Submitted by ह.बा. on 18 June, 2014 - 03:39
ससाच जिंकील सारे रान....
आपुलेच काटे रुतवुन बसली पानोपान
नाहीतर दिसली असती ती वनराई छान
तू लाख गिरव पांडित्याच्या पाटीवर गझला
मज तिला भोगताना नियमांचे नकोच भान
जा मने नांगरीत अव्हेराच्या पेर बिया
मग तोडुन घे फांदीवरचा ताजा अपमान
येतो दबक्या पाऊलीच जगतो ससा इथे
भित्र्याला चिंता 'ससाच जिंकील सारे रान'
मी फिके फिके लिहीताना पडतो प्रश्न मला
की आहे कसल्या महानतेचे त्यांना दान?
- हबा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तू लाख गिरव पांडित्याच्या
तू लाख गिरव पांडित्याच्या पाटीवर गझला<<<वाचताना वृत्तात अडखळलो बाकी एक दोन जागीही असे जाणवले .चूक माझीच असल्यास क्षमस्व
असो
सगळेच शेर आवडावेत असेच पण अपमान चा शेर जास्त आवडला खूपच वेगळा वाटला
धन्यवाद
>> जा मने नांगरीत अव्हेराच्या
>>
जा मने नांगरीत अव्हेराच्या पेर बिया
मग तोडुन घे फांदीवरचा ताजा अपमान
<<
वा!
>> मज तिला भोगताना नियमांचे नकोच भान
अॅटिट्यूड भारी, पण तिचं भान सुटणार नाही अशाने.
धन्यवाद!!!
धन्यवाद!!!
आपुलेच काटे रुतवुन बसली
आपुलेच काटे रुतवुन बसली पानोपान
नाहीतर दिसली असती ती वनराई छान
बढिया.
बरेच शेर आवडले सर.. मतला
बरेच शेर आवडले सर.. मतला सुपर!
काही काही शब्द मला नवीन आहेत... उदाहरण : अव्हेर
मला सश्याचा शेर नाही कळला (परत वाचीन)
' मने नांगरीत ' खूपच आवडलं हे
धन्यवाद सर
धन्यवाद मुटेजी आणि जयदीप. ससा
धन्यवाद मुटेजी आणि जयदीप.
ससा >>> आपण कितीही ताकदवान असलो तरी दुबळ्या प्रतिस्पर्ध्याचीही आपल्याला भिती वाटते. प्रतिस्पर्ध्याला स्विकारून लढण्याची दानत नसणारे लोक वाघ असले तरी सश्याला घाबरत राहतात. ती भिती त्यांच्या प्रत्येक प्रतिसादात दिसते.
मला गझल आणि शेर ह्यातलं काही
मला गझल आणि शेर ह्यातलं काही कळत नाही.
ह,बा, तुमची थट्टा करत नाही पण तुमच्या गझलेचं नाव वाचून आता उठवू सारे रान ची आठवण झाली.
मला गझल आणि शेर ह्यातलं काही
मला गझल आणि शेर ह्यातलं काही कळत नाही. >>> हे नसतं लिहीलं तरी चाललं असतं. एवढा बोलका प्रतिसाद तुम्ही खाली दिला आहे. आपला मनापासून आभारी आहे.
>>ह,बा, तुमची थट्टा करत नाही
>>ह,बा, तुमची थट्टा करत नाही पण तुमच्या गझलेचं नाव वाचून आता उठवू सारे रान ची आठवण झाली.

सेम हिअर, अगदी थंडीत कुडकुडत एनएसएसच्या कॅम्पमधे म्हणलेली गाणी आठवली.
गझलेपेक्षा त्यातील विचार अधिक
गझलेपेक्षा त्यातील विचार अधिक आवडले.
ताजा अपमान अगदी ताजी प्रतिमा
ताजा अपमान अगदी ताजी प्रतिमा ! छान लिहिलेय.
महेश, समीर, भारती, आभारी
महेश, समीर, भारती,
आभारी आहे!!!