पन्तप्रधान नरेंद्रजी मोदी यानी निवडणूक प्रचारादरम्याने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे प्रत्यक्षात काम करण्यास सुरुवात करुन गंगा शुद्धीकरणाचे शिवधनुष्य उचलले आहे त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनन्दन!
प्रधानमंत्री पदाच्या दुसर्या आठवड्यातच याबाबत ठोस पावले उचलण्यात आलेली असून त्यानुसार सुमारे २०० इज्रायली कम्पन्यानी या प्रकल्पात रस दाखवला आहे .
या महाकाय प्रकल्पातील मोठी आव्हाने-
१, गंगा किनार्यावर असणार्या प्रदूषणकारी प्रकल्पांचे विस्थापन
२, साबरमती प्रकल्पाच्या धर्तीवर गंगेचे दोन्ही काठ कॅनॉल प्रमाणे बांधून दोन्ही तीरावर मोठी गटारे बांधणे
३, धार्मिक व अन्य कारणामुळे होत असलेले प्रदूषण रोखणे , ज्यात मॄतदेह गंगेत फेकणे / गंगाकिनारी प्रेत जाळून राख नदीत फेकणे इत्यादी गोष्टी ना(श्रद्धा न दुखावता) पर्यायी व्यवस्था निर्माण करणे
४,वाराणसी व गंगा किनारी राहणार्या रहिवाश्यांचे प्रबोधन करून गंगा शुद्धीकरण व स्वच्छता नियमांचे महत्त्व पटवणे , ज्यायोगे भविष्यातही गंगा शुद्ध राहिल .(असे नको की वारेमाप पैसा खर्च करून सरकारने गंगा स्वच्छ आणि शुद्ध करायची आणि लोकानी पुन्हा ये रे माझ्या मागल्या करत पुन्हा अशुद्ध करायची )
५, वाराणसी ते कोलकाता एवढ्या प्रचण्ड अन्तराच्या भागावर ही योजना राबवणे व त्यासाठी आवश्यक त्या प्रचंड खर्चाची तरतूद करणे / कामाचा दर्जा उच्च राखणे
अशी अनेक आव्हाने आहेत . तरीही काल वर्तमान-पत्रात आलेल्या या बातमीने मन हरखून गेले -
http://timesofindia.indiatimes.com/india/A-waterway-from-Varanasi-to-Kol...
अशी कल्पना ज्याच्या डोक्यात आली त्या महापुरुषाच्या प्रतिभाशक्तीला लाख सलाम!
कोलकाता ते वाराणसी हा जलमार्ग टूरिस्ट क्रूझ साठी तसेच धार्मिक पर्यटन आणि मालवाहतुकीसाठी उपलब्ध झाल्यास ते एक अद्भुत आश्चर्य ठरेल यात संशय नाही!
तसेच यातून गंगा शुद्धीकरण प्रकल्पावर होत असलेला प्रचंड खर्च देखिल वसूल होईल अशीही शाश्वती वाटते!
आपणास काय वाटते?
रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट
रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट प्रोजेक्ट होता आणि रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट करताना गरजेचं होतं म्हणून नदीचं पात्र स्वच्छ करणं /नदी प्रदुषित होवू नये याची काळजी घेणं ह्या बाबी केल्या गेल्या. >>
वेल तसेच मी म्हणतोय की गंगा प्रोजेक्ट हा केवळ गंगा प्रदुषन विरहित करणे हा नाही. तो प्रोजेक्ट आहे अलाहाबाद ते कलकत्ता जलमार्गाने माल वाह्तूक आणि सोबत टुरिझम त्या भागात आणणे हा. आणि ते करताना रिव्हर फ्रंटसारखेच नदी स्वच्छ असणे गरजेचे आहे.
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज प्रकल्प जाहिर केला सरकारनी की महिनाभरानी किंवा वर्षभरानी गंगा नदी स्वच्छ दिसेल असं नाहीये हे सगळ्यांनीच लक्षात घेणं गरजेचं आहे (मग सरकार कोणतं ही असेना).
फक्त अहमदाबादपुरता राबवला गेलेला रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ९७ साली सुरु झाला होता आणि बहूतेक २०११ साली शेवटच्या फेजचं काम झालं.
गंगेच्या संदर्भात अनेक शहरं आणि एकापेक्षा जास्त राज्य असणार आहेत.
अल्पना ह्या असल्या फॅक्ट्स
अल्पना ह्या असल्या फॅक्ट्स लक्षात घेतल्या तर पाप लागेल विरोध करणार्यांना... कारण त्यांना फक्त समोर दिसते त्यावरुनच विरोध करायचा असतो.. खोलात जाऊन नक्की काय आहे ते न बघताच विरोध करायचा असतो.
http://zeenews.india.com/news
http://zeenews.india.com/news/nation/spitting-throwing-waste-in-ganga-ri...
लॉ आणण्यापेक्षा त्याचं अवलंबन चॅलेंजींग... पण या पहिल्या स्टेपला तर शुभेच्छा द्यायलाच हव्यात. हिम्स्,म्हणतायत तसं इकडे विरोधकांनी विरोध केला तर त्यांंचा मूर्खपणा समोर येईल.
ही बातमी लवकरात लवकर काही उपाय होतायत याचं उत्तर आहे.त्यांना मात्र येणारे अडथळे दूर करत-करतच हे सगळं राबवावं लागणार आहे.
