मराठी भाषेचा अभिमान??? आर्थिक स्तरावर बोंबाबोंब!

Submitted by निक्षिपा on 28 May, 2014 - 05:35

मी एका चांगल्या कंपनीमध्ये मराठी कॉपी रायटर म्हणून गेले ८ वर्ष कार्यरत आहे. गेल्या काही महिन्यात कंपनीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बदल झालेत आणि त्याचा नकळत माझ्या कामा संदर्भात परिणाम झालाय अर्थात ही स्लो पोयझनिंग प्रोसेस आहे… थेट 'नोकरीला येऊ नकोस' असे न सांगता काम कमी केली जात आहेत… थोडक्यात नवीन दाणापाणी शोधायची नितांत गरज निर्माण झाली आहे. ८ वर्षापासून या ठिकाणी कामाला असल्यामुळे थोडा थोडा करत पगार वाढत आता महिना ३० हजाराला पोचला आहे. कुठल्या प्रकारच्या मराठी जॉबमध्ये महिना साधारण ३० हजार मिळू शकतील याची कल्पना नसल्याने मराठी भाषेशी निगडीत (उप संपादक, वरिष्ठ लेखक इत्यादी) निदान २५ हजाराची तरी नोकरी मिळावी अशी अपेक्षा आहे (लोक नोकरी सोडताना इन्क्रीमेंटचा विचार करून किंवा जास्त पगाराची नोकरी मिळतेय म्हणून सोडतात) आज माझे अज्ञान म्हणा किंवा योग्य मार्गदर्शन नाही म्हणा पण मराठी लिखाण उत्तम असून, चार ठिकाणी शब्द टाकून सुद्धा माझ्या नोकरीच काहीच होत नाहीये… मराठी पेपर, मासिक, सगळीकडे जोरदार प्रयत्न सुरु आहेत… आज पहिल्यांदा खूप हताश व्हायला झालंय. मराठी… मराठी… आपण बोलतो पण त्याला आर्थिक मिळकतीच्या दृष्टीने बाजारात काहीच किंम्मत नाहीये का? इंग्लिश कॉपी रायटरचे हज्जारोनी जॉबस आहेत… मराठी कॉपी रायटरचे भवितव्य काय? शेवटी चक्क ५-८ हजारांचा डीटीपी ओपरेटरचा जॉब करावा लागेल की काय अशी शंका येते…

मला रडका सूर लावायचा नाहीये पण माहितगारांकडून मदत हवी आहे. मराठी भाषा उत्तम लिहिणारी (अनेक वर्तमानपत्रामधून फ्री लान्स म्हणून अनेक लेख प्रसिद्ध झाले आहेत), वाचणारी, पदवीधर असलेली, इतकेच काय पत्रकारिता शिकलेल्या माझ्या सारख्या सुशिक्षित (मराठी) बेकारांसाठी काही आणि कुठे संधी आहेत का?

मराठी कॉपी रायटरने महिना ३५-४० हजारांच्या जॉबची अपेक्षा करावी का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एके काळी गोदरेजचे टायपरायटर असायचे. मग स्न्गणक आले.

रोलचे क्यामेरे बनवणारी कोडेक कंपनी बुडाली. आता डिजिटल आले.

मरा (ठी) जिन्दाबाद

{{ संधी आहेत का? }}

आपण संधी निर्माण करायचे प्रयत्न तर करु शकतो.
आत्ता सुरवात केली तर १ - २ वर्षात इंग्लिशचि सवय होउ शकते.
अजुन वेळ आहे हातात तोवर प्रयत्न सुरु करा.
व्याकरण तर येतेच जरा शब्द सामर्थ्य वाढवणे हेच एक काम आहे.
आता शब्द टाकला आहे तर माबोकर पण मदत करतीलच

उमेश सर प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद…
आल्या लिखाणातून असे वाटतेय आपण मला इंग्लिश कॉपी रायटिंग शिकण्याच्या सल्ला देऊ इच्छिता. नक्कीच विचार करेन. पण म्हणजे मराठी कॉपी रायटरला काहीच भवितव्य नाहीये का? Sad

