रोज रोज का तुझेच भास व्हायचे?

Submitted by profspd on 16 June, 2014 - 08:46

रोज रोज का तुझेच भास व्हायचे?
गंधयुक्त रोज रोज श्वास व्हायचे!

कवडशांपरी तुझ्या स्मृती सतावती....
हे असे कितीकदा उदास व्हायचे?

गंध एवढे तुझे चहूकडे प्रिये....
कोणते टिपू असे फुलास व्हायचे!

अत्तरास गंधवेड लावलेस तू....
चक्क गंधस्नान अत्तरास व्हायचे!

आज ना उद्या चुकून यायचीस तू.....
रात्रभर करून हे कयास व्हायचे!

आरशासमान तू नि मी बघायचो....
श्वास श्वास पाहुनी तपास व्हायचे!

पावलेच सोडुनी निघून जायचो....
जे दिव्यांसमान यात्रिकास व्हायचे!

आसवे तमाम शायरीत गुंफली....
रंजनास शेर ते जगास व्हायचे!

व्हायची तुझी मिठी सरोवरापरी....
भासही बुडायचे मनास व्हायचे!

खुद्द पौर्णिमा बनून यायचीस तू.....
चांदण्यात हिंडणे झकास व्हायचे!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरेच शेर आवडले
पण ह्या ओळीत पहिल्या शब्दाने जान आणली आहे मस्त बोलते आहे ओळ >>खुद्द पौर्णिमा बनून यायचीस तू.....<<<<

किती बुडू किती नको मनास व्हायचे!<<< वृत्त भंगले आहे साहेब Happy

दीपस्तंभमध्येही 'प' ह्या अक्षरावर 'स्त'चा भार येतो असा माझा समज आहे.

पौर्णिमेचा शेर आवडला.

धन्यवाद!
(तूर्तास) करेक्शन केली आहे!

माझ्या एका खूप जुन्यागझलेत दीपस्तंभ शब्द मी योजला होता व ती गझल आमच्या गुरुजींनी लोकमतमधील 'रंग मैफलीचा' सदरात प्रकाशित केली होती, १९९१/९२मधे!
तो शेर असा होता.....

कैकदा ठेचाळताना वाचलो मी.....
दीपस्तंभाचे अघोरी बेत होते!

.....................प्रा.सतीश देवपूरकर