भीष्मप्रतिज्ञेची फलश्रुती- भाग १

Submitted by अतुल ठाकुर on 22 May, 2014 - 23:57

Krishna_bhishma-wheel.jpg

महाभारतात भीष्म ही व्यक्तीरेखा लोकविलक्षण आहे. लोकविलक्षण तितकीच गुंतागुंतीचीही. मात्र या व्यक्तीरेखेतील गुंतागुंत ही अभ्यासकांनाच जाणवणारी आहे असे माझे मत आहे. परंपरा आणि लोकमानसात भीष्माविषयी कसलाही गोंधळ नाही. आहे ती फक्त अतीव आदराची भावना. स्वयंवरातील मुली दुसर्‍यासाठी पळवुन नेता येत नाहीत हे भीष्माला माहित नव्हते का हा प्रश्न परंपरा विचारत नाही. द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी भीष्म गप्प का बसला होता हा प्रश्न परंपरा विचारत नाही. दुर्योधनाच्या बाजुने लढायला उभे राहुन आपल्या वधाचा उपाय पांडवांना सांगणे कितपत योग्य हा प्रश्नदेखिल परंपरा विचारत नाही. भीष्मासाठी लोकांच्या मनात फक्त आदर आणि आदराचीच भावना आहे. आणि या आदराचं कारण आहे ती सुप्रसिद्ध भीष्म प्रतिज्ञा.

कोवळ्या, तरुण वयातल्या देवव्रताने सत्यवतीवर आकृष्ट झालेल्या आपल्या पित्यासाठी ही प्रतिज्ञा घेतली. आणि त्यामुळे संतुष्ट झालेल्या शंतनुने त्याला इच्छामरणाचा वर दिला अशी कथा आहे. या प्रतिज्ञेचे दोन भाग आहेत. पहिल्या भागात देवव्रताने राज्यावरील आपला हक्क सोडला आहे. आणि दुसर्‍या भागात आपल्या वंशजांनी राज्यावर हक्क सांगु नये म्हणुन आजन्म ब्रह्मचारी राहण्याचा निश्चय केला आहे. ज्या वयात कामवासना माणसाच्या मनाचा ताबा घेऊ लागते, त्याला सत्तेचे आकर्षण वाटु लागते नेमक्या त्याच वयात देवव्रताने या दोहोंवर पाणी सोडले आहे. दुर्बलांच्या त्यागाला अर्थ नसतो. देवव्रत मात्र तरुण वयातच पराक्रमी म्हणुन ओळखला गेला आहे. अर्थ(सत्ता) आणि काम या दोन्हीं पुरुषार्थांची प्राप्ती करुन घेण्याची धमक बाहुंमध्ये असताना किंबहुना या दोन्ही गोष्टी सहजप्राप्य असताना त्यांचा त्याग घडलेला आहे. लोकमानसाला नेमके याचेच आकर्षण असावे. कारण सत्ता आणि वासनेचे आकर्षण अमर्याद असते, त्याला वयाची बंधनेदेखिल रोखु शकत नाहीत हे लोकमानसाला माहित आहे. हा आदर भीष्माच्या वयागणिक वाढत गेला आहे.

सत्यवतीची दोन्ही मुले निपुत्रिक वारली. चित्रांगद युद्धात मारला गेला आणि विचित्रवीर्य भोग घेत राहुन क्षयाने मृत्युमुखी पडला. सत्यवतीच्या धीवर बापाने मुलिसाठी केलेली सारी व्यवस्था नियतिने धुळीला मिळवली. भीष्माला सत्यवतीनेच प्रतिज्ञा मोडण्याची विनंती करुनदेखिल भीष्म आपल्या प्रतिज्ञेवर अविचलच आहे. त्यामुळे नियोगासाठी व्यासाला बोलवावे लागते. तरुण असताना सहजप्राप्य आणि हक्क असुनदेखिल अर्थ आणि काम यांचा प्रतिज्ञेसाठी त्याग करणारा भीष्म प्रतिज्ञेचं कारणच नाहिसं झाल्यावरदेखिल आपली प्रतिज्ञा मोडत नाही हा भीष्मप्रतिज्ञेचा अलौकिक भाग.

