का छेदतात रेषा ....राहूनही समांतर

Submitted by जयदीप. on 25 June, 2014 - 04:11

घेऊ नको भरारी पंखाशिवाय येथे
भांडू नको कधीही मुद्दयाशिवाय येथे

का छेदतात रेषा ....राहूनही समांतर
बनतात वर्तुळे का व्यासाशिवाय येथे

इतकाच अर्थ आहे माझ्या पराभवाचा
मी जिंकणार नाही हरल्याशिवाय येथे

मी धावणार नाही, जिंकेन मी तरीही
स्पर्धेत कोण आहे माझ्याशिवाय येथे

आता स्थिरावलेले आहे नशीब माझे
काही नवीन नाही श्वासाशिवाय येथे

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही नवीन नाही श्वासाशिवाय येथे

मी जिंकणार नाही हरल्याशिवाय येथे

स्पर्धेत कोण आहे माझ्याशिवाय येथे<<<

मस्त ओळी!

शेर चांगले बंदिस्त व्हायला हवे होते ह्या ओळींचे असे वाटले. कृ गै न. Happy

इतकाच अर्थ आहे माझ्या पराभवाचा
मी जिंकणार नाही हरल्याशिवाय येथे

>> व्वा ! अप्रतिम !