फुटकळ - ३

Submitted by बेफ़िकीर on 2 June, 2014 - 11:30

काही नवीन सुट्टे शेरः
================================

सुगंध शोधत असताना हे समजत नव्हते मला कधी
चाफ्याच्या वरताण घमघमे एक मोगरा घरामधे
=================================

कातरवेळी उदास वाटत असणे
सर्व ठीक असण्याचे लक्षण असते
=================================

ओसाड व्हायच्या आधी माझी हिरवळ
कुठल्या पाण्यावर तगली हेच स्मरेना
=================================

विस्मरलेले कोणी कोणी भेटत आहे
कधी किती कोणाचा होतो समजत आहे
=================================

शेवटी केले स्वतःला माफ मी
शेवटी केलेच मन हे साफ मी
=================================

लुटले जाताना ही चिंता होती
लुटणार्‍याला पचेल ना ही दौलत?
=================================

रोज सकाळी कबूतरांना दाणे, पाणी देतो
तेव्हा कोठे फुकट खायचे धाडस अंगी येते
=================================

त्या डोहाचा गाळ नको उपसूस कधीही
मदतीसाठी आक्रोशत बुडलेत कितीजण
=================================

सगळ्यांना समजत होते की फेकत होते सगळे
फक्त तसे म्हणण्याचे धोके टाळत होते सगळे
=================================

तुझी ती भरजरी साडी विसंगत वाटणारच ना
मुलाचे प्रेत जर ताब्यात घेण्या जायचे होते
=================================

-'बेफिकीर'!

फुटकळ एक

फुटकळ दोन

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कातरवेळी उदास वाटत असणे
सर्व ठीक असण्याचे लक्षण असते

वा वा!

ओसाड व्हायच्या आधी माझी हिरवळ
कुठल्या पाण्यावर तगली हेच स्मरेना

वा!

लुटले जाताना ही चिंता होती
लुटणार्‍याला पचेल ना ही दौलत?

मस्त!

कातरवेळचा भारी आहे! Happy

स्वाती आंबोळे,

माझ्या मनातील प्रतिमेनुसार आपण त्यातल्यात्यात नेमक्या शेरांना दाद दिल्यामुळे झालेला आनंद मोठा आहे. Happy

धन्यवाद!

वैवकु, आपल्या लोभाचेही आभार! Happy

-'बेफिकीर'!

(दुर्दैवाने शेवटचे तीन शेर माझ्या मनाला अत्यंत भिडले असूनही ते दुसर्‍यांना तितकेच भिडावेत अशी अभिव्यक्ती साधणे नाही जमले) Happy

कातरवेळी उदास वाटत असणे
सर्व ठीक असण्याचे लक्षण असते

लुटले जाताना ही चिंता होती
लुटणार्‍याला पचेल ना ही दौलत?

वरचे २ खूप आवडले. शेवटच्या शेरात पूर्ण स्टोरी काय असेल असा विचार आला मनात.

शेवटच्या शेरात पूर्ण स्टोरी काय असेल असा विचार आला मनात.<<<

शूम्पी, अत्यंत भयानक (आय मीन इट) स्टोरी आहे.

दोनच दिवसांपूर्वी भेट झालेली आहे.

सर्वांचा आभारी आहे.

मोगरा, कबूतर अक्षरशः घुसले,
लक्षण,दौलत, डोह आह !!

स्टोरीबद्दल उत्सुक...

कातरवेळी उदास वाटत असणे
सर्व ठीक असण्याचे लक्षण असते.............व्वाह.

विस्मरलेले कोणी कोणी भेटत आहे
कधी किती कोणाचा होतो समजत आहे........अक्षरशः तादात्म्य झालो. व्वाह.

तुझी ती भरजरी साडी विसंगत वाटणारच ना
मुलाचे प्रेत जर ताब्यात घेण्या जायचे होते..... क्या बात है!!

"कातरवेळी उदास वाटत असणे
सर्व ठीक असण्याचे लक्षण असते"

"ओसाड व्हायच्या आधी माझी हिरवळ
कुठल्या पाण्यावर तगली हेच स्मरेना"

"त्या डोहाचा गाळ नको उपसूस कधीही
मदतीसाठी आक्रोशत बुडलेत कितीजण"

हे सर्वात छान वाटले.

रोज सकाळी कबूतरांना दाणे, पाणी देतो
तेव्हा कोठे फुकट खायचे धाडस अंगी येते

व्वा. बहुतेक शेर आवडले.

कातरवेळ व हिरवळ फार व्याकूळ करणारे.

विस्मरलेले कोणी कोणी भेटत आहे
कधी किती कोणाचा होतो समजत आहे

रोज सकाळी कबूतरांना दाणे, पाणी देतो
तेव्हा कोठे फुकट खायचे धाडस अंगी येते

... अप्रतिम. सगळेच एकापेक्षा एक म्हणावे असे.

सर्वच शेरांत एका सशक्त कथेची बीजे आहेत असे वाटते.