दिल्ली मधील खादाडी

Submitted by स्नू on 25 June, 2014 - 06:48

गेल्या तीन वर्षातील वास्तव्यामुळे दिल्ली आणि चंडीगढ ह्या परिसराशी चांगलीच ओळख झाली. महाराष्ट्रात असताना दिल्लीच्या खाद्यसंस्कृती विषयी असलेले काही गैरसमज दूर झाले तर काही समज दृढ झाले. देहली बेलीचाही अनुभव घेवून झाला. नवर्‍याला बाहेर जेवण्याची प्रचंड आवड असल्याने जवळ जवळ संपूर्ण दिल्ली पालथी घालून झालीये. त्यापैकी काही ठिकाणांची माहिती देते आहे.

१. महाचर्चित 'पराठेवाली गली' - इथे पराठे मिळत नाहीत. स्टफ केलेली पूरी मिळते. वाटेल ती भाजी घालून पराठा अक्षरशः तळून काढतात. तेही कदाचित सहन झालं असत जर चव जबरदस्त असती तर..पण चव अगदीच सुमार वाटली. आणि घाणीचे साम्राज्य आहे त्यामुळे खाण्याची मुळीच इच्छा होत नाहीत. त्या गल्लीत साड्यांची दुकाने मात्र छान आहेत.

२. हल्दिराम - हे जागोजागी आहेत. तिथे जेवणाची चव तर चांगली आहे पण पोर्शन खूपच कमी केला आहे. प्रचंड गर्दी आणि सेल्फ सर्विसमुळे हे ठिकाण मला फारसं आवडत नाही.

३. गुरुद्वारा मधील लंगर : खूप स्वछ सात्विक आणि पवित्र वाटते. बंगला साहिब गुरुद्वारा तर नक्की जा.

४. परिक्रमा, कोनोट प्लेस - हे एक अप्रतिम रेस्टोरंट आहे. रेवोल्विंग रेस्टोरंट आहे. इथे बसून राष्ट्रपति भवन कुतुबमिनार, संसद अश्या बर्‍याच गोष्टी बघता येतात. मुख्य म्हणजे जेवण खूप छान आहे. थोडे महाग आहे पण पूर्ण पैसा वसूल.

५. पिंड बलूची : हे एक पारंपरिक पंजाबी रेस्टोरंट आहे. इथे पंजाबी डीशेस चांगल्या मिळतात. ambiance उत्तम असतो.

६. सुरुचि, करोल बाग - अप्रतिम गुजराथी / राजस्थानी थाली. पावभाजी कॉम्बो पण मस्त आहे.

७. रोशन डी कुल्फी, करोल बाग - फालूदा कुल्फी नक्की खा.

८. पेशवारी चिकन, पीतमपुरा - नोन-व्हेज चांगलं आहे.

९. करीम, जामा मशिदीजवळ - ठीक ठीक वाटलं.

१०. झिलमिल ढाबा, दिल्ली चंडीगढ हायवे, कर्नाल - चिकन करी बर्‍याच अंशी घरच्या सारखी. सगळे पराठे तंदूरी. आलू प्याज पराठा माझा खास आवडता. चहा एक मोठा ग्लास भरून देतात पण मस्त असतो. पूर्ण दुधाचा एकदम कडक..

११. हवेली - हे पण पारंपारिक पंजाबी रेस्टोरंट आहेत. दिल्ली चंडीगढ हायवे वर 3 (मुर्थल , कर्नाल, अंबाला) आणि बाकीची पंजाब मध्ये आहेत. मुर्थल म्हणून पानीपत जवळ एक गाव आहे. तिथे हे रेस्टोरंट चांगलं आहे. पंजाबी जेवण अप्रतिम.

१२. सुखदेव ढाबा, दिल्ली चंडीगढ हायवे, मुर्थल - ओव्हरहाइप्ड आहे. पराठा छोटा आणि लोणयाचा गोला मोठा. चव पण विशेष नाही. गर्दी अबबं.

१३. सरवण भवन, जनपथ - अप्रतिम दाक्षिणात्य जेवण

दिल्लीमध्ये खास करून चव घ्यावीत अश्या गोष्टी:

1. रताळ्याचे चाट : शक्यतो हिवाळ्यात मिळते जागोजागी. मेट्रो स्टेशन जवळ, एखाद्या मार्केट मध्ये ई.
2. तंदूरी मोमोस : अमर कॉलनी / लाजपत नगर
3. पनीर टिक्का : पंजाब स्वीट कोर्नर, करोल बाग. पनीर अगदी विरघळते जीभेवर.
4. डोडा : ओम स्वीट्स, गुरगाव हा एक मिठाईचा प्रकार आहे. ही मिठाई गव्हापासून बनवतात.
5. पेठा : बंगला स्वीट्स, गोल मार्केट जवळ.

