चाफ्याची शेंग

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

परवा अंधार पडायच्या वेळी मी चाफ्याच्या अगदी जवळून गेलो आणि घाबरुन एकदम बाजूला झालो. काळीकुट्ट, निमुळती आणि चकाकणारी चाफ्याची शेंग ओळखण्या अगोदर मला तिची एकदम भिती वाटली. तुम्हाला सर्वप्रथम भितीच वाटेल! नंतर मी थोडे बळ एकवटून एक एक कण पुढे सरकत जवळ जाऊन पाहिले तर ती चाफ्याची शेंग होती. चाफ्याची फांदी तोडून जमिनीत टोचली की महिनाभरात तिला पागोरे फुटतात. चाफ्याच्या बिया असतात हे माझ्या गावी देखील नव्हते. खरे तर मला असे वाटते बहुतेक झाडी ही फांदीपासूनच नवा जन्म घेतात. आमच्या घरी आणि बाजूला तगरीची झाडे आम्ही असेच लावायचो. कण्हेर, गुलाब, जांस्वद ही झाडे देखील अशीच फांदी तोडून पावसाने भिजलेल्या मातित खूपसून द्यायचो. आपसूक तिला मुळा फुटून काही महिन्यात देवपुजेला फुले मिळायची. पारिजातकाच्या मात्र मी बियाच लावलेल्या आहेत. असे म्हणतात आपल्या अंगणात पारिजातक लावू नये मला तर ज्यांच्याकडे घरी प्राजक्त आहे त्यांचा कायम हेवा वाटत आलेला आहे. तो प्रसन्नचित्त करणारा सुवास आणि ती पहाट आणि ते गणपतीचे दिवस आणि ते बालपण सगळच मला माझे नितांत प्रिय आहे!

image.jpeg

सिंगापुरमधे चाफ्याची विपुल झाडी आहेत. चाफ्याचे सगळे रंग इथे सापडतील. मला तो चाफ्याचा दुधिया रंग इतका अफाट प्रिय आहे ना.. की बस!!!! निष्पर्ण झालेल्या चाफ्याकडे बघण्यापेक्षा मला त्या मोठमोठ्या जाडजुड पानांमधला तो चाफ्याचा पुष्पसांभार बघायला फार आवडतो. मला जीवशास्त्र शिकवणारे आपटे सर होते. त्यांना निशिंगंधाचे फार वेड होते. एकदा त्यांनी बीकर मधे पाणी ओतले आणि त्यात निशिगंधाची लांबसर दांडी सोडली. ती थोडी वाकडी केली. झाले विज्ञानाचा तासाला कलेचा रंग चढला. ती गोष्ट माझ्या इतकी स्मरणात राहीली की अधूनमधून माझ्याकडे मी फ्लॉवरपॉट्स बनवतो. अगदी कशातही .. परवा मी बिसलरीच्या बाटलीत साकुराची डहाळी लावली होती. दहा दिवस एक एक कळी उमलत राहिली. किती पिकी असतं ना बालपण!!! त्या सरांचे खूप खूप आभार त्यांनी एक वेड मला दिले. त्यानंतर ह्या फुलावर किती छान छान गाणी एकायला मिळाली. रजनीगंधा फुल तुम्हारे महेके मेरे जीवन मी.. आ.. आ... यू ही महेकी प्रित पियाकी मेरे अनुरागी जीवन मे!! आणि दुसरे.. सुमनसुधा रजनीगंधा आज अधिक क्यो भाये!!?

image_1.jpeg

मागे एकदा मी एका मैफीलीला गेलो होतो. पुरिया धनश्री सुरु होता. सहाची वेळ. सुर्य बुडतो आहे .. चंद्रम उगवतो आहे. आणि मधेच चाफ्याचा गंध माझ्यापाशी आला. आजूबाजूला चाफ्याचे एक बुटके झाडे होते. एक दोनच कळ्या होत्या पण त्या उमलून त्यांनी माझे चित्त वेधून घेतले. आजही ती मैफल माझ्या सर्वाधिक आवडीची मैफल आहे.

image_2.jpeg

मराठी भाषेत चाफ्यावर कुणी फार लिहिल अस मला वाटत नाही. कवी राजा बढे की कवी बी ह्यांची चाफा बोलेना आणि कवयित्री पद्मा गोळे ह्यांची चाफ्याच्या झाडा.. चाफ्याच्या झाडा ही कविता ह्या उप्पर कुठे काही वाचल्याचे आठवत नाही. हो पण म्हणून मी हे अवांतर लिहावं असं नाही हं. माझ आपल स्वान्तसुखाय!

image_3.jpeg

विषय: 
प्रकार: 

बापरे साति दोन सेकंदात तू अख्खा लेख वाचून तुझा अभिप्राय सुद्धा आला. लिहिताना कुणी वाचत का अस वाटल मला):)

बी, छान लिहिलंय.
भारतात क्वचितच बघितल्यात मी शेंगा. केनयात असायच्या पण त्या भरीव असायच्या आत बिया वगैरे नाही दिसल्या.
आपल्याकडे आजीबाईंची कथा अशी आहे कि या शेंगा सर्पविषावर उतारा असतात पण भारतातले सर्प हुशार असल्याने ते रात्रीच येऊन या शेंगा खुडून आपल्या शत्रुचा नायनाट करतात.

