंटी. (९९६०३६६५६६)
२.मयूरेश - मयूरेश कंटक (९९२२४०१७७८)
३.शुभांगी कुलकर्णी
मुंबई -
१.घारुआण्णा - संदिप खांबेटे (९८१९९९३६३४)
२.मुग्धानंद
३.राजू७६
वर्षाविहार जागेबाबत :-
एस पी फार्म्स
पेण-खोपोली रोड,
पेण पासुन ५ किमी अंतरावर, कामार्ली गावा नजीक.
पेण, रायगड - ४०२१०७.
संकेत स्थळ : http://spfarmhouse.in/
आपल्याला काही शंका असल्यास आपण या बाफवर वविसंयोजकांना मेसेज टाकू शकता.
वविची रुपरेषा साधारण अशी असेल......
सकाळी ९.३० वाजेपर्यंत पुणे व मुंबईच्या बसेस रिसॉर्टवर पोहोचतील
सकाळी ९.३० ते १०.३० न्याहारी
१०.३० ते १२.३० स्विमिंग पूल आणि रेन डान्स मधे धम्माल मस्ती.
१२.३० ते २.०० जेवण
२.०० ते ३.०० गप्पाटप्पा
३.०० ते ४.३० सा.स. मनोरंजन
४.३० वाजता चहा व स्नॅक्स
५.३० वाजता जड अंत:करणाने आपापल्या शहरात नेणार्या बस मधून प्रयाण.
सर्वांनी कृपया आपला थांबा आणि बरोबर येणार्या मंडळींची नावे इ. माहिती ववि नोंदणी फॉर्ममध्ये व्यवस्थित भरावी. ही माहिती वाहतूक कंत्राटदाराला परवान्यासाठी देणे आवश्यक असते.
तुम्ही कळवलेल्या थांब्या प्रमाणे बस रुट सेट करुन तुम्हाला जवळचा पिक अप पॉइंट आणि वेळ ठरवुन देण्यात येईल.
सूचना: रिसॉर्ट मधे पाण्यात उतरताना पोहोण्याचा पोषाख असणे आवश्यक आहे. (महिलांसाठी: पोहोण्याचा पोषाख नसल्यास टेरिकॉट/नायलॉन मटेरिअलचे लेगिंग्ज आणि टि शर्ट चालतील).
तर मायबोलीकरांनो हा सोहळा चुकवू नका . मुंबई आणि पुण्याचे मायबोलीकर एकत्र भेटण्याचे हमखास ठिकाण म्हणजेच वर्षा विहार ...
विशेष सूचना:- ववि नावनोंदणी केल्यावर तुम्हाला आपोआप एक ईमेल येईल ज्यात तुम्ही दिलेली माहिती आणि सगळ्यात खाली तुमच्या वविनावनोंदणीची लिंक असेल.त्या लिंकमार्फत तुम्हाला तुमची माहिती कितीही वेळा बदलता येईल. १६ जुलैनंतर तुम्हाला ती माहिती बदलता येणार नाही. एकदा नावनोंदणी करून माहितीत परत बदल केलात तर ईमेल येणार नाही. जर पहिली नावनोंदणी करतानाच मेलबॉक्समध्ये ईमेल आली नसेल तर स्पॅम फोल्डर पहा. बर्याच वेळा ईमेल तिथे जाते.
फोटोरूपी एक झलक.
विवेक, ती तशी इथे वर्च्युअली
विवेक, ती तशी इथे वर्च्युअली पण किती जेरीस आणते सगळ्यांना आणि तुम्ही वविकरांच काय घेऊन बसलात?
म्हणुनच तर, ती येणार म्हंटल्यावर सगळे लोकं घाबरुन असतात. कुठुनशी येईल आणि "अय्या, दादा...." म्हणत पुढ्यात टपकेल...
pureeeeeeeeeee
pureeeeeeeeeee
ऑनलाईन पैसे भरणार्यांना
ऑनलाईन पैसे भरणार्यांना ज्या अकाऊंटमध्ये पैसे भरायचे आहेत त्याची सर्व माहिती ईमेलने कळविली जाईल.जे बँक डिटेल्स ऑनलाईन ट्रान्सफरसाठी दिले जातील, त्या अकाऊंटमध्ये कृपया कॅश डिपॉझिट करु नये.
>> करु नये ?? नाही समजले
ऑनलाईन पैसे भरणार्यांना
ऑनलाईन पैसे भरणार्यांना ज्या अकाऊंटमध्ये पैसे भरायचे आहेत त्याची सर्व माहिती ईमेलने कळविली जाईल.जे बँक डिटेल्स ऑनलाईन ट्रान्सफरसाठी दिले जातील, त्या अकाऊंटमध्ये कृपया कॅश डिपॉझिट करु नये.
करु नये ?? नाही समजले
ज्या अकाउंटचे डिटेल्स दिले जातील, त्या अकाउंट मध्ये फक्त ऑनलाईन ट्रान्स्फर करा. बँकेत जाउन कॅश डिपॉजीट (डेस्क ट्रान जॅक्शन) करु नका.
प्रीति, अशी कॅश डिपॉझीट केली
प्रीति, अशी कॅश डिपॉझीट केली त्या अकाउंटला तर अकाउंट होल्डरला काही रक्कम फाईन्/सर्वीस चार्ज म्हणून भरावी लागेत. तो भुर्दंड त्याच्यावर पडू नये म्हणून कॅश ट्रान्झॅक्शन नका करु असे म्हंटले आहे
अधिक माहितीसाठी आणि
अधिक माहितीसाठी आणि नावनोंदणीसाठी इथे पहा
मी तर केली की नांवनोंदणी!
