लावून दार घेतो, मजला अपाय होतो!

Submitted by profspd on 30 May, 2014 - 12:57

लावून दार घेतो, मजला अपाय होतो!
हल्ली उजेड सुद्धा जातीनिहाय होतो!!

टीका, टवाळखोरी दुर्लक्षिणे हिताचे.....
हा एकमेव त्यावर जालिम उपाय होतो!

या रानटी जगाने मजलाच हिंस्र केले.....
मी मूळचा खरे तर अगदीच गाय होतो!

माझ्यात एक आहे समजूतदार मुलगा.....
मधुनीच बाप होतो, मधुनीच माय होतो!

गझलेमधेच माझ्या पान्हावते मराठी......
मी त्याच रे, दुधाची साक्षात साय होतो!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users