साती हेच गाणं लिहीत होते मी! लपविलास तु हिरवा चाफा तेवढ्यात तुझा प्रतिसाद आला..
लेख सुरेख! सुगंधी आठवणींनी भरलेला!

चांगलं लिहीलय. पहिल्यांदाच पाहिली चाफ्याची शेंग
हिरव्याचाफ्याचा उल्लेखवालं आणखी एक गाणं(खरं तर कडवं)--

कधी तू, अंग अंग मोहरणारी, आसमंत दरवळणारी रातराणी वेड्या जंगलात
कधी तू,हिरव्या चाफ्याच्या पाकळ्यात
कधी तू रिम झिम झरणारी बरसात
कधी तू चम चम करणारी चांदण्यात

बी, अतिशय सुंदर लिहिलेस. नेहेमीच छान लिहितोस.

मी पण पहिल्यांदाच पाहतेय शेंग, खरंच भीती वाटली.

सर्व प्रकारचे चाफे डोळ्यासमोर आले मात्र. आमच्या डोंबिवली MIDC भागात कारखाने, कंपन्या आहेत, काही ठिकाणी बाहेर विविध रंगांची चाफ्याची झाडे आहेत. गुलाबीसर चाफ्याची झाडे खूप सुंदर दिसतात.

मस्त लिहिलेले आहे.

>>>परवा अंधार पडायच्या वेळी मी चाफ्याच्या अगदी जवळून गेलो आणि घाबरुन एकदम बाजूला झालो. काळीकुट्ट, निमुळती आणि चकाकणारी चाफ्याची शेंग ओळखण्या अगोदर मला तिची एकदम भिती वाटली. तुम्हाला सर्वप्रथम भितीच वाटेल! नंतर मी थोडे बळ एकवटून एक एक कण पुढे सरकत जवळ जाऊन पाहिले तर ती चाफ्याची शेंग होती<<<

हाच अनुभव तुम्हाला चवळीच्या शेंगेबाबातही येईल बघा.

लेख आणि छायाचित्रे आवडली.

बोरकरांच्या दोन कवितांतल्या ओळी आठवल्या - 'रुप बघाया जरा झुकावा, काठी अन् फुलता कुडचाफा' आणि 'माझ्या गोव्याच्या भूमीत, चाफा पानांवीण फुले; भोळाभाबडा शालीन भाव शब्दांवीण बोले'

बोरकरांच्या दोन कवितांतल्या ओळी आठवल्या - 'रुप बघाया जरा झुकावा, काठी अन् फुलता कुडचाफा' आणि 'माझ्या गोव्याच्या भूमीत, चाफा पानांवीण फुले; भोळाभाबडा शालीन भाव शब्दांवीण बोले'<<<

व्वा

( 'बी', मी गंमतीत जे लिहिले ते तुम्हाला हर्ट करू शकेल हे नंदन ह्यांच्या प्रतिसादामुळे वाटले, कृपया हलके घ्या)

Happy

बी
छान लिहिलयस ,
पण रजनीगंधा म्हणजे चाफा नाही ना ?
रजनीगंधा म्हणजे रातराणी वाटायाचं मला ( अर्थात गाण्यात विद्या सिन्हाच्या फ्लॉवर पॉट मधे निशीगंध दिसतो हे अजुन एक कनफ्युजन )

मलापण रजनीगंधा म्हणजेच रातराणी असे वाटते. पण त्या चित्रपटात निशिगंध दाखवलाय. हो दीपा बरोबर.

कोणीतरी करा आमचे कन्फुजन दूर.

रजनीगंधा म्हणजे रातराणी वाटायाचं मला...नाही! मृण्मयीने लिहिल्याप्रमाणे रजनीगंधा = निशिगंध .

निशिगंधाचे लसूणपाकळीप्रमाणे कंद असतात.रातराणीचे झुडुप असते.

रजनी गंधा म्हणजे टयूब रोझ( निशिगंध) . चाफा, रजनीगंधा आणि रातराणी हे फार मातब्बर सुगंध आहेत अत्तर शास्त्रात. उदबत्तीच्य सुगंधात कायम भेटतील.

मी पण प्रथमच बघितली चाफ्याची शेंग. मस्त फोटो
चाफा बोलेना चाफा चालेना
चाफा खंत करी काही केल्या फुलेना
हे ही गाणं आहे ना चाफ्यावर.

...मोहिनी मंत्रांची एकच स्मृती
चाळवी बंदीची साखळी जरा
तोच अडवितो अदृश्य परीघ
परीच्या बाहूंचा चाफेपिंजरा...

...नटमोगरिच्या कळ्या सुईच्या तरारल्या अंगावरती
थरारल्या देहावरती आली चंचल चाफ्याची भरती...

बापटांच्या संग्राह्य पुस्तकात वाचताना चाफ्यावरच्या वरील दोन ओळी आल्या आणि या लेखाची आठवण परत झाली आणि त्या इथे द्याव्याशा वाटल्या.
ध.

Pages