'आपटलेली' कोकण सायकल राईड (छायाचित्रांसहित)

Submitted by अमित M. on 19 June, 2014 - 10:48

एक सम्पूर्ण भैसटुन 'आपटलेली' कोकण सायकल सफ़र

अतिउत्साहात पण पूर्ण तयारीनीशी सुरु केलेली आमची सायकल राईड काही बेसीक रुल्स आणि रेग्युलेशन्स follow न केल्यामुळे कशी फ़सली त्याचा हा व्रुत्तान्त.

आमच्या गेल्या काही वीकेन्ड्सच्या सायकल राईड्स:
पुणे-वडगाव
पुणे-खानापुर - कोन्ढाणपुर मार्गे सिन्ह्गड
पुणे-सातारा अणि त्यानन्तर
पुणे-महाबळेश्वरची कल्पनेपलिकडे यशस्वी झालेली राईड

गेले काहि दिवसात ५०-६०-७० अशी चढती कमान कायम ठेवत माबोकरानि १०० किमीच्या वर मजल मारलेली. ऊत्साह दुणावलेला ! त्यामुळे खुप आधीपासुन मनामधे असलेल्या कोकण राईडला हात घातला. खर तर ह्या राईडची तयारी आम्ही आधीपासुन करत होतो आणि आधीच्या आठवड्यातली महाबळेश्वर राईड ही कोकणची रन्गीत तालीम होती. त्यात १-२ आठवड्यापुर्वी तीघान्कडे नवीन सायकली आलेल्या त्यामुळे आम्च्या तफ़्यात आता ३ हायब्रिड (२ बेर्ग्मोन्ट, १ मेरिडा), २ मोउन्टन (१ मेरिडा अनि १ श्वीन), १ हीरो रोड्स्टर अशी क्याव्हेलरी होती. लाम्ब पल्ल्याच्या राईडची मानसीक तयारी झाली होती तसच सगळ्यानी रजा टाकुन हाफ़िसातला सोपस्कार पार पाडला. कोकणात जायच तर नकाशा हवा. तो आम्ही आधीच मिळवला होता आणि कामाला लागलो.
IMG_3222.JPG
मी मनोज अणि रोहित ने एकदा भेटुन आमचा रुट फ़ायनल केला. आम्च्या याधीच्या सातारा आणि महबळेश्वर ट्रिप मधे काहि उणीवा राहुन गेल्या होत्या त्याचा उहापोह झाला. रुट फ़ायनल झाल्यावर मी माबोकर विमुक्तशी बोलायच ठरवल. त्याचा कोकण ट्रिप चा लेख डोक्यात फ़िट्ट बसला होता आणि तोही नेमका भरतात आहे हे त्याने फ़ेबु वर कळवल होत. त्याच्याशी फ़ोन झाला तेव्हा त्याने अपसुन इति पर्यन्त मस्त माहिती पुरवली. इकडे मनोजनी त्याच्या एका ट्रेकर मित्राशी बोलुन आम्च्या रुटवरचे सगळे राहायचे-खायचे पत्ते मिळवले. सगळ छान सुरु होत आणि कुठेतरी माशी शिन्कली. केदार दिक्षित आणि अजुन एक भिडु विजय ह्यानी काहि अपरिहार्य कारणाने राईडमधुन माघार घेतली. पण राईडच भूत अस काहि मान्गुटिवर बसल होत कि आता अम्ही ही राईड करायचीच ह्या वेडपायी खुळावलो होतो. हफ़िसात वापरल्या जाणार्या "To Get Everyone on Same Page" ह्या भम्पक उक्तिनुसार २ दिवस आधी सगळे एकत्र भोजनास गेलो. तयारीवर एक शेवटचा हात फ़िरवला आणि कोकणचा बेत फ़ुल्प्रूफ़ करुन टाकला...म्हणजे आम्हाला तरी तस वाटल Wink