<< अल्पना ह्या असल्या फॅक्ट्स
<< अल्पना ह्या असल्या फॅक्ट्स लक्षात घेतल्या तर पाप लागेल विरोध करणार्यांना... कारण त्यांना फक्त समोर दिसते त्यावरुनच विरोध करायचा असतो.. >> बापरे !
अल्पना, वाचतेय. खरंच आणखी काही माहिती काढून लिहिता आलं तर प्लीज बघा. त्याने काही फारसा फरक नाही पडणार. पण डोक्यातला किडा तरी शांत होईल.
<> हे लई भारी.
http://moef.nic.in/sites/defa
http://moef.nic.in/sites/default/files/ngrba/index.html इथे या आधीच्या प्रकल्पांची आणि सध्या राबवल्या जात असलेल्या प्रकल्पाची (गंगा नदीसंदर्भातील) माहिती मिळेल.
पुणे महानगरपालिकेने
पुणे महानगरपालिकेने याच्यावरुनतरी थोडी प्रेरणा घेवून मुठा नदी छान करावी एवढी अपेक्षा.
मुठेच्या काठावर असलेले सीव्हरेज ट्रीटमेंट प्लांट (मैलापाणी शुद्दीकरण प्रकल्प) त्यांच्या पुर्ण क्षमतेने चालत नाही.इथेही बर्याचदा अर्धवट ट्रीटमेंट करुन पाणी नदीत सोडले जाते.नदीच्या पात्रातूनच वाहत असलेल्या मलवाहिन्या कधी फूटल्या तर नदीचे प्रदूषण वाढते.
या विषयी सखोल माहिती हवी
या विषयी सखोल माहिती हवी असणार्यांसाठी हे पुस्तकः On the Banks of the Ganga: When Wastewater Meets a Sacred River
याच पुस्तकातले काही भाग इथे वाचायला मिळतील. गंगा अॅक्शन प्लॅनमधे NEERI (नॅशनल एन्व्ह्यायर्न्मेंटल एंजिनिअरिंग रीसर्च इन्स्टिट्यूट्)चा सहभाग होता. तिथे कामाला असताना आमच्या EIRA (एन्व्हाय्र्न्मेन्टल इंपॅक्ट अँड रिस्क असेसमेंट) विभागात सतत या प्रॉजेक्टचा बोलबाला असायचा. तेच कीवर्ड्स देऊन शोधल्यामुळे 'गंगा अॅक्शन प्लॅन' आणि 'NEERI' हे शब्द १५०व्या पानापासून हायलायटेड दिसतील. तो भाग महत्त्वाचा आहेच, परंतू एकूणच ७वा चॅप्टर, 'पोल्यूशन अँड द एमर्जन्स ऑफ ज्युडिशिअल अॅक्टिव्हिजम' (पान १४०) वाचून चर्चेच्या अनुषंगानं, बर्याच घडामोडींवर माहिती मिळेल.
धन्यवाद मृण्मयी.
धन्यवाद मृण्मयी.
आमच्या पावन पवनेवर सुध्दा
आमच्या पावन पवनेवर सुध्दा अश्याच प्रकल्पाची वेळ आली आहे. जो पर्यंत पवना मावळात वहाते तो पर्यंत फारशी प्रदुशीत नाही. जशी पिंचिमनपात येते तिथपासुन अनेक गटारे जोडली जातात. सोबत हायसिंथ आहेच.
http://www.deccanherald.com/c
http://www.deccanherald.com/content/422390/archives.php
गंगा नदीच्या शुद्धीकरण दर्जात
गंगा नदीच्या शुद्धीकरण दर्जात सुधारणा
पीटीआय, डेहराडून
गंगा नदीचे मोठय़ा प्रमाणावर सुरू असलेले शुद्धीकरण आणि हरिद्वार येथील शांतिकुंज या धार्मिक संघटनेने सुरू केलेल्या जागृती अभियानामुळे नदीचे पाणी चांगल्या प्रकारे शुद्ध होण्यास सुरुवात झाली आहे. याचा मुख्य परिणाम म्हणजे, नदीचे तापमान १९ अंश सेल्सियसवरून १८.१ अंश सेल्सियसवर खाली आले असून पाण्याच्या गढूळपणाचे प्रमाणही लक्षणीयरीत्या घसरून ते १३० 'नेफेलोमेट्रिक टर्बिडिटी' युनिटवरून ९० युनिटपर्यंत घसरले आहे. हरिद्वारस्थित देव संस्कृत विश्वविद्यालय आणि गुरुकुल कांग्री विश्वविद्यालय या संस्थांनी केलेल्या अभ्यासानंतर हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत.
गंगा नदीच्या पाण्याचा वेगवेगळ्या पातळीवर अभ्यास करण्यात आला. नदीच्या पाण्याची पारदर्शकता दीडपटीने वाढली असून ती आता १८ सेंटीमीटरवरून ३० सेंटीमीटपर्यंत पोहोचली आहे. क्लोराइडच्या पातळीत मोठी घट झाल्याचे निष्पन्न झाले आहे. हे प्रमाण आता २६ मिलीग्रॅमवरून १६ मिलीग्रॅमपर्यंत खाली आले आहे. 'निर्मल गंगा अभियान' कार्यक्रमांतर्गत गेल्या दोन ऑक्टोबरपासून शांतीकुंज या संस्थेने गंगा नदीच्या शुद्धीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला होता.
Pages