एक तरी वारी अनुभवावी... - "आषाढ वारी २०१४"

Submitted by जिप्सी on 26 June, 2014 - 23:34

जाऊ देवाचिया गावा, घेऊ तेथेचि विसावा
देवा सांगु सुख दुःख, देव निवारील भूक

"निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम", "ज्ञानोबा माऊली तुकाराम" "पुंडलीक वरदा हारी विठठल"चा जयघोषात आणि आसमंत व्यापून टाकणारा टाळ-मृदुंगांचा गजरात पावलं देवाचिया गावा, पंढरपुरास निघाली. असं म्हणतात कि "एक तरी ओवी गुणगुणावी" प्रमाणेच "एक तरी वारी अनुभवावी". गेल्या वर्षी प्रथमच वारी अनुभवली आणि या वर्षी पाऊले आपोआपच दिंडीच्या मार्गावर वळली. मी अजुनही तुकोबाच्या देहुला, ज्ञानोबाच्या अलंकापुरीला आणि विठुरायाच्या वैकुंठनगरीला गेलो नाही, तरीही मग हि ओढ नक्की कशाची? कारण माहित नाही मात्र हि अनामिक ओढ जबरदस्त होती. माऊलींच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी सासवडहुन दिवेघाटात भर दुपारी निघालो. पावसाचा पत्ता नव्हता पण हवा मात्र आल्हाददायक होती. माऊलीच्या रथाच्या पुढच्या मानाच्या दिंड्या सासवडकडे निघालेल्या आणि आम्ही झेंडेवाडीच्या पुढे साधारण एक किमी अंतरावर जिथुन घाटातील विहंगम दृष्य त्या जागेवर निघालो. घाटातुन दिंड्या आणि वारकर्‍यांची सासवडकडे वाटचाल झाली होती. माऊलींचा दुपारचा विसावा झेंडेवाडीत असल्याने रस्त्याच्या दुतर्फा भाविकांची गर्दी ओसंडुन वाहत होती. जणु काही या सगळ्या परीसरात वैष्णवांचा महापूर लोटलेला.

टाळ मृदंगाची साथ नामाचा सोहळा
भिवरेच्या तीरी नाचे धुंद संतमेळा
दुरावलो कैसा देवा मीच दर्शनासी
मायबाप विठ्ठला रे कधी भेट देसी