अशा अलौकिक प्रतिज्ञेने भीष्माचं सारं आयुष्य व्यापलं आहे. या प्रतिज्ञेचा दराराच एवढा आहे कि त्यापुढे भीष्माने घेतलेले इतर निर्णय जणु विसरलेच गेले, किंवा लोकमानसाला त्याकडे फारसे लक्ष द्यावेसे वाटले नाही. अशा तर्‍हेची जगावेगळी प्रतिज्ञा करणार्‍या, अलौकिक त्याग करणार्‍या माणसाच्या हातुन गैर काही घडेल अशी शंकादेखिल कुणाला आली नसावी. त्यामुळे भीष्माच्या आयुष्यात त्याला विरोध केला गेल्याचे प्रसंगही क्वचितच आले. आणि आले तेव्हा भीष्म त्यांना पुरुन उरला. सर्वप्रथम अंबेच्या विनंतीवरुन भीष्माचा गुरु परशुराम याने भीष्माला अंबेला स्वीकारण्याची आज्ञा केली. ती आपल्या प्रतिज्ञेच्या विरोधात असल्याने भीष्माने नाकारली. प्रतिज्ञापालनासाठी गुरुशी युद्ध करण्याबाबत भीष्म नि:शंक आहे. त्याला कुण्या गीता सांगणार्‍या कृष्णाची गरज भासलेली दिसत नाही. एकवीस वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय करणार्‍या परशुरामाचा भीष्माने पराभव केलेला आहे. दुसर्‍या प्रसंगी शिशुपालाने राजसुय यज्ञाच्या अग्रपुजेचा प्रश्न जेव्हा निघाला तेव्हा भीष्मावर ठपका घेतलेला आहे. भीष्माचे मत श्रीकृष्णाला हा मान द्यावा असे होते. ते मान्य केले गेले आणि विरोध करणार्‍या शिशुपालाचा वध झाला.

भीष्माच्या व्यक्तीरेखेचे आकलन करताना या काही ठळक बाबी नजरेसमोर ठेऊन विवेचन करावे लागेल. माझ्यासमोर या व्यक्तीरेखेचा अभ्यास करताना कुठलीही विशिष्ठ आवृत्ती नाही. परंपरेत ज्या समजुती आहेत त्या गृहीत धरुनच मी मांडणी करीत आहे. मात्र दोन महान विद्वानांच्या लिखाणाची पार्श्वभुमी याला आहे. एक डॉ. इरावती कर्व्यांचे "युगान्त" आणि गुरुवर्य नरहर कुरूंदकरांचे भीष्मावरील चिंतनपर लिखाण. याबद्दल काही लिहिल्याशिवाय मला पुढे जाता येणार नाही. (क्रमशः)

अतुल ठाकुर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतुल ठाकूर,

भीष्माच्या एकंदर व्यक्तिमत्वाबद्दल सर्वांनाच आदर आहे. मात्र व्यापक हित साधण्याच्या दृष्टीने त्यांनी विवाह करायला हवा होता. अशाने आदर वृद्धिंगत झाला असता. तसेच वस्त्रहरणप्रसंगी त्यांचं वर्तन धीरोदात्त नव्हतं (कुणाचंच नव्हतं). द्यूतात लबाडी चालू आहे हे त्यांना दिसलं नाही का, असाही प्रश्न उभा राहतो.

अर्थात, हे सारं मी पश्चातबुद्धीने लिहीत आहे. Happy

आ.न.,
-गा.पै.

गापै,

पहिली प्रतिक्रिया आपलीच येणार असा अंदाज होताच. Happy

या लेखमालेचे भाग निश्चित नाहीत. आरामात चवीचवीने, आनंद घेत लिहण्याचं ठरवलं आहे. माझ्या डोक्यात बर्‍याच दिवसापासुन असलेला गोंधळ नाहीसा होणार आहे त्यामुळे. Happy

धन्यवाद Happy

खूप छान लिहिलंय.
लेखमाला वाचायला आवडेल. पण आपणच लिहिल्याप्रमाणे, चवीचवीने, आनंद घेत लिहा व आम्हालाही ते तसेच चवीचवीने, आनंद घेत वाचायला मिळेल हे नक्की

आशिकाजी, अखिजी नक्की Happy

महाभारतावर लिहिताना त्यातील प्रश्न कसे सार्वकालिक आहेत याचा वारंवार अनुभव येऊनदेखिल मन नव्याने विस्मीत होत असतं. तुम्ही वाचायला आवडेल म्हटल्याने लिहायला हुरुप आला आहे Happy

मला एक शंका आहे. पन्डू राजा वना मधे गेला. मग ध्रुतराश्ट्र राजा झाला तेव्हा त्याचा राज्याभिषेक झाला होता का ? कि त्यानी भरतासारख रामाच्या बिहाफ राज्य केल?
अजून एक अस की युवराजपद मिळन्यासाठी असा कुठला राज्याभिषेक होता का? अस असेल तर तो दुर्योधनाचा झाला होता का?

आधार म्हणून केवळ (माझ्यासमोर या व्यक्तीरेखेचा अभ्यास करताना कुठलीही विशिष्ठ आवृत्ती नाही. परंपरेत ज्या समजुती आहेत त्या गृहीत धरुनच मी मांडणी करीत आहे. मात्र दोन महान विद्वानांच्या लिखाणाची पार्श्वभुमी याला आहे. एक डॉ. इरावती कर्व्यांचे "युगान्त" आणि गुरुवर्य नरहर कुरूंदकरांचे भीष्मावरील चिंतनपर लिखाण.) हे(च) संदर्भ लक्षात न घेता अभ्यासाची व्याप्ती अजून वाढवून / अधिक संदर्भ तपासून केलेले लिखाण वाचायला आवडेल.

अर्थात हे लिहिण्यामागे आपली भुमिका एका अभ्यासकाची आहे, हे माझे गृहितक आहेच Happy

लेखन आवडलं, पुढेही वाचत राहीन.
मला महाभारताकडे निव्वळ एