या पत्त्यांमागे दडलयं काय????

Submitted by टीशर्ट_समिती on 19 June, 2014 - 04:44

ऐका हो ssss ऐका.....

तमाम हुश्शार Happy मायबोलीकरांसाठी.......

या पत्त्यांमागे दडलयं काय?

Tshirts.jpg

दरवर्षीच्या प्रथेप्रमाणेच याहीवर्षी आपण मायबोली टि-शर्ट करणार आहोत. तुमचा भरघोस प्रतिसाद मिळेल ही खात्री आम्हाला आहेच.

पण यावर्षीचे खास आकर्षण म्हणून आम्ही घेऊन येत आहोत `रंग ओळखा आणि बक्षीस जिंका' स्पर्धा. यात मायबोलीकरांना यावर्षी करण्यात येणार्‍या टि-शर्टचा रंग ओळखायचा आहे. बरोबर रंग ओळ्खणार्‍यास एक छोटसं बक्षीस.

स्पर्धेचे नियम:-
१)स्पर्धेत भाग घेणार्‍याला पुरुषांच्या आणि महिलांच्या असे दोन्ही टि-शर्टचे रंग सांगायचे आहेत.(दोन्ही टि-शर्टसचे रंग एकच असू शकतात ही शक्यताही ध्यानात घ्यावी. :डोमा:)
२)दोन्हीपैकी एकच रंग बरोबर ओळखला तर `मिनी प्राईझ' मिळेल. दोन्ही रंग बरोबर ओळखलेत तर `मेगा प्राईझ' मिळेल.:).
२)स्पर्धेत भाग घेणार्‍या प्रत्येक मायबोलीकराला रंग ओळखण्याची एकदाच संधी मिळेल. (इथे `प्रत्येक मायबोलीकराला' हा शब्द वापरला गेल्या असल्या कारणाने उगाच डु. आयडीने येऊन पुन्हा उत्तर दयायचे कष्ट अतीहुश्शार लोकांनी घेऊ नयेत.. :फिदी:)
३)या स्पर्धेची अंतीम मुदत शनिवार दि.२१.०६.२०१४, सकाळी आठपर्यंत(भारतीय प्रमाणवेळेनुसार) असेल.. Happy
४)या स्पर्धेचा निकाल शनिवार दि.२१.०६.२०१४ रोजी सकाळी दहा वाजता याच बाफवर जाहीर करण्यात येईल.
५)स्पर्धेबाबतचे सर्व अंतीम अधिकार टि-शर्ट समितीकडेच असतील.

ओळ्खा तर मग झाकलेल्या पत्त्यामागील टि-शर्टसचा रंग............. Happy

-----------------------------------------------------------------------------------------------

निकाल लागलेला आहे, पान क्र. ४ वर बक्षिसविजेत्यांची नावं पहा..

rang olkha 2014.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक तर गुलाबी असेल "लेडीजबायकांसाठी"

दुसरा लाल असेल "जेंट्स पुरुषांसाठी"

नसल्यास पोपटी हिरवा रंग असेल

उदयन,तुमचं पहिलं उत्तर `लाल'असं आल्याने `पोपटी हिरवा' हे उत्तर बाद :). एकच संधी हेच सूत्र.. Happy

मी_केदार्,दोन्हीचा रंग स्ट्रॉबेरी रेड असच म्हणायचय ना तुम्हाला? Happy

करडा पुरुषांसाठी असेल (असावाच).

बायकांच्या टी-शर्टाच्या रंगाची नेमकी छटा सांगण्यात आम्ही असमर्थता व्यक्त करीत आहोत.

या बीबेवर हे अवांतर आहे पण तरीही -

यावर्षी संयोजकात फारच जोमात आहेत Happy
कल्पक जाहिराती, खेळ, बीबींची नावं Happy

संयोजक खुप सारं कौतुक Happy

लोकहो आधिक आधिक संख्येने वविला या, टी शर्ट घ्या Happy संयोजकांचे कष्ट सारथकी लावा Happy

नंदिनी,असं नाही हो चालणार..:) दोन दोन उत्तरं नाही हा द्यायची... तुमचं पहिलच उत्तर गृहीत धरणार आम्ही.. Happy

लोकहो आधिक आधिक संख्येने वविला या, टी शर्ट घ्या स्मित संयोजकांचे कष्ट सारथकी लावा >>>> हे तु सांगत्येस ...

कमाल आहे Proud

Magenta (rani colour) - स्त्रीपार्टी
पिवळा - बाप्येपार्टी

दोन्ही पार्ट्यांसाठी कॉमन असेल तर - चॉकलेटी/ब्राऊन्/कॉफी ( ह्या सगळ्या एकाच रंगाच्या शेड्स आहेत- कृपया नोंद घ्यावी Wink )

mi yenar ahe Proud

bhalai ki jamana hi nahi raha!
changal sangav tar mazyawarach joke Proud
jau dya zaal!

कुठलाही रंग असू द्यात, एक माझा आणि एक माझ्या बारक्याचा - असे दिड बूक करा.
बारक्याला माबोचा बॉटल ग्रीन टी-शर्ट खुपच शोभून दिसतो Happy

आशूडे. Lol

आणि संयोजक तुम्ही लई कन्फुज करायलाय राव. लेडिस बायकांसाठी आणि जेन्टस पुरषांसाठी वेगवेगळे रंग असू शकतात म्हणायलाय तर दोन रंग सांगायची मूभा द्यायला हवी ना..

दक्षुतै, बायकांसाठी चा एक रंग आणि पुरुषांसाठीचा एक रंग
असं सांगायला परवानगी आहे की Happy
आणि जर तुम्हाला वाटत असेल की एकच रंग दोघांना आहे तर तो एकच सांगा असं म्हणतायेत ते Happy

संयोजक, मला काळ्या रंगाचा टीशर्ट चालेल Proud
माझ्यासाठी काळ्याची ऑर्डर घ्या Proud

दक्षिणाजी,ते तुम्ही गेस करायचय की रंग दोघांसाठी एकच रंग असेल की नाही . आणि असेल तर तो कोणता असेल :). आधी दोघांचा वेगेवेगळा सांगायचा आणि नंतर एकच असेल तर म्हणुन परत संधी घ्यायची हे काय नियमात बसत नाय बुवा... Happy

Pages