माबोकरांकडून नक्कीच मदत मिळेल याची अपेक्षा आहे म्हणूनच कळकळीने इथे मदत मागितली आहे. दिनेशदा, मामी, रिया, dreamgirl, बेफिजी, मंजूडी, मुग्धमानसी, अभिषेक, वेल, साती, स्वाती आपणा सर्वांच्या लेखनाची मी पंखा आहे… आपणाकडून मार्गदर्शनाची मोठी अपेक्षा आहे, अजूनही बरीच नावे आहेत, इथे लिहिण्यात आली नसल्यास क्षमस्व. आपल्या प्रतिसादाच्या अपेक्षेत….

मराठीत न्यूजचॅनेल्स बरीच झालीत आता. त्यात संधी मिळेल असे वाटते . त्यांच्या ग्राफिक्समधल्या व्याकरणाच्या आणि शुद्धलेखनाच्या चुका पहाता तिथे चांगल्या माणसांची गरज असावी.

{{ पण म्हणजे मराठी कॉपी रायटरला काहीच भवितव्य नाहीये का? }}
भवितव्य आपल्या हातात नाहि.
मराठी शिक्षण हि मजबुरी, इंग्लिश हि काळाची गरज आहे.

{{ आपण मला इंग्लिश कॉपी रायटिंग शिकण्याच्या सल्ला देऊ इच्छिता. }}
हो.
येथे . च्याजागी ? हवा होता

समजू शकतो तुमच्या फिलींग्स या क्षणी काय आहेत.
एखाद्या HR एजन्सीला,चांगल्या दर्जाच्या जाऊन भेटा.कदाचीत सोर्स मिळू शकेल.इंग्लीश काय अवघड आहे का?समोरच्याला पटवून देता आलं की मी ते करू शकतो की झालं.एवढं पुरेसं आहे.बाकी अनुभव आहे की...

इंग्रजी कॉ.रा. एवढं अवघड आहे??? मराठीवाले घाबरतात की काय?(मला तुम्हाला इथे प्रोत्साहनच द्यायचं आहे.वेगळा अर्थ घेऊ नये.)

(मराठी आणि आर्थिक स्तर याचा काय संबंध बॉ?? उगाच कशाच्याही माथी खापरं फोडू नका...अवांतर पण खरे...)

शुभेच्छा!

धन्यवाद रॉबिनहूड सर,

त्यासाठीही प्रयत्न करतेय… पण सगळीकडे 'बर, व्हेकेन्सी असेल तर कळवतो' असेच उत्तर मिळतेय… असं वाटायला लागलंय की ओळखी शिवाय कामं होत नाहीत बहुदा… Sad

माबोकर कोणी आहेत का या क्षेत्रात?

विज्ञानदास… तुमच्या उत्साहवर्धक पोस्टीमुळे काहीसे हास्य पसरलंय… धन्यवाद Happy

वरची पोस्ट संपादित केली आहे.
धन्यवाद!
तुम्हाला भाषा अडसर ठरत नसून भाषेची व्याप्ती अडसर ठरत आहे.
यावर तोडगा तुमच्याकडेच आहे असे नाही कां वाटत तुम्हाला?

संपादित!

निक्षिपा,

तुम्ही मराठी <-> ईंग्रजी अनुवादक म्हणुन ही काम करु शकता.
अनुवादक म्हणुन काम करण्यासाठी दोन्ही भाषेंवर पकड असणे गरजे चे आहे, तुमची मराठी वर उत्तम पकड आहेच.
म्हणजे ५०% गड सर झालाच आहे, आपली ईंग्रजी ही काही इतकी वाईट नसते, ती थोडी polish करणे गरजे चे आहे, ते करा...आणि मग welcome to the league of Translators Happy

All the very BEST !!!

