कोण तोंडाला अरे, फासेल काळे?

Submitted by profspd on 19 June, 2014 - 00:56

कोण तोंडाला अरे, फासेल काळे?
ते किती होती सहज नामानिराळे!

त्यांचिया डोळ्यांमधे डोकावुनी रे.....
पाहिले मी कोरडे त्यांचे जिव्हाळे!

गझल थोडी, फक्त डांगोराच मोठा...
गझलचर्चा कोठल्या, नुसते धुराळे!

वेड ते घेऊन जाती पेडगावी....
काय मी म्हणतो, समजती ते निराळे!

चंदनाची सर कशी येणार त्याला?
आज जो तो कोळसा निव्वळ उगाळे!

लांबला पाऊस, थंडीनेच थिजलो....
आणि आता जाळती आम्हा उन्हाळे!

चेह-यावर एक जाळे सुरकुत्यांचे....
त्यात दडले...पाहिलेले पावसाळे!

जमिन होती मात्र कसणारेच नव्हते...
फक्त होते मालकीवरुनी उमाळे!

वेड इतके लागते ठाऊक नव्हते...
पाहतो लांबून त्यांचे गझलचाळे!

स्थूलही नाही कळत मग सूक्ष्म कुठले....
पाहतो त्यांचे रिते मी गझलगाळे!

मी जरा जवळून त्यांच्या काय गेलो....
कोण जाणे का असा जो तो पिसाळे!

मी कुठे ताब्यामधे येतो कुणाच्या?
भेदतो वाटेतले प्रत्येक जाळे!

दोन ओळींच्यामधेही कैक गोष्टी.....
त्यामुळे माझी गझल इतकी झळाळे!

बंद मी केला मनाचा चोरकप्पा....
लावले दारी भले मोठेच टाळे!

एवढी आहेत गाठोडी पडोनी.....
मोकळे ना राहिले कुठलेच माळे!

गझल येते पाडता म्हणतात आता....
जमिन म्हणजे वाटते त्यांना विटाळे!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

साहेब,

ह्या गझलेमध्ये टीकेचा सूर अधिक आला आहे असे वाटत आहे. आपण ज्येष्ठ आहात, आपल्याला काय सांगावे? पण गझल म्हणजे गझलतंत्रातील ताशेरे बनू नयेत असे मनात आले म्हणून लिहिले. Happy

चेह-यावर एक जाळे सुरकुत्यांचे....
त्यात दडले...पाहिलेले पावसाळे!

चांगला शेर! आवडला!!

अहंभावाचा संसर्ग या गझलेलाही झालेला आहे. त्यामुळे...

.... आख्खा भंगारखाना उल्थून टाकल्यानंतर एखादी उपयोगी वस्तू हाती लागावी, नेमकी तशीच अवस्था झाली माझी ही गझल वाचताना हा शेर सापडलेला बघून. Happy

त्यांचिया डोळ्यांमधे डोकावुनी रे.....
पाहिले मी कोरडे त्यांचे जिव्हाळे!

हा एक शेर सोडला तर सगळेच आवडले. इथले संदर्भ माहीत नसल्याने

रात्रीच्या विजे-या घेऊन फिरतो आम्ही.....चा भास झाला. असं वाटलं की भटसाहेबांच्या दिव्य चरणांचा स्पर्श गझलेस झालेला आहे. दिव्यपुरुषाच्या चरणांना स्पर्श केल्यानंतर दिव्य उजेडाने आसमंत झळाळून उठतो आणि डोळे दिपून जातात ते दृश्य डोळ्यांसमोर आलं. वीजवहनाचा गुणधर्म लक्षात घेतला तर आता आपण या वीजेचे वाहक झालेले आहात. जे कुणी आपल्यासामोर वाकेल त्यास चरणामृत देऊन ही परंपरा चालू ठेवावी ही प्रार्थना !

नतमस्तक !