नुकतीच मनोविकास प्रकाशनानं ही माझी तीन लहान मुलांसाठीची पुस्तकं प्रकाशित केली आहेत. खरंतर मला लिखाणाचा काही अनुभव नाही. लेकीला कथा सांगताना योगायोगानं मी त्या लिहून ठेवू लागले होते. त्या अाधी परीक्षेचे पेपर आणि टेक्निकल डॉक्युमेंटेशन यांव्यतिरिक्त काहीही लिहायची मला सवय नव्हती. पण या बालकथा मुलांना आवडल्या, काही मायबोलीकरांना अावडल्या आणि मग प्रकाशकांनाही अावडल्या. त्यामुळे मनोविकास प्रकाशनातर्फे माझी तीन बालकथांची चित्रमय पुस्तकं प्रकाशित होत अाहेत. या पुस्तकांत मुलांना अावडतील असे कॅरेक्टर स्टिकरही असणार अाहेत.
ही तीनही पुस्तकं मायबोलीच्या खरेदीविभागात उपलब्ध आहेत.
या पुस्तकांविषयी थोडंसं -
१. कापसाची म्हातारी -

मुलांना झाडं, पानं, फुलं यांच्याबद्दल उत्सुकता असतेच. त्यांबद्दल गोष्टी ऐकायलाही अावडतात. या पुस्तकातल्या निसर्गकथा मुलांचं कुतूहल वाढवून त्यांना निसर्गाच्या अधिक जवळ अाणतील असं वाटतं. कापसाची म्हातारी, पाण्याच्या थेंबानं केलेला प्रवास, पडणार्या तारकांना जाळ्यात पकडणारी परी, रुसलेले इंद्रधनुष्य अशा गमती असलेल्या बालकथा या पुस्तकात अाहेत. प्रत्येक कथेला साजेशी पानभर रंगीत चित्रं मुलांना नक्की भुरळ घालतील. अगदी लहान मुलांना चित्र दाखवत अाईबाबांनी किंवा शाळेतल्या दिदीनं वाचून दाखवण्यासारख्या किंवा नुकतंच वाचायला शिकणार्या मुलांना स्वत: वाचता येऊ शकतील अशा या कथा मुलांना अावडतील, असं वाटतं.
२. शिंगवाला उंदीर -

निसर्गाबरोबरच मुलांना अाजूबाजूला दिसणार्या प्राण्यांबद्दलही खूप कुतूहल असतं. उंदीर, माऊ, बेडूक, मासे, कासव, चतुर, वाघोबा अशा प्राण्यांबद्दल असलेल्या या कथा मुलांना नक्कीच खदखदून हसवतील. या पुस्तकातही असणारी पानभर रंगीत चित्रं मुलांचं पुस्तकाबद्दलचं कुतूहल वाढवत त्यांना पुस्तक हाताळायला, वाचायाला उद्युक्त करतील, असं वाटतं. या गोष्टी मुलांना अाईबाबा / दिदी यांच्याकडून ऐकायला किंवा स्वत: वाचायलाही सोप्या अाहेत.
३. कुनीदेशातल्या कथा -

कुनी नावाचा एक काल्पनिक देश! या देशातल्या वेगवेगळ्या रंगाच्या तीन बेटांवर घडणार्या गमतीजमती सांगणार्या गोष्टी या पुस्तकात अाहेत. कुनी देशातले लोक, त्यांची भाषा , तिथल्या चालीरीती यांच्याबद्दलच्या वेगळ्याच मजेदार गोष्टी या पुस्तकात वाचता येतील. चंद्रावर जाणारे ससे, मावळायला विसरणारा सूर्य, जंगल सोनेरी करणार्या परीला मदत करणारी छोटी मुलगी - मोमो, हिमपर्यांना धडा शिकवणारी झाडं अशा अनेक गमती या पुस्तकात घडतात. या पुस्तकातल्या कथा थोड्या मोठ्या अाहेत. साधारण सातआठ वर्षांवरील मुलांना त्या स्वत: वाचता येऊ शकतील. लहान मुलांना आवडतील अशी पानभर सुंदर चित्रं या कथांना दृश्यरूप देतात.
या तिन्ही पुस्तकासाठी ऋजूता घाटे यांनी अतिशय सुंदर आणि गोंडस चित्रं काढलेली अाहेत. रंगीत चित्रं असली तर मुलांना पुस्तकाबद्दल कुतूहल निर्माण होतं अाणि ही चित्रं मुलांनाच नाही, तर मोठ्यांनाही आवडण्यासारखी अाहेत.
या पुस्तकांत गोष्टींचे शेवट सकारात्मक करण्याकडे माझा भर होता.
बर्याचजणांना प्रत्येक बालकथेतून काहीतरी शिकवण मिळायलाच हवी, दुष्ट विरुद्ध सुष्ट किंवा काहीतरी वाईट घडतं आणि मग कोणालातरी शिक्षा होते, असा एक साचा असायला हवा, अशा काही अपेक्षा असतात. ते मात्र मी टाळलेलं अाहे. काही कथांमधून झाडं, पाणी, प्राणी यांबद्दल माहिती मिळतेही. पण या कथा वाचून मुलांना निखळ अानंद मिळावा, हीच एक अपेक्षा होती अाणि अाहे. यांतल्या काही कथा मायबोलीवर प्रकाशित झालेल्या अाहेत. त्या मायबोलीकरांच्या ज्युनिअर गटाला अावडल्याही होत्या. मायबोलीच्या अाणि मायबोलीकरांच्या प्रोत्साहनामुळेच ही पुस्तकं प्रकाशकांपर्यंत पोहोचवण्याची हिंमत मी केली होती. अाता नव्या कथांसहित चित्रमय पुस्तकंही ज्युनिअर माबोकरांना अावडतील, असं वाटतं.
पुस्तकं वाचली / वाचून दाखवलीत की ज्युनिअर माबोकरांच्या प्रतिक्रिया इथे कळवायला विसरू नका.
ही तीनही पुस्तकं मायबोलीच्या खरेदीविभागात उपलब्ध आहेत.
१. कापसाची म्हातारी - https://kharedi.maayboli.com/shop/kapasachi-mhatari.html
२. कुनीदेशातल्या कथा - https://kharedi.maayboli.com/shop/kunideshataly-katha.html
३. शिंगवाला उंदीर - https://kharedi.maayboli.com/shop/shingawala-undir.html
मायबोली खरेदी विभाग चालत
मायबोली खरेदी विभाग चालत नाहीये कां? >> +१
मलाहि हवी आहेत ही पुस्तकं......
हेच म्हणायला आले होते.
हेच म्हणायला आले होते.
खरेदीविभाग गेले काही दिवस
खरेदीविभाग गेले काही दिवस डागडुजीसाठी बंद आहे. सुरू झाल्यावर इथे लिहितो.
धन्यवाद चिनुक्स.
धन्यवाद चिनुक्स.
खरेदीविभाग कधी सुरु होईल?मला
खरेदीविभाग कधी सुरु होईल?मला हि पुस्तकं फेब्रुवारित भेट द्यायची आहेत.
पुस्तके विक्रीकरिता ऑनलाईन आणखी कुठे उपलब्ध आहेत?
Pages