तुमच्या अनुभवाचा "अनुवादक" या कामात किती उपयोग होतो माहित नाही पण इथे त्या विषयाचा एक धागा होता. वर्षा म्हणुन आय डी आहेत त्यांचा या कामात अनुभव आहे. त्याना संपर्क करा. कदाचित उपयोग होइल.
आणि निराश होण्याचे कारण नाही. तुमचे काम चांगले असेल आणि तुम्ही सिन्सिअर असाल तर तुम्हाला दुसरे काहीतरी नक्की मिळेल.
शुभेच्छा..

Prasann Harankhedkar आणि mansmi18... प्रतिसादाबद्दल धन्यवाद Happy

निक्षिपा - तुम्हाला माझे लेखन आवडते ह्याबद्ल धन्यवाद आणि तुम्हाला शुभेच्छा.

मराठी वर्तमानपत्रात डेस्क जॉब किंवा मराठी पुस्तक प्रकाशन करणार्‍यांकडे तुमच्यासाठी काही जॉब असू शकतो का हे बघा.

आणि जोवर नवा जॉब मिळत नाही तोवर जुना सोडू नकात कोणी तुम्हाला काम न देता कितीही मेंटल टॉर्चर केलं तरी.

सर्वच प्रतिसाद छान आहेत.
वेलना पूर्ण अनुमोदन
पण जर जॉब जायची वेळ आलीच तर घाबरू नका. संधी संपत नाहीत.
नवीन भाषा शिका, शिकायला वयाची मर्यादा नाही.
भाषा इंग्रजी किंवा परकीय असे मानू नका. मराठी चा अभिमान परकीया भाषा शिकून वापरल्याने संपत नाही, उलट परकीय भाषेतून मराठीचे नवे अवलोकन करा.
तांत्रिक दृष्टिकोनातून भाषा शिका, तंत्रज्ञानावर आधारित संधी केव्हाही इतर संधींपेक्षा जास्त असतात.

महेश वाईट कशाला वाटून घेता? नवीन संधी त्याना मिळतील.
उलट इथे जी भितीची छाया आहे ती संपेल.

चांगलेच घडेल असा विश्वास ठेवला तरच चांगले घडते.

डिविन्स, चांगले काही घडावे याकरीता निक्षिपा यांना मनापासुन शुभेच्छा !
तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार ! Happy

वेल, आपल्या प्रतिसादाबद्दल मनापासून आभार. <<मराठी वर्तमानपत्रात डेस्क जॉब किंवा मराठी पुस्तक प्रकाशन करणार्‍यांकडे तुमच्यासाठी काही जॉब असू शकतो का हे बघा>> आपण सुचवलेले मार्ग आधीच शोधून झाले आहेत. सगळीकडे 'असेल व्हेकेन्सी तर कळवतो अशी उत्तर मिळत आहेत…' <<जोवर नवा जॉब मिळत नाही तोवर जुना सोडू नकात कोणी तुम्हाला काम न देता कितीही मेंटल टॉर्चर केलं तरी.>> हे मात्र मीही पक्कं ठरवलंय.

डीविनिता, आपण दिलेल्या उभारीबद्दल मनापासून आभार. नक्कीच नवीन भाषा शिकण्याचा प्रयत्न करेन.

महेश, आपल्या कंन्सर्नबद्दल आणि दिलेल्या शुभेच्छाबद्दल आभार.

पण तरीही एक प्रश्न अजूनही अनुत्तरितच राहातो… <<मराठी कॉपी रायटरने महिना ३५-४० हजारांच्या जॉबची अपेक्षा करावी का?>>

माबोकर कोणी न्यूजचॅनेल्स, वर्तमानपत्र मध्ये असाल तर प्लीज मदत करा. धन्यवाद.

niskhipaji me D.T.P operator aahe mulund la ......job karto aapnach 5 -6 janani milun kahi marathi sahitya kiva.......ither marathi vishyi chalu kel tar......pan tyasathi chikati.....jidd.....pramanikpana....ani kast gheyachi tyari havi.....ghar sambhalun.....lagech respect milnar nahi pan halu halu milael yat shanka nahi........