मी सडा, माझा कुठे संसार होता?

Submitted by profspd on 4 June, 2014 - 01:08

मी सडा, माझा कुठे संसार होता?
एकट्याचा केवढा बाजार होता!

तू कवडशासारखी होतीस भवती....
वाटला तोही मला आधार होता!

भामट्याला भामटा म्हणणेच चोरी....
भामटा तो फार अब्रूदार होता!

एकटक न्याहाळतो तो आरासाही....
केवढा तो लाघवी शृंगार होता!

बायकोची बोलणी ऐकून घेतो.....
तो दरारा अन् गुलाबी भार होता!

माझियासाठीच चिंताक्रांत पत्नी....
शायरीचा जाहला आजार होता!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चोरली माझ्या घराची राखही त्याने परंतू
मी न केला ओरडा..तो चोर अब्रूदार होता!

सुरेश भट - एल्गार

भामट्याला भामटा म्हणणेच चोरी....
भामटा तो फार अब्रूदार होता!

प्रोफेसर

आशय फारच जवळ जात आहे.

भामट्याला भामटा म्हण्ण्याची चोरी होणे कारण तो भामटा फार अब्रूदार होता....प्रोफेसर

आणि

माझ्या घराची राख देखिल त्याने चोरली पण मी ओरडा केला नाही कारण तो चोर अब्रूदार होता....गुरुवर्य आदरणीय श्री. सुरेश भट!

अभिव्यक्तीत व अर्थांच्या छटेमधे बराच फरक मला तरी जाणवतो!

अब्रूदार शब्दामुळे बहुतेक आपल्याला असे वाटत असावे!

मी घेतलेला प्रत्यय माझ्या बाजात मी मांडला!

अब्रूदार ह्या शब्दाला खूपच सीमीत अर्थ असल्यामुळे असेल!

दोन शेरात व्यक्त केलेल्या घटना वेगवेगळ्या असला तरी मतितार्थ तोच आहे असे मला वाटते.

माझियासाठीच चिंताक्रांत पत्नी....
शायरीचा जाहला आजार होता! >>>>>>>>>>

हे मात्र मला फार पटले आहे. त्या माउली च्या पाया पडायचे आहे एकदा. कुठुन आली इतकी सहनशक्ती त्यांच्यात.