शुक्रवार रात्री उद्याच्या मेगा-राईड्ची स्वप्न रन्गवत रन्ग्वत झोपी गेलो अन ठिक ४ वाजता अर्ध्या गजरावर ताडकन उठलो. फोन करुन आढावा घेतला. सगळे भिडू जागे होते. मला रोहितची भिती होती ;). त्याला फोन केला तर म्हणाला कि तो ३ पासुनच जागा आहे. झटपट आवरुन ४:३० ला तयार झालो. मनोज, भारत ही मन्डळी तयार होति आणि ठरल्याप्रमणे किरण आधीच रोहितकडे येउन बसला होता. पण मग गाडी जागची हलत का नाहीये ते समजेना म्हणुन मी परत रोहित ला फ़ोन केला तर साहेब त्याच लाडक (पेट) कासव आइ बाबान्कडे ठेवायला निघाले होते :). मी फ़कत "बर" एव्हढच बोलु शकलो. मी मनोज बाय्पास्ला भेटलो आणि तिथुन चान्दनी चौकात पोचलो. तिथे भारत आणि केडी आधीच येउन बसले होते. केदार दिक्षीतान्च्या उत्साहाला सलाम केला पाहिजे. त्याला राईडला येता येणार नव्हत पण फ़क्त आम्हाला चीअर करायला तो अम्च्याबरोबर ३०-३५ किमी येणार होता. साधारण अर्ध्या तासात रोहित अन किरण पण पोचले अन आम्ची स्वारी मार्गस्थ ज़ाली तेव्हा ६:१५ वाजुन गेले होते. पूर्वेकडे हळुहळू ताबड फ़ुटल, मन्द गार हवेने आमच स्वागत केल. सकाळी ११ पर्यन्त म्हणजे उणे-पूरे ४:३० तासात शक्य तेव्हधी मजल मारायची असा आमचा इरादा होता कारण एकदा उन तापल्यावर हवा तसा स्पीड पकडता येत नाही. सर्वानाच तशा सुचना दिल्यामुळे भराभर पाय्डल मारत आम्ही थोडाच वेळात भूगाव मार्गे मानस लेक मागे टाकुन पिरन्गुट गाठल पण. पिरन्गुट घाट उतरताना मस्त मजा आली. इथुन बरेचदा प्रवास केलाय आणि रस्ता मस्त आहे त्यामुळे अवघ्या काहीच सेकन्दात घाट उतरलो. एका दुकानापशी थाम्बुन डोक्याला बान्धायचा रुमाल घेतला तोवर सगळे जण सुसाट जात पुढे दिसेनासे झाले. मला सहज वाटुन गेल कि सगळेच्जण इतक्या सुसाट घाट उतरले खरे पण पुढचा घाट सुरु व्हायच्या अगोदर सेफ़्टी फ़र्स्ट नियमाने सगळ्याना आठवण करुन द्यायला हरकत नाहि. पण नन्तर काहीच वेळात मला ह्या गोश्टीचा विसर पडला जी फ़ार मोठी घोड्चुक ठरली.

DSCN7514.JPGDSCN7516.JPGDSCN7512.JPG

ढगाळ हवामानामुळे हवेत बर्यापैकी गारवा होता . राईडिन्गला मजा येत होती आम्ही छान स्पीड पकडला होता. पहिल्या १-१.५ तासात पिरन्गुट, शिन्देवडी, पाउड मागे टाकत टीम माले गावात दाखल झालि. आता इथुन केड्याला (केदार दिक्षीत) मागे फ़िरण भाग होत कारण त्याला पिरन्गुट घाट मारुन घरी जायच होत. मग इथेच आम्ही ब्रेक घेतला; भूक तर लागली होतीच त्यामुळे सोबत आणलेले Sandwitch,पराठे, चटणी, खजुर चा खात्मा केला. हे झाल्यावर एकाने सुपारी बडीशेप काढली अन मी डोक्याला हात लावला. मग केडी ला निरोपाचे विडे दिले नि टाटा बाय बाय केल (नशीब कोणी वीडे घेउन नव्हत आल :)).

IMG_3087.JPGIMG_3089.JPGDSCN7518.JPG

केदार मागे फ़िरला तेव्हा ८:३०-९ वाजले होते आणि बहुदा जाता जाता मळभपण घेउन गेला ;). मोठ्या ब्रेकमुळे वेळ गेला होता पण तरी आम्ही ऑन schedule होतो. एका मावशीन्कडुन काळी मैना घेतली आणि पळसेकडे कूच केल.
DSCN7524.JPGDSCN7522.JPG
माले ते पळसे हा १० किमी चा पट्ट अणि त्याच्यापुढे सायकलिन्ग थोड जड जणार होता कारण आता डोन्गरवाट असल्याने Climbs - uphill जास्त होते. त्याहीपेक्षा ऊन हा आता मेजर Factor होता. अत्तपर्यन्त ३० किमी चा पल्ला सहज मारला असला तरी पळसे ला पोचता पोचता आम्ची दम्छाक झली.
DSCN7528.JPG14456480862_24aac48111_z.jpg

डाम्बरी सडक एका कोरड्या ओढ्यावरुन जाते तिथेच विश्रन्तीसठी थाम्बलो. सायकली पटापट Stand वर लावल्या, थोडेफ़ार फोटो काढले थन्ड पाणी प्यालो आणि गप्पा मारत होतो. हा फोटो काढला तीथेच शेजारी जो कोरडा नाला दिसतोय तिथेच किरण्ची सायकल पडली.
DSCN7520.JPG
एका हवेच्या झोतामागोमाग धाडकन अवाज झाला तसे एक्दम दचकलो. पटकन मागे वळून पाहिल तेव्हा धस्स ज़ाल. किरण्ची श्वीन मोउन्तैन Bike पुलावरुन खाली ओढ्यात पडली होती. झाडी झुडूप, काट्या कुट्यातुन मी खाली गेलो आणि सायकल वर आणली. नशीबाने सायकलला कहिही झाल नव्हत. फ़क्त टेल लाईट पडला होता तोपण मिळाला आणि किरण ट्रिप मधला सुदैवी नम्बर एक ठरला.

14271307740_d743377a48_o.jpg14478065773_30ea09ced1_o.jpg

Paradice Café, Tata Power Plant मागे टाकत मुळशि धरणाच्या अन्गाअन्गाने सुन्दर नजारा डोळ्यात साठवत आमच मार्गक्रमण सुरु झाल.

DSCN7525.JPG

पळश्यात सगळ्यानि आपापल्या पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या. पोट भरलेल असल्याने वाटेतल्या Quick Bite la थाम्बण्यात कोणालच interest नव्हता. ११ वाजले तेव्हा आम्ही ५० किलोमीतर चा पहिला टप्पा पार पाडून ताम्हिनीमधे पोचलो होतो पण तब्बल ४:३० तासात !! वाढत उन व सतत चे चढ उतार ह्यामुळे आमचा वेग ताशी १२ पेक्षा कमी पडत होता. वेळापत्रक गडबडू लागल होत. त्यामुळे ताम्हिनीतून विन्झाई देवीच्या मन्दिरात जायची फ़ार इच्छा होती पण ते टाळल. विन्जाई मन्दिराचा रस्ता डावीकडे सोडुन सगळे स्वार घाटाच्या दिशेने मार्गस्थ झाले.
DSCN7530.JPG

सायकलला टाच मारत सारोळे,नीवे मागे टाकल पण सततच्या उष्म्याने हैराण व्हायल होत होत. त्यात घामाच्या धारा डोळ्यात जाउन डोळे चुरचुरत होते. भरीला माळरानावरचा उष्ण भरार वारा होताच घसा कोरडा करायला ! सायकल रेटतरेटत आम्ही सरतेशेवटी डोन्न्गरववाडीतुन प्लस व्ह्यालीत दा़खल झालो.
14454493781_5201f0c263_z.jpg14454461191_dd329331f3_z.jpg

एव्हढ्या टळटळीत उन्हात्सुद्ढा ताम्हिनी घाट परिसर ग़ोजिरवाणा भासत होता. इथे थाम्बुन माबोकरानी एक फ़ोटोसेशन केल. हा परिसर घाटाचा आणि अजुबाजुला Reserved Forest असल्याने उन्हापासुन आमचा बर्यापैकी बचाव झाला.
14456702984_19497fdc5b_z.jpgIMG_3101.JPGDSCN7534.JPGDSCN7532.JPG

पिरन्गुट घाटानन्तर आता तम्हिनी घाटात आम्चा सायकलिन्घcआ कस लागणार होता. घाटाच्या अग्दी सुरुवातीलाच एकत्र राहान्याच्या सुचना देउनसुद्धा मनोज पुढे गेला. ठरल्याप्रमाअने फ़क्त मी रोहित आणि किरण एकत्र राहिलो कारण भारत थोडा मागे पडला होता. त्याच्यासाठी आम्ही थाम्बुन वाट पहायच ठरवल. १५-२० मिनट झाली तरी तो आला नाही तेव्हा मनात शन्केची पाल चुकचुकली. किरण, रोहितला तिथेच थाम्बा सान्गुन मी भारतशेठ ना शोधायला मागे फ़िरलो. एखाद दोन किलोमिटर गेलो असेन नसेल आणि समोरुन भारत येताना दिसला. त्याला गाठल तेव्हा तोन्डापासुन पायापर्यन्त साहेब मातीमय झाले होते. काही विचारायच्या आत त्याने उतारावर ब्रेक्स फ़ेल झाल्याच सान्गितल. ब्रेक न लागल्याने त्याची साय्कल सरळ रस्त्यापलीकडच्या मातीत गेली. अर्थात त्यामुळेच कमरेला थोड खरचटण्यापलिकडे त्याला फ़ार काहि लागल नाही. हा आमचा सुदैवी नम्बर दोन. रोहित कडे First Aid Box होता. भारतच औषधपाणि होईस्तोवर मी त्याची सायकल तपासली तेव्हा लक्षात आल कि सायकल्चा फ़ोर्क वाकडा झाला होता. पुढे माणगावात हे काम कोणी करेल का ह्याचीहि शश्वती नव्हती. पण इलाज नव्हता. आम्हाला तसच पुढे जाण भाग होत. थोडसच पुढे मनोज भेटला तेव्हा त्याला सगळा उलगडा झाला. मग सगळ्यानी परत एकदा एकत्र रहायच्या आणाभाका घेतल्या. भिरा Power Plant वरुन गरुडमचीला आलो तेव्हा आम्चा प्रवास परत एकदा रखरखीत रस्त्यावरुन सुरु झाला होता.
14457900445_d869aa7f78_o.jpg
१२-१२:३० चा सुमार..खर तर पाय दमले नव्हते पण वाढता उष्मा बेजार करुन टाकत होता. सुर्यकिरण आता लम्बरूप पडत होते आणि मला Dehydration चा त्रास सुरु झाला. आम्च्या नशीएबाने पुढेच एक लहान्शी टपरी होती. तिथल्या मामाना विनवणी करुन तान्दळाच्या भकर्या आणि झुणका सान्गितला. ते तयार होइस्तोवर कन्देपोहे आणायच फ़र्मान सुटल. एव्हाना बाकि पब्लिक शेजारच्या हातपम्पाकडे धावली आणि धरणीमातेच्या उदरातल्या थन्ड गार प्रेमाने आम्ही झटक्यात फ़्रेश झालो.
14271309810_897bc4f2b4_o.jpg
मुसळधार पाऊस पडावा तस कोसळणार ऊन आणि समोरचा उघडा बोडका रस्ता पाहुन अम्ही तिथेच उन्ह उतरायची वाट पहायच ठरवल. घाट उतरल्यावर विळे MIDC पासुन माणगाव अन्दाजे २५ किमी होत आणि त्यापुढे अजुन ५० किमी श्रीवर्धन. मनातल्या मनात हिशेब केला ..म्हणजे दुपार टळली तरी आम्ही फ़क्त ७०-७५ किमी कव्हर केलय. त्यात श्रीवर्धन च्या अलिकडे घाट आहे तेव्हा परत स्पीड बोम्बलणार म्हणजे प्रयत्नान्ची अगदी शर्थ केली तरि आम्ही श्रीवर्धन ला पोचेपर्यन्त ९:३०-१० वाजणार. पण उत्साह आणि हार न मानणे हे आमच्या सगळ्याच सायकल राईड्स च वैशिष्ट्य ! त्यामुळे हा विषय मान्डल्यावर १० काय १२ वाजले तरी बेहत्तर वगैरे वाक्य फ़ेकली गेली आणि तो विषय तिथेच सम्पला 

३ वाजले तसे मी नी रोहित ने किरण, भरत आणि मनोज ला उठवल. साले काय मस्त झोपले होते..पहावेना ..छे ! Happy ठीक 3:15 च्या सुमारास आम्ही निघालो. जवळच कल्काइ देवीच दर्शन घेतल. आड बाजुला असलेल्या देवराइ मधल्या थन्ड वातावरणात तसच बसुन राहवस वाटल. अर्थातच थाम्बून चालणार नव्हत. आता ताम्हिनी घाट उतरायचा होता त्यामुळे वेगाने जाता येणार होत. देवरईतुन बाहेर पडून रस्त्याबाजुचे चार धाबे मागे टाकत आम्ही झपाटल्यासरखे घाटाच्या मथ्यावर पोचलो आणि डीसेन्ट सुरु केला. सर्वसाधारणपणे रनिन्ग, सायकलिन्ग सारख्या प्रकारात एक ठरावीक Pattern आपोआप सेट झालेला असतो. वेगाची आवड, शारीरिक क्षमता, सायकल्चा दर्जा इत्यादीमुळे काही न ठरवता सर्वात पुढे कोण असणार त्यानन्तर कोण आणि शेवटी कोण असेल हे ठरुन गेलेल असत आणि शक्यतो हे Formation ब्रेक करु नये. पण उतारावर उत्साहात रोहित भन्नाट वेगाने पुढे निघाला. त्यानन्तर मनोज मग मी, किरण आणि भारत घाट उतरु लागलो. आमच्यामधे साधारण ५०-६० मीटर च अन्तर होत. तेव्हढ्यात रोहित्च्या BagPack मधून एक लहानशी पिशवी खाली पडली. आता ह्या वेगात थाम्बून ती पिशवी उचलण केवळ अशक्य होत म्हणुन मी त्याकडे दुर्लक्ष केल पण मनोज मात्र मला खाणाखुणा करुन सान्गत राहिला. मी ओरडुनच त्याला जाउ दे लक्ष देउ नकोस सान्गितल तरी मनोजचे हातवारे चालुच. एव्हाना सायकल्स नी चान्गला वेग पकडला होता आनि तेव्हाच रस्त्याने एक झोकदार वळण घेतल. माझ लक्ष जरी सायकलकडे असल तरी मी मनोजकडे नजर ठेवुन होतोच. कारण अजुनही बेसावध असलेला मनोज वेगावर नियन्त्रण मिळवुन सायकल control करु शकेल का नाही ते मला कळत नव्हत. पण जसा रस्ता वळला तस मनोजला पण जाणवल कि त्याने स्पीड miscalculate केलाय. पण एव्हाना उशीर झाला होता. दोन्हि हाताने ब्रेक आवळत सायकल डाम्बरी सडकेवर ठेवायचा त्याने अटोकाट प्रयत्न केला खरा पण त्याचा फ़ार उपयोग झाला नाही. रस्ता सोडत लगतच्या मतीतुन जात जात मनोज सायकल सकट रस्त्याबजुच्या ट्रेन्च मधे खाली गेला... अक्शरश: गायब झाला.
IMG_3217.JPG

ते थरारक द्रुश्य मनावर कोरल गेल ते कायमच. मी जमेल तशा रोहितला हाका मारल्या अणि सायकल थाम्बवली. परत आलो तेव्हा किरण सायकलवरुन उतरुन मनोजकडे धावला होता. त्यानेसुद्धा सगळा प्रकार ह्याची डोळा पाहिला. आम्ही खुपच घाबरलो होतो इतक्यात मनोज उभा राहिलेला दिसला आनि जरा बर वाटल. मनोजला चेहर्यावर डावीकडे आणि डाव्या हाताला खुपच खरचटल होत. त्यात तो Excite होउन आम्हालाच अनेक सुचना करत होता आणि धक्क्याने बडबडत होता. सर्वात आधी त्याला हाडाला आणि डोक्याला कुठे लागल तर नाहीना ह्याची खात्री केली. केवळ नशीबाने मनोज वाचला होता कारण तो जिथे पडला तिथे आजुबाजुला दगडधोन्डे आणि सीमेन्ट चे खाम्ब होते आणि हा बरोब्बर त्याच्या मधे आपटला म्हणुन वाचला. ज्याप्रकारे अपघात झाला होता ते खुपच भितीदायक होत त्यामानाने फ़ार लागल नव्हत. काहीच मिनिटान्पूर्वी घेतलेल्या देवीच्या दर्शनाने वाचवल आम्हाला. आप्ल्या अन्गाखान्द्यान्वरुन खेळवता खेळवता त्या माउलीनेच जणु आम्ची कळजी घेतली होती.

