म्हणतात लोक, वारा पडला आहे.....
तो विश्रांती घेत पहुडला आहे!
मज प्यार चढण अन् वळण नागमोडी....
आपखुशीने मार्ग निवडला आहे!
ना उगाच त्याची काया पालटली....
जगण्याच्या जात्यात भरडला आहे!
बंदच होती दारे जगण्याची ती....
दरवाजा मी एक उघडला आहे!
माणूस एक अन् केवढा पसारा.....
कसाबसा तो आज सवडला आहे!
चोवीस तास शायरीत मी बुडतो.....
पत्नी म्हणते पती बिघडला आहे!
ना सरळ एवढ्या, न्याय मिळाला तो....
तहहयात तो अरे, झगडला आहे!
पायघोळ स्वप्नांचा अंगरखा तो.....
मीहून अखेरीस दुमडला आहे!
रस्त्यालाही कणव कधी ना आली....
दुरून बघतो पथिक रखडला आहे!
मी काय खकाणा होतो मिरचीचा?
ठसक्याने जो तो अवघडला आहे!
काय एवढा जाचक मी झालेलो?
कोणी अडला, कोणी नडला आहे!
प्रेम किती ते निरोपसमयी कळले....
हरडोळा मजसाठी रडला आहे!
बरळणे कशाला मनावरी घेऊ?
मेंदूच सर्व त्याचा सडला आहे!
तोंडामधुनी ब्र न काढतो केव्हा.....
प्रथम पाहिले तो खडखडला आहे!
यश उगाच नाही हाताला आले.....
तो कितीक वेळा धडपडला आहे!
-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१
कोणती धोंड वाटेत आड आली? मधेच
कोणती धोंड वाटेत आड आली?
मधेच जो तो येथे अडला आहे!
पत्नी म्हणते पती बिघडला
पत्नी म्हणते पती बिघडला आहे!<<<
वहिनींचं ह्यात काय चुकलं?
बिघडायला तंदुरुस्त होतो कधी?
बिघडायला तंदुरुस्त होतो कधी?
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/49662
धन्यवाद
धन्यवाद
बिघडायला तंदुरुस्त होतो
बिघडायला तंदुरुस्त होतो कधी?<<<
मग तंदुरुस्त नव्हतात हे वहिनी म्हणतात हे लिहिता कशाला?
गुड क्वेश्चन
गुड क्वेश्चन