मी एक केली चूक अन् आयुष्य इतके फाटले!

Submitted by profspd on 16 June, 2014 - 01:54

मी एक केली चूक अन् आयुष्य इतके फाटले!
की, ते पुन्हा नाही मला केव्हा शिवावे वाटले!!

ही तीच ना रे, माणसे निर्भत्सना करतात जी.....
संदर्भ माझा काढता, त्यांचे गळे का दाटले?

मृत्यू, बरे आलास तू, आला उशीराने जरी....
मी वाट केव्हाची बघत आयुष्य सारे काटले!

आता कसे नाही दिसत माणूसकीचे ते झरे?
दुष्काळ पडला समजते पण, प्रेम कैसे आटले?

ते ब्रह्मचारी राहिले ते याचसाठी तर अरे....
आजन्म दुनियेचेच तर संसार त्यांनी थाटले!

हे पायही माझे पुरे, गाठायला शिखरे नवी....
हे पंख जखडू लागले, मीहून मग ते छाटले!

निवडून आले रीतसर, खुर्चीत मोठ्या बैसले....
डोक्यात सत्ता पोचली, निमिषात सारे बाटले!

केदारनाथाचा प्रलय अद्याप काटा आणतो....
साधू खुबीने वाचले, त्यांनी मृतांना लाटले!

या कनवटीला माझिया आहे शिदोरी आजही....
हे ज्ञान जे मी कमवले, ते मुक्तहस्ते वाटले!

मी एकजिनसी जाहलो, ही जिंदगानीची कृपा....
दु:खे, सुखे जी लाभली, त्यांनीच मजला घाटले!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

साहेब,

आपण एक गझल एकदा प्रकाशित केलीत तरी ती तितक्याच हिरीरीने वाचली जाते जितक्या हिरीरीने दोनवेळा प्रकाशित केल्यामुळे वाचली जाते. काळजी नसावी.

काय होते कळत नाही भूषणराव, एकदाच सेव्हची कळ फकत दाबूनही असे होत आहे! मी स्वत: या प्रकाराने उद्विग्न आहे! तसदीबद्दल क्षमस्व! डिलिट करायची सोय व्यवस्थापकांनी केली तर हा मनस्ताप वाचू शकेल!

profspd | 16 June, 2014 - 11:32 नवीन

काय होते कळत नाही भूषणराव, एकदाच सेव्हची कळ फकत दाबूनही असे होत आहे! मी स्वत: या प्रकाराने उद्विग्न आहे! तसदीबद्दल क्षमस्व! डिलिट करायची सोय व्यवस्थापकांनी केली तर हा मनस्ताप वाचू शकेल!
<<<

मला वाटते एकदा प्रशासकांना विचारून बघा. काही वेळा मायबोलीवर पुरेसे धागे निघत नसल्यास ते काही आय डीं च्या सेव्ह बटनात एकदा क्लिक करण्याला दोन असा हिशोब ठेवतात की काय कोणास ठाऊक!

(कृपया हलके घ्या)

डिलिट करायची सोय व्यवस्थापकांनी केली तर हा मनस्ताप वाचू शकेल!
>>>
पुरेपूर अनुमोदन प्रोफेसर साहेब.

असो ही गझल तुमच्या इतर गझलांच्या तुलनेत बरीच बरी वाटली. म्हणजे बाकी गझलात ट ला टठडढण जोडलेले असते बाकी काहीच नसते. ह्यात जरा बिगरीतून पहिलीत आलेले दिसलात.

सम्मिश्र ही अवस्था झाली मनाची.

हीही ओळ गझलेला योग्य आहे. व्रुत्तात बसते

देव सर साधं बोलले तरी वृत्तातच बोलतात!

Proud

दया/करुणा/कीव/कणव हे साध्या मराठीमध्ये एकाच अर्थाचे शब्द आहेत ना...मग संमिश्र अवस्था कशी म्हणता येईल?

काही शेर उत्तम आहेत.
तरीही कविता म्हणून वाचायला अधीक उजवी वाटते.

अवांतर :
गझलेबद्दल एकही प्रतिसाद नाही? एखाद्याला आवर्जून टर्गेट करण्याची सवय सोडायला हवी. आपल्याच गझला सर्वोत्तम असाव्यात ही आसक्ती वाईट नाही पण त्यासाठी दुसर्‍याच्या गझलेचे आपल्या कुजकट प्रतिसादाने वाटोळेच करायला हवे का? एकजण सुरूवात करतो बाकीचे तुटून पडतात. थांबवा रे ही कंपुबाजी.

ह्.बा. - तुमच्या चांगुलपणाची दाद द्यावी तेव्हडी कमी आहे. पण तुमच्या रसिकतेची लेव्हल बर्‍यापैकी वाढवायची गरज आहे.

पण तुमच्या रसिकतेची लेव्हल बर्‍यापैकी वाढवायची गरज आहे. >>> तुमच्या चांगुलपणाची लेव्हल वाढली की माझ्या रसिकतेच्या लेव्हलविषयी तुम्हाला तक्रार करायची संधी देणार नाही. ये मेरा वादा है मिस्टर टोच्या.