मनोज अजुन धक्क्यातुन सावरत होता. त्याला तिथेच बजुला गवतावर आडव करुन पटकन त्याच्या नव्या कोर्या मेरिडा साय्कल्डे एक नजर मारली. त्याच नशीब खरोखरच जोरावर होत. सायकलला फक्त पन्क्चर व्याधी झाली होती. घाइघाइत आम्ही पन्क्चर काढल खर पन टायरमधे घुसलेला काटा काढायला विसरलो Happy त्यामुळे नवीन टुबे टाकल्यावर परत पन्क्चर. अस सावळा गोन्धळ..त्याही परिस्थीतीत आम्हाल आमच हसू आल. शेवटी तो काटा काढला मग tubeला patch मारले नि सायकल ठीक केली.
IMG_3221.JPG

एव्हाना मनोज भाउ धक्क्यतुन सावरले होते. पण आमच आधीच गडबडलेल वेळापत्रक आता सम्पुर्ण कोलमडल होत. पण शीर सलामत तो ...म्हणत आम्ही ताम्हिनी घाट उतरते झालो आनि विळे MIDC मधुन माण्गावात आलो. मनोजने फोन करुन इन्दापुर च्या आकार Ptteryच्या श्री कुलकर्णी याना फ़ोन करुन घडला प्रकार सन्गितला. त्यानी लगेच त्यान्च्या गेस्ट हाउस मधे आम्ची राहयची व्यवस्थ केली. माणगव - इन्दापुर हे १० किमी मरुन आम्ही श्री कुलकर्णीन्च्या गेस्ट हाउस मधे पाय उतार झालो. तिथे पोचल्यावर परत एकदा चर्चा केली नी सार्वमत घेतल. दिवसभरातल्या अपघातान्मुळे दोघाना बर्यापैकी लागल होत; मनोजचा हात आणि चेहरा चान्गलाच सुजला होता तर भारतची सायकल किती तग धरेल ह्याची शाश्वती नव्हती. तसच ह्या राईडच श्येडुल अन प्लानिन्ग सपशेल कोलमडलेल होतच. त्यामुळे सर्व घटकान्चा शान्तपणे विचार करुन आम्ही एकमुखाने परत पुण्याला जायचा कठोर निर्णय घेतला.
IMG_3132.JPG

दुसर्यादिवशी सकाळी करायला काहीच नव्हत म्हणून मग जवळच्या कोकणरेल्वेच्या track वर गेलो तिथले काही फोटो. Model अर्थातच ठरलेल्ला Happy The Rohit
IMG_3123.JPG14478009293_35f5c5a69a_z.jpg

आकार च्या वोर्क्शोप ला भेट दिली. कुलकर्णी ह्यानि प्रत्येक बरीक सरीक गोष्टीन्ची महिती दिली आणि स्वत: Pottery चे काहि नमुने पेश केले. मग आम्हीही आम्ची शोप्पिन्ग ची हौस भागवत मातीच्या वस्तु खरेदी केल्या. सगळ्यानि आगदी अवर्जुन भेट द्यावी अस हे ठिकाण पाहुन श्री. कुलकर्णी ह्याना अनेक धन्यवाद देउन अम्ही त्यान्चा निरोप घेतला.
14271265240_cb9b73da6b_z.jpgIMG_3169.JPGIMG_3170.JPGDSCN7551.JPG
परत येताना विळे MईडC ला सगळ्या सायकली गपगुमान एका टो व्हीएकल मधे टाकल्या आणि सायन्कळी ७ च्या दरम्यान पुण्यप्रान्ती चान्दनि चौकात परत आलो ते एक न विसरता येणरा किम्बहुना 'विसरु नये असा' अनुभव गाठिला अन एक खुणगाठ मनाला बान्धुन.
14434803256_b9b12bbba4_o.jpgDSCN7556.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुणे ते माणगाव सायकल वरून.... डोळे गरागरा फिरायला लागले
beaten-up-animation-animated-beaten-up-smiley-emoticon-000385-large.gif
माणगावपासून २०-३० किमी पुढे खामगाव-म्हसळ्याला मी १९९२-९६ मधे राहिलेलो आहे. रस्ता नुसता चढ- उताराचा आहे. पुणे ते श्रीवर्धन ईतके टार्गेट १२ ते १८ तासांत पार करणे आव्हानच आहे, पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा Happy

