पांडव कालीन लेणी (अर्वळे गोवा )

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

अर्वळे गोवा येथील पांडव कालीन लेणी. ह्यालाच पाच पांडवांची लेणी असे म्हणतात. विजन-वासाच्या काळात पांडवांचे वास्तव्य येथे होते असा प्रवाद आहे.
leni.jpg

बाहेर कितीही उष्णता असली तरी गुहेत गेल्यावर प्रसन्न थंडावा जाणवतो. ह्याला जादू म्हणावी का स्थापत्य शास्त्राची कमाल खरोखरच कळत नाही leni_3.jpg

फारसा गडबड गोंगाट नसल्यामूळे मनाला फार बर वाटत

leni_2.jpgleni_4.jpg

विषय: 

छान! अरे, पण या गावाचं नाव 'अर्वालें' आहे बहुधा. गोव्यातल्या स्पेलिंगांमधले शेवटाचे M 'म' म्हणून उच्चारले जात नाहीत, तर अनुनासिक उच्चारले जातात.
उदा.: Bicholim = बिचोलीं, Mayem = मयें वगैरे.
-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश

फ : अगदी बरोबर त्या गावाचे नाव अर्वळे आहे. चूक सुधारलीये. पोर्तुगीज काळात प्रत्येक गावाच्या नावाच्या शेवटच्या ईकारांत किंवा एकारांत उच्चारात 'म' लावला जात असे.
उदा: अर्वळे च अर्वलेम साखळी च साकळीम
प्रतिसादाबद्दल धन्यवाद Happy

'प्रत्नकीर्तिमपावृणू' चा अर्थ काय होतो? वर तिसरे निळ्या रंगाचे छायाचित्र पहा आणि अगदी समोरच तुम्हाला हा सुविचार दिसेल.

केदार -- छान!

केदारा, धन्यवाद!

बी, मक्डॉनेल संस्कृत शब्दकोशानुसार प्रत्न (विशेषण) = प्राचीन. 'अपावृणु' हे 'अपावृ' या संस्कृतातल्या धातुचे अज्ञार्थातील द्वितीयपुरुषी एकवचन आहे (म्हणजे मराठीत '(तू) कर', '(तू) राहा', '(तू) खा', '(तू) ऐक' वगैरे आज्ञार्थातली द्वितीयपुरुषी एकवचनी रूपं असतात तसं). 'अपावृ' धातुचा अर्थ 'उघड करणे' (अप + आवृ => 'आवृ' म्हणजे आच्छादणे. 'अप' हे पूर्वपद जोडल्यामुळे 'आच्छादन काढणे'/'उघड करणे' असा अर्थ होतो). या धातुलाच ’अन्‌ + आवृ' हा समानार्थी धातू आहे, ज्याचं 'अनावृत' हे धातुसाधित विशेषण आपण सर्रास वापरतो; उदा.: पुतळा अनावृत करणे.

तर 'प्रत्नकीर्तिमपावृणु' या ओळीतला संधी फोडला तर 'प्रत्नकीर्तिम्‌ अपावृणु' असं वाक्य मिळतं. शब्दशः अर्थ : 'प्राचीन कीर्ती उघड कर'. भावार्थ : 'गतवैभवाचा शोध घे'.

-------------------------------------------
हे पाहिलंत का? : मराठी विकिपीडिया - मुक्त विश्वकोश

क्या बात है फ गुर्जी Happy
केदार फोटो छानच... पश्चिम किनारपट्टीवर पांडव कालीन लेणी बरीच पहायला मिळतात...

फ, धन्यवाद! किती छोटसं वाक्य आहे पण केवढा मोठा अर्थ लपला आहे त्याच्या पोटात.

पन्हाळगडाजवळ मसाई पठार नावाचा एक विस्तृत टेबलटॉप आहे,तिथेही अशाच प्रकारची लेणी आढळतात आणी त्यांचेही नाव पांडवलेणीच आहे.
*******************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

आगाउ ने म्हटल्याप्रमाणे अशी पांडवलेणी बर्‍याच ठिकाणी आढळतात (उदा: अर्वळे, मसाइच्या पठारावर, नाशिक-मुंबइ रस्त्यावरील पांडवलेणी). माझ्या अल्पमाहितीनुसार अश्या प्रकारची लेणी ही बुद्ध काळात बांधली गेली. (ही माहिती चुकीची असू शकते).. साधारणपणे ह्या सर्व लेण्यांच्या आख्यायिका एकसारख्याच असतात. पांडवांनी विजनवासात लेण्या वापरल्या वगैरे वगैरे..

गावाचे स्थानिक बोलीभाषेत नाव 'हरवळे' किंवा 'हर्वळे' असे आहे.
असेच पंडवलेणे अलीकडेच असणार्या बिचोलि ला लागूनच एका भागात आहे.
हर्वळ्याजवळच बारमाही धबधबा आहे ... धबधब्याच्या अगदी समोर उभे राहून तुषारस्नान करता येते!_________________________
-Impossible is often untried.

अगदी बरोबर गिरीराज Happy
हे त्याचे फोटो Happy
haravale.jpg
.
dgabadhaba2.jpg
.
dhabadhaba.jpg