दुपारच्या भर उन्हात पालखीची वाट पाहत उभा होतो. दिवेघाटात लांबवर पालखी येताना दिसली. जसजशी पालखी जवळ येत होती तसतशी मनातली घालमेल वाढत होती. दिवेघाटाच्या वळणावर पालखी जशी जवळ आली तसा हात कॅमेर्‍याऐवजी छातीवर आला आणि नकळतच नमस्कार केला गेला. बाकीचे जेंव्हा फोटो काढत होते तेंव्हा मी मात्र भान हरपुन माऊलींची पालखी पाहत होतो. थोड्या वेळात भानावर आलो. फोटो काढले अन् धावतच खाली जाऊन पुढे झेंडेवाडीच्या रस्त्यावर पालखीची वाट पाहत उभा राहिलो. थोड्यावेळात पालखी अगदी नजरेसमोर आली आणि माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेण्यास गर्दीतून वाट काढत पुढे गेलो. "पाया पडू गेले तव पाउलचि न दिसे..". माझे डोळे पाण्याने का भरले? हे नक्की काय होतंय? माऊलींच्या पादुका दर्शनाने मनावर कसलं संमोहन केलं? टाळ मृदंगाच्या ध्वनीने आणि वैष्णवांच्या या अफाट जनसागराच्या दर्शनाने शरीराला आणि मनाला अचानक टवटवी कशी आली? सारी स्पर्शेंद्रिये गोठून गेली. एका जागी थिजून मी हा सारा सोहळा एकटक पाहत होतो. म्हटलं तर मनाला काहीतरी जाणवत होतं, म्हटंल तर मन जाणीव-नेणीवच्या पलीकडे गेलं होतं. क्षणभर वाटलं आपणही माऊलींच्या पादुकांवर वाहिलेलं एखादं पुष्प व्हाव, मग भलेही दुसर्‍या दिवशी निर्माल्य झालो तरी चालेल. आणि त्यात गैर काय आहे? हे ही एक प्रकारचे समर्पणच नाही का? अंतर्मनाचा शोध घेण्याची हि एक संधी तर नाही ना? कदाचित हा वारी सोहळा माझ्या मनातील मैल धुऊन काढेल. कामक्रोधादी विकारांवर विजय मिळवता येईल. मनात या अशा अनेक विचारांचा कल्लोळ का माजलाय? एकामागुन एक प्रश्नांची मालिका सुरू झाली. आजच हे असे विचार का यावेत? आज मी स्वतःच असा मनात डोकावून का पाहतोय? हा या वारी सोहळ्याचा हा चमत्कार तर नव्हे? दिंडी आणि यातील वारकर्‍यांची निर्मळता माझ्या मलीन, व्याधिग्रस्त मनाला खजील तर करत नाही ना? अंतर्मुख होऊन विचार करायला प्रवृत्त तर करीत नाही ना? शहरी आयुष्य जगताना मन पूर्णपणे षडरिपूंनी प्रभावित असल्याने भक्तीच्या या असल्या विचारांना थारा नसतो. पण आषाढी वारीत, वैष्णवांच्या संगतीत, टाळ-मृदंगाच्या गजरात, माऊलीच्या पालखीसोबत मनाचा क्षुद्रपणा प्रकर्षाने आत कुठे तरी जाणवायला लागलाय. मनाला कसलीशी आस लागलीय. ह्रदयात खोलवर कुठेतरी टाळ मृदंगाचा गजर वाजतोय. मनाच्या काळोख्या गाभार्‍यात सकारात्मक विचारांची धूनी पेटलीय आणि ती कायमची अशीच पेटत राहु दे हिच त्या विठ्ठल चरणी प्रार्थना.

आले सुखाला भरते चंद्र मोहरे भक्तीचा
दुजी भावना सरली बोध जाहला ज्ञानाचा
भाव समतेचा थोर असा वाटेत पेरला
दिंडी चालली चालली विठ्ठलाच्या दर्शनाला...
============================================================================
============================================================================
आषाढवारी २०१३ - दिंडी चालली चालली...
============================================================================
============================================================================

पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा
विठा देखियेला डोळां बाईये वो
वेधले वो मन तयाचियां गुणीं
क्षणभर न विसंबे विठ्ठलरुक्मिणी

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०
माऊलींची पालखी

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५
वारकर्‍यांची चंद्रभागा

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०

प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३

प्रचि ३४

प्रचि ३५

प्रचि ३६

प्रचि ३७

प्रचि ३८

प्रचि ३९

प्रचि ४०

प्रचि ४१

प्रचि ४२

प्रचि ४३

प्रचि ४४

प्रचि ४५

प्रचि ४६

प्रचि ४७

प्रचि ४८

प्रचि ४९

प्रचि ५०

प्रचि ५१
आता कोठे धांवे मन । तुझे चरण देखिलिया
भाग गेला सीण गेला । अवघा जाला आनंद

प्रचि ५२
तो सावळा सुंदरू कासे पीतांबरू
लावण्य मनोहरू देखियेला...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नि:शब्द!! धन्यवाद रे.. तुझ्यामुळे लांब असुनही वारीला जाउन आल्याचा प्रत्यय आला..

जिप्सि , फारच सुन्दर लेख व फोटो

यावर्षी मीहि आळन्दि ले पुणे अशी वारी केली. हरिनमच्या गजरात २० २२ किमी अन्तर कसे पायी पर पड्ले हे कळलेच नाही.अत्यन्त श्रद्धेने व निश्थेने वार करी दरवर्षी वारी करतात.