बाकी ठिकाणे आठवल्यास धागा अपडेट करत राहीन..... चंडीगढ मधील खादाडी पुढच्या भागात...

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकच वर्ष उशीरा टाकलीत पोस्ट मागच्यावर्षी पानिपत मधे खायची ठिकाणे शोधून दमले होते.

पण अपडेट करा मधे मधे की आताची स्थिती काय आहे, काही बदल झाले असतील तर तेही

डोडा! एक नंबर मिठाई असते! माझ्या सगळ्या दिल्लीच्या मित्र मैत्रिणींना सुट्टीवरून येताना ही आणणं कंपल्सरी होतं Happy

छान संकलन
बरीच वर्षे दिल्लीत जाणे झाले नाही, पण रताळे चाट अजून आठवतेय. ताजे मूळे कापून त्यात चाट मसाला भरुन देतात तोही प्रकार आवडला होता.

करिम्सजवळ अल जवाहर उत्तम आहे.
खानचाचाचे काठी रोल

हा माझा आवडता ब्लॉग - http://delhistreetfood.blogspot.in/

सफदरजंग भागात खानदानी पकोडेवाला आहे. शिवाय बेंगाल स्वीट्स आणि गुप्ताज रसोई. जवळच सरोजिनी नगरात कुलचा किंग आहे. मोतीबागेत मोमो मिळतात.

धन्यवाद चिनूक्स .. Happy

बेंगाल स्वीट्स म्हणजे बाय एनी चान्स् बेंगाली मार्केट का? विचारण्याचं कारण असं की पुर्वी दिल्लीला बरेच वेळा जाणं झालं तेव्हा तिकडे रहाणारे नातेवाईक हमखास बेंगॉली मार्केट ला घेऊन जायचे चाट खाण्याकर ता आणि पतीसा घेण्याकरता ..

दाना चोगा चे पदार्थ छान असतात. सेक्टर १४ च्या जवळपास कुठेतरी एक धाबा होता जिथले छोले कुलचे मस्त असायचे.

माझा सगळ्यात फेव आयटम म्हणजे बिकानेरवाला कडच्या गरमागरम जिलब्या!!

डिफेन्स कॉलनीत एक सौथ इंडियन आहे - खूप छान
- सांझा चुल्हा- करोल बाग
- चंदिगद सेक्ट्र १८ मध्ये साई स्वीट्स-- चोले भटुरे फॅब
- कॅनॉट प्लेस- निरुला-- ग्रेट आईस क्रीम
- चोर बिजार- ओल्ड दिल्ली आणि नॉयडा
- दौलत राम-- फ्रेंड्स कॉलनी
- अपना घर- करोल बाग
-- हौज खास व्हिलेजमधील सगळी रेस्टॉरंट्स टॉप
- अरबिंदो मार्ग वरील कर्नटक भवन
-करोल बाग सर्वना भवन
- फ्रेंड्स कॉलनी- लोटस पाँड- ग्रेट चायनीज
- मौर्या शेरेटन-- दम पख्त

कहाणी वविवारची

ऐका परमेश्वरा वविश्वरा तुमची कहाणी. एसपीचे मळे, तरणतळे. सदाहरीत वृक्ष, क्षीण पळे, मायबोलीची देवळे, रावळे. माबोचा वविवार मनी वसावा. हा वसा कधी घ्यावा? जुलै महीन्याच्या शेवटच्या "वविवारी" घ्यावा, दुस-या दिवशी संपूर्ण करावा.
वविवारच्या व्रताला काय करावं? व्रतासाठी नाव नोंदवावं. सोबत सहकुटूंब व्रत करावं. भल्या पहाटे वविवारी लवकर उठावं. मुहूर्ताच्या वेळेला भेटीचं स्थळ गाठावं. वाटेत गाणी नकला कराव्यात. आपल्यासह सर्वांचं मन रमवावं. सर्वांनी मिळून व्रत करावं.
ह्या व्रताने काय होते? वर्षभराची मरगळ दूर होते. कुटूंबही खूष होते. नवे मैत्र निर्माण होते. जुने मैत्र वृद्धींगत होते.
संपूर्णाला काय करावे? संपूर्णाला वविव्रताचा आनंद वाटून घ्यावा. वृत्तांत लिहून उद्यापन करावे. असे दरवर्षी करावे. असा वविवार मनी घ्याइजे. मनी पाविजे. चिंतिलं लाभिजे. मनकामना निर्विघ्न कार्यसिद्धी करिजे. ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफळ संपूर्ण

अधिक माहितीसाठी आणि नावनोंदणीसाठी इथे पहा...