मी तर केली की नांवनोंदणी!
काका,भले शाब्बास!!!
काका,भले शाब्बास!!!
आमची देखिल 'नाव-नोंदणी'
आमची देखिल 'नाव-नोंदणी' झाली... आता पुढे काय करायचं?...

विवेक, पुढे काय पैसे भरायचे
विवेक, पुढे काय पैसे भरायचे सांगितलेल्या वेळेत
विवेक, आत्तापासून सुरुवात
विवेक, आत्तापासून सुरुवात कर...नाटकाच्या तालमीला...ह्यावेळीही एखादा फर्मास प्रयोग होवूक होयो!
आषाढी एकादशीलाला नोंदणी करणार
आषाढी एकादशीलाला नोंदणी करणार आहे, संयोजक तेवढी दोन चार विंडो सीट राखीव ठेवा
मुहुर्त छानच काढलाय
मुहुर्त छानच काढलाय

नाव-नोंदणी केली आहे , मुंबई
नाव-नोंदणी केली आहे :), मुंबई चे पिक-अप पॉईंट/रुट कळू शकेल काय? जर मागील ववि प्रमाणे कल्याण हून बस जाणार असेल तर तोच आमचा पिक-अप पॉईंट
संदिप,रुट आणि पिक अप पॉईंटस
संदिप,रुट आणि पिक अप पॉईंटस हे एकदा फायनल लोकसंख्या कळली की लोक कुठुन कुठुन येणार त्यावरून ठरवले जातात. ते तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही वविचे पैसे भरायला याल त्यावेळी संयोजकांकडुन कळतील. तुम्ही काळ्जी करू नका तुमच्या सोयीचाही नक्की विचार केला जाईल ते ठरविताना. तुम्ही तुमची नावनोंदणी करून टाकलीत हे एकदम झक्कास काम केलत.
मजा करा मजा करा..
मजा करा मजा करा..
ओकि टोकी! धन्यवाद, मयुरेश
ओकि टोकी!
धन्यवाद, मयुरेश
वविची वविवार वाली जाहिरात
वविची वविवार वाली जाहिरात ऑसमेस्ट आहे
२ वर्षापुर्वीच्या वविचा बोर्ड माझ्या घरी आहे. तो लागणार असेल तर आत्ताच सांगा. मागच्या वर्षी सारखं एक दिवस आधी जागं होऊ नका. मला ऐत्यावेळी कुठे तरी येऊन द्यायला जमत नाही
वविवार ची अॅड वाचून प्रमोद
वविवार ची अॅड वाचून प्रमोद देव काकांची आठवण आली. 'वविवार' ही त्यांची फ्रेझ आहे
२ वर्षापुर्वीच्या वविचा बोर्ड
२ वर्षापुर्वीच्या वविचा बोर्ड माझ्या घरी आहे. तो लागणार असेल तर आत्ताच सांगा. मागच्या वर्षी सारखं एक दिवस आधी जागं होऊ नका. मला ऐत्यावेळी कुठे तरी येऊन द्यायला जमत नाही
लागणार आहे, धुवुन पुसुन स्वच्छ करुन ठेव.
रिया थोडक्यात तू वविला येणार
रिया थोडक्यात तू वविला येणार नाहियेस हे फिक्स केले आहेस तर..
पावसाने हजेरी लावली आणि वविची
पावसाने हजेरी लावली आणि वविची नोंदणी केली आहे. सकुसप येणार! धन्यवाद!
देसायनु दुरुस्ती करा. मला
देसायनु दुरुस्ती करा. मला काका नाही दादा केलं होतं. यावर्षी झालो काका तर माहिती नाही, पण रिया तशी शहाणी आहे म्हणा.
ववी नोंदणी, माझ्या आणि
ववी नोंदणी, माझ्या आणि बहिणीच्याही परिवाराची ही केली. आता वाट २७ तारखेची पाहाते आहे
ववी नोंदणी, माझ्या आणि
ववी नोंदणी, माझ्या आणि बहिणीच्याही परिवाराची ही केली. आता वाट २७ तारखेची पाहाते आहे
का? २० ला वर्गणी द्यायला येणार नाही का?
देसायनु दुरुस्ती करा. मला काका नाही दादा केलं होतं. यावर्षी झालो काका तर माहिती नाही, पण रिया तशी शहाणी आहे म्हणा.
या वर्षी काका मग...
सामी, तुला चांगलीच आठवण आहे
सामी, तुला चांगलीच आठवण आहे की!
चला, आता साजिराही काका
चला, आता साजिराही काका झाला...म्हणजे मी आता एकटाच काका नाहीये तर, वविला !
चला, आता साजिराही काका
चला, आता साजिराही काका झाला...म्हणजे मी आता एकटाच काका नाहीये तर, वविला !
तसं मग तुमचं ही प्रमोशन होईल ना
हिम्या तुझी इच्छा आहे का मी
हिम्या
तुझी इच्छा आहे का मी येऊ नये अशी? 
नावनोंदणी केलीये ना मी?????????????????
त्या बोर्डवर तारिख २ वर्षांपुर्वीची आहे, ती बदलायची नाहीये का???????????
म्हणून विचारतेय की आधी लागणार आहे का???????????
मल्ली, अरे, अशी बरीच
मल्ली, अरे, अशी बरीच प्रमोशन्स झालेत रे...ती व्हायची थांबतात काय?
Pages