वाचता वाचता इंदापूरवरून पुण्याला परत कसे याल, याची मलाच भीती वाटत होती. पण अशा प्रसंगात चांगला निर्णय घेतलात. फसलेली असली तरी लिहिलस हे छान केलस. तुम्हाला आणि पुढच्या लोकांना काय काळजी घ्यावी हे कळेल वाचून.
पुढच्या ट्रीप ला शुभेच्छा. Happy

मंजिले तो कई है जिंदगी मे.
असली मजा तो सफर मे है दोस्तो ....

प्रथम सर्वांचे अभिनंदन, नावात फसलेली शब्द राहुदे अमित ती एक प्रेरणा असते तीच राईड पुर्ण करण्याची.
फोटोवरुन भन्नाट मजा केली असेच वाटतेय.....
पुढच्या राइडसाठी शुभेछा

ते केडब्लूपी काय आहे रे बाबा .

फसलेली(असे तुम्ही म्हटले तरी) असली तरी एकुणात मजा आलेलीच असेलच ना( एका वेगळ्या अनुभवाची).
मनोज बद्दल वाचून भिती वाटली.

काय करवंद आहेत.... त्यासाठी तरी मजा आहे.

ही फसलेली राईड आहे ?? घसघशीत पुणे ते इंदापुर आलात की.. आमच्यानं दहा कि.मी. सायकल चालवेना आम्ही या राईडला पृथ्वी प्रदक्षिणा गेलाबाजार भारतभ्रमण तरी का म्हणू नये ? Proud
पुढच्यावेळी या चुकाही होणार नाहीत, आणि तुमचा प्रयत्न नक्कीच यशस्वी होईल, मनापासुन शुभेच्छा Happy

बाय द वे हिरो रोडस्टर सारखी आडदांड सायकल वापरणारा पहीलवान कोण असावा बरे ?

धन्स चाफा..
>>> बाय द वे हिरो रोडस्टर सारखी आडदांड सायकल वापरणारा पहीलवान कोण असावा बरे ?

चाफा, तो आडदांड मीच.. Happy

फसलेली वेगेरे काही नाही. मस्त एंजॉय केला की राव.

लढाईत जय झाला का पराजय ह्यापेक्षा लढाई केली हे महत्वाच असत>>>>
तुमच्च आवडीचे वाक्य आहे की ....

झकास वर्णन.
फसलेली वाटत नाही. सगळच मनासारखं झालं तर मजा येणार नाही. अर्थात अपघात होऊ नये ही काळजी घेणे गरजेचे. तुम्ही इतक्या लांबची सायकल ट्रीप केली हे काय कमी आहे का?

पुढ्च्या राईडसाठी शुभेच्छा.
एक जीप-सदॄष्य गाडी सोबत असावी का? सहज मनात आलं.

अरे बाबानो, माणगाव पर्यंत गेलात ते काय कमी आहे का? नेहेमीच ठरल्याप्रमाणेच होते असे नाही.
बडे बडे दौरे मे ऐसे कई छोटेमोटे हादसे होते ही है....! (आभारः मुक्ताफळे धागा)

तेव्हा पुन्हा उठा अन चालू पडा.... तोवर सराव करीत रहा! Happy

पण एकन्दरीत मजाच आली म्हणायची.

ही राईड फसलेली नाही असच बहुताअन्शी माबो करान्च म्हणण असल्याने शीर्षक बदलल आहे. तुम्हा सर्वान्च्या प्रेमळ प्रतिसादान्बद्दल आम्ही तुमचे आभारी अहोत.

शिर्षक बदललं ? आता छान वाटतंय Happy

तो आडदांड मीच.. >>>> पिंगू या बद्दल आपल्याला `रांगडेश्वर' हा पुरस्कार जाहिर करण्यात येत आहे Happy

अमित....

