"विरक्ती"

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 8 June, 2014 - 23:00

जगासारखे वागुन हल्ली भागत नाही
रात्री झोपत नाही दिवसा जागत नाही

खंत कशी करणार बदलणा-या दुनियेची
मी सुद्धा माझ्यागत हल्ली वागत नाही

आप्त मित्र स्वकियांचे वर्तन सांगून गेले
येथे काही कुणी कुणाचा लागत नाही

दु:ख वेदना विरह आसवे हळहळ चिंता
ते सुद्धा देतो तू जे मी मागत नाही

तुला कधी जमणार अशी "कैलास" विरक्ती
दु:ख न गेल्याचे आल्याचे स्वागत नाही

-- डॉ.कैलास गायकवाड

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

वा!! Happy