जिप्सी, अतिशय सुरेख लिहिलंयस. प्रचि तर उत्तम आहेतच पण प्रचिंपेक्षाही तुझ्या लिखाणातून भाव थेट पोहोचला. >>> मामी + १ Happy

___/\___ किती किती सुंदर लिहिले आहे.... डोळ्यात अगदी पाणी आले...

फोटो तर जबरदस्त..... माणसांनी भरून जाणारा घाट आणि माऊली तर अप्रतिमच...

हा सोहळा पाहून एक तरी वारी अनुभवावी अस मनापासून वाटतय... Happy

प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे मनःपूर्वक आभार!!!!!

अंजली Happy

(सलग २ वर्षे आल्याने)>>>>>माधव, यापुढे शक्य असल्यास दरवर्षी वारीला जाणार. Happy माऊलींच्या पादुकांचे निरा स्नान सोहळा, चांदोबाचा लिंब येथील उभे रिंगण, बाजीरावाची विहिर, वाखरी,येथील गोल रिंगण, माऊलींचे चंद्रभागा स्नान, वैकुंठनगरीतील विठूरायाचे दर्शन असं खुप काही अनुभवायचे आहे. Happy

विशाल, ओंकारला धन्यवाद सांग. Happy

हरिनमच्या गजरात २० २२ किमी अन्तर कसे पायी पर पड्ले हे कळलेच नाही.>>>>>अगदी अगदी Happy

प्रचि ५२ मधला, मधला फोटो मला द्याल काय पुर्ण.>>>>जेम्स बाँड तो, तो मधला प्रचि, फोटोचा फोटो काढलाय. Happy

जिप्सी..... तुमच्या लिखाणातील जादूने जास्त भारलो की त्या प्रकाशचित्रांतून उलगडत गेलेल्या भक्तीच्या पुराने वाहून जाणे झाले याच्या विचारात गुंग होऊन गेलो आहे मी. दोन्हीही गोष्टी अगदी अप्रतिमरित्या इथे उतरल्या आहेत. शेवटी भक्ती भक्ती म्हणजे दुसरेतिसरे काही नसून त्या मार्गाचा घेतलेला मागोवा हा देखील अन्यांना त्या रस्त्याकडे जाण्यास उद्युक्त करतो हेच खरे....आणि तिच भक्तीची व्याख्या. काही लोक वाणीचा तर काही लोक लेखणीचा वापर करून विठोबाचे गुण गातात....पण तुमच्याकडे असलेल्या बोटात क्लिकची जी जादू आहे ती अफलातून अशीच असल्याने मला खात्री आहे की इथले सदस्य तुमच्या त्या कलेच्या प्रेमात पडले असणार.

सुरेखच सारे काही.

जिप्स्या , तुझा लेख वाचूनच भारावायला झालंय.. तुझे शब्द आणी प्रचि अतिशय बोलके आहेत..

मी अजून काय बोलू... शब्दच अपुरे पडलेत..

जियो!!!!

जिप्सी.... काय बोलु शब्दच नाहीये....
अवघा रंग एक झाला....
अप्रतिम वर्णन आणि फोटो खुप छान टिपले आहेत...

सुरेख फोटोज. लिखाण उस्से भी ज्यादा!
मात्र बघताना फोटो ओव्हरलॅप करून दिसणार्‍या (फोटो मोठे आहेत म्हणून?) जाहिराती मात्र मजा घालवत आहेत. एक घालवली तर दुसरी तयार.

जिप्सी, काय सुंदर लिहीलेस! अ प्र ति म....... छोटेसे लिखाण पण प्रत्येक ओळ मनाला भिडणारी.
फोटो तर काय नेहमीसारखेच सुंदर. वारकर्‍याच्या चेहर्‍यावरचे नैसर्गिक हावभाव, कपड्यांची रंगसंगती, मृदंग वाजवणारा, पोथी , छोटी मुलगी.... सगळेच अप्रतिम! मनात आले एखादया मॉडेलने दिलेल्या पोज पेक्शा हे फोटो
किती सजीव्,सुंदर आहेत. धन्यवाद जिप्सी, तुझ्यामुळे आम्हाला याचा आनंद घेता येतो.

Pages