"फसलेली" ऐवजी "आपटलेली" केल्याबद्दल आभार. १०० किमी. जायचे आणि त्या "बनके पंछी गाये प्यार का तराना" टाईप सफरला काही म्हणायचेच असेल तर कौतुकाचेच शब्द प्रतिसादकाला द्यावे वाटले पाहिजे....आणि तसे प्रतिसाद तुम्हाला आलेले दिसतातच.

माझ्याकडून तुम्हाला तुमच्या या कृतीबद्दल.....१. हर्क्युलस व २. रॅले..... भेट म्हणून देता आल्या असत्या तर आनंद झाला असता. आत्ताच्या पिढीतील युवकांना आमच्या वेळेच्या ह्या सायकली पाहू देत, या उद्देशाने फोटो देत आहे.

Hercules Inggris 008.jpgraleigh.jpg

यातील हर्क्युलस मी वापरत होतो तर इसाकअल्ली जमादार नावाच्या मित्राकडे रॅले होती....पण तिला फुल्ल चेन कव्हर नव्हते. गीअर, कोझी कव्हर वा हेल्मेट गॉगल असले काही प्रकार अस्तित्त्वात असतात हेच आम्हाला माहीत नसल्याने या संरक्षक बाबींची उणीव कधी जाणवतही नसे.

आपटलेली Rofl

आपल्यातले दोघे आपटले म्हणून तर नाही ना रे बाबा.....

कालचा खडकवासला परिक्रमा ( वारजे-शिवणे-उत्तमनगर-मांडवी-पानशेत-खानापूर-डोनजे-खडकवासला-वारजे) यशस्वी झालेला आहे, अभिनंदन

पुढची ट्रिप कधी? होवुदे खर्च. Happy
हायवे वर मोठी वाहन ग्रुपने जाणार्‍या सायकलवाल्यांना जागा देतात का चालवायला?
त्या मातीच्या वस्तु सुबक आणि सुरेख आहेत. पत्ता लिहा प्लिज.

चाफा, झकास पुरस्कार आहे. बादवे पुरस्कार द्यायला पुण्यात कधी येताय?

पुढची ट्रिप आता नोव्हेंबर मध्ये आहे. पुणे-गोवा.. आता होईल खर्चच खर्च..

हायवे वर सायकल एका बाजूने नेल्याने तसा काही फारसा त्रास होत नाही. पण सांभाळावे लागतेच.

मातीच्या वस्तू तुम्हांला इंदापूरमध्ये "आकार पॉटरी स्टुडिओ" मध्ये मिळतील.

पिंगू पुणे गोवा करुच पण त्याआधी त्याची पुरेशी तयारी करणे तेवढेच गरजेचे आहे, अजून आपण तेवढे तयार नाही हे माझे व्ययकिक मत. यावेळच्या चूका पुन्हा होऊ नयेत म्हणून ब-याच गोष्टी कराव्या लागणार आहेत. नियमित सराव, आपल्या सायकल बदलणे,वातावरण, वा-याची दिशा,रस्त्याची त्या दरम्यानची स्थिती , नकाशे यांचा अभ्यास आणि शक्य असेल तर बॅक अप व्हॅन वगैरे वगैरे . पुणे गोवा सायकल राईड पुर्ण केलेल्यांचे अनुभव आणि सूचनाही वाचू. आणि त्याआधी पावसातला कोकण फियायचाय तू कुठे गायब झालास ये पुण्यात मग ठरवू.......

किरण, सध्या मी जरा जास्तच व्यस्त झालोय.. आज कुठे सायकलिंग करायला सुरुवात केली आहे. सध्या तरी रणगाडाच पळवेन आणि जुलैच्या शेवटी नविन सायकल घेईन. केदारसोबत त्याबद्दल बोलायचे आहे.

सध्या जून-जुलै हे दोन महिने तरी बर्‍यापैकी व्यस्त असेन. जमल्यास एखाद्या विकांती येऊ शकेन..

अशा राईडमध्ये शरीरातले इलेक्ट्रोलायट कमी होतात, त्यामुळे कन्फ्युजन होऊ शकते व त्यातुन तोल जाणे वा इतर प्रकार होऊ शकतात.
पाण्याबरोबरच एका बाटलीत इलेक्ट्रोलाईट पावडर विरघळवलेले पाणी घ्यावे ,प्रत्येक ब्रेक वेळी थोडे थोडे प्यावे.
बेटर लक नेक्स्ट टाईम.

Pages