धम्माल Subtitles !!

Submitted by रणथंबोर on 23 June, 2014 - 03:02

सध्या जे मराठी चित्रपट येत आहेत त्यातल्या बहुधा सगळ्याना Subtitles असतात... अर्थात आपल्याला त्याची गरज नसली तरी तिकडे लक्ष जातच असते...(आदतसे मजबूर ??) ..

खर तर Subtitles लिहताना चूक होत नाही पण आपल्या बोलीभाषेतल्या शब्दाचे इंग्लिश अर्थ बघितले म्हणजे कधी कधी हास्यस्फोट होतात....

उदा. परवा जोगवा बघत असताना एक गान चालू होते ...त्यात शब्द होते "हळद लावा सख्यानो.." तर त्याच भाषांतर खाली आल ...."apply the turmeric, friends".... Happy

तुम्हाला अशी काही गम्मत सापडली आहे का ???

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सब्टायटल्स पेक्षा गाणी भारी असतात.. तामिळ चित्रपटांची गाणी हिंदीत डब करुन जेव्हा गातात ते ऐकण्यासारखे आहे... सुर ताल तर जातेच खड्ड्यात वर गाण्यांचे बोल देखील असे असतात की हसुन हसुन पोट दुखते ( मग ते भले विरहगीत असेल तरी)

साहिल शहा,

>> धर्मेन्द्र " कुत्ते , कमिने मै तेरा खुन पि जाऊन्गा" ह्याचे subtitle कसे विचित्र होईल...

यासाठी तुम्हाला इथला लेख आणि त्याखालच्या प्रतिक्रिया वाचाव्या लागतील.

आ.न.,
-गा.पै.