'नापासांचे' ??

Submitted by यक्ष on 2 June, 2014 - 03:19

आता बारावीचा निकाल अपेक्षित आहे.

जे यशस्वी होतील त्यांचे अभिनंदन. ज्यांन्ना प्राविण्य मिळाले त्यांचे मनापासून कौतुक.............

पण........

जे 'निकाल' ह्या संदर्भात ' नापास' म्हणून सुचवल्या गेले असतील त्यांचे त्यांन्नी परिक्षेसाठी मनापासून केलेल्या कष्टांसाठी मनःपूर्वक कौतुक!

'नापास' नुसते म्हणण्याने काही फरक पडत नाही. हे एक 'करेक्शन' आहे आपल्या आयुष्यातील पुढील प्रवासासाठी!

कारण....

थोडे ' निक वुइ-चि़क (Nick Vujicic) ह्या वल्लीचे 'द बटर फ्लाय' ही शाँर्ट फिल्म आवर्जून पहा मग पटेल मी काय म्हणतो ते!

मायबोलिकरांन्नो, तुम्हास विनंती की तुम्हीही हा लघु चित्रपट पहा व तुमच्या परिचयात कोणी 'अनुत्तिर्ण' असेल तर त्यास त्याच्या उज्ज्वल भवितव्याबद्दल प्रेरित करण्याचा जरूर प्रयत्न करा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यक्ष, तुमचा हेतू कितीही स्तुत्य असला तरी,
मी नापासांना धीर देईन , अधिक प्रयत्न करण्यासाठी प्रोत्साहन देईन, काही शारिरीक /मानसिक प्रॉब्लेम असेल तर शोधून करेक्शन सुचवेन ....पण कौतुक नाही करणार.

तुमच्या परिचयात कोणी 'अनुत्तिर्ण' असेल तर त्यास त्याच्या उज्ज्वल भवितव्याबद्दल प्रेरित करण्याचा जरूर प्रयत्न करा. हे ठीक आहे पण कौतुक? मथळा गंडलाय का असेल तर सुधारणा कराल का? कृपया, धन्यवाद Happy

@ झक्की..मर्फीज लॉ,दुसरं काय..

पेपरची प्रॅक्टीस न करता परीक्षेला जातात विद्यार्थी दुसर्‍या बाजूला सगळ्यांची भिती..भविष्य्,पालक्,शेजारी...

नापासांना धीर द्या नक्कीच, पण कौतुक नको.

आणि काय चुकते आहे ते पण स्पष्ट सांगायला पाहीजे ( तुम्ही त्या व्यक्तीच्या कीती जवळ आहात ह्यावर अवलंबुन )

पण जर ती व्यक्ती नापास होण्यासाठी काही न पटण्या सारखी कारणे देत असेल तर ती पण खोडुन काढायला पाहीजेत आणि जो काही निकाल आला आहे त्याची जबाबदारी घ्यायला शिकवले पाहीजे.

पण कौतुक नाही करणार.
<<
अ‍ॅबसोल्यूट अनुमोदन.
'पास' व्हायलाच हवे ही एक कन्स्पेट आहे. कंपल्शन नाही. नापासांचं कसलं कौतुक करताय?
या हिशोबाने वागायचं तर काँग्रेसच्या कौतुकाचे धागे काढू यात आपण Wink

हो! थोडा विचार केल्यावर मथळा गंड्ल्यासारखे जाणवले.

'कौतुक' संयुक्तिक वाटत नाही पण योग्य शब्दही चटकन आठ्वला नाही!

ही फिल्म यू ट्युब वर आहे! त्यातले एक पात्र हात पाय नसलेल्या (नुसतेच धड असलेल्या) निक वुइ-चि़क चे (त्याने त्याच्या शारिरीक स्थिती विषयी खंत व्यक्त केल्यावर) त्या स्थिती विषयी पाँझिटिव्ह बोलतो! मला नेमके हेच शब्दात व्यक्त करावयाचे आहे.

येथिल शब्दप्रभुंन्ना विनंती की (शक्यतो ती फिल्म बघून) योग्य मथळा सुचवा...ह्याबद्दल आधीच आभार.

काही काही शाँर्ट फिल्म्स इतक्या प्रभावी आहेत की आपल्या विचारांचा नुसता कल्लोळ होतो व शेवटी गोंधळ एकदम शांत होउन साध्या - स्वच्छ वस्त्रगाळ विचारकणांचा मउसूत मुलायम थर उरतो कि ज्याचा स्पर्श अनुभुतीची एक वेगळीच झळाळी देउन जातो! जगण्याचा एक वेगळाच कोन दिसवयास लागतो ! जो कि सुंदर असतो!!

मग त्या क्षणभरच्या शाँर्ट फिल्म संपल्यानंतरच्या एकटेपणात आपण बराच वेळ हरवून जातो! (असा माझा अनुभव).

आणखी एक छान शाँर्ट फिल्म म्हणजे 'व्हॅलिडेटेड' ----अप्रतीम....जरूर जरूर बघा!!