पिताना कधी मद्य मोजू नये!

Submitted by profspd on 13 June, 2014 - 00:25

पिताना कधी मद्य मोजू नये!
भले पी किती, होश सोडू नये!!

नजर लागते यामुळे कैकदा....
कुणाचे असे घास मोजू नये!

अघोरी धिटाई नसे चांगली....
विषाची परीक्षाच घेऊ नये!

चुका त्याच त्या का कराव्या कुणी?
निसरड्यावरी पाय ठेवू नये!

सरळसोट रस्ता बरा आपला....
उगा आडवाटेस जाऊ नये!

कितीही जरी संयमी तू तरी....
कधी दृष्य बीभत्स पाहू नये!

बरा पापभीरूपणा आपला....
कुसंगत कधी आजमावू नये!

बनायास निस्संग कर साधना....
असंगासवे संग जोडू नये!

जिथे लोक स्वार्थामधे डुंबती....
ठिकाणी अशा फार थांबू नये!

जणू रेघ काळ्याच दगडावरी....
उरातील मजकूर खोडू नये!

उगा जीवघेण्या नको वेदना....
सृतींचे कधी पान फाडू नये!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पिताना कधी मद्य मोजू नये!

हे बेश्ट ! मनासारकं मिलालं.
फार फार पतल साहेब.
आजकाल कोन इतक मनातल ओलखातय ?
आज काहितरि चान्गल वाचायला मिळलं . नायतर शिकवणिच चाललि होति राव.

मला फक्त नावाखालचा फोन नं आवडला Wink

बाकी शेर म्हणजे.... तेच ते तेच ते आणि तेच ते.... Sad

प्रोफेसर जरा कात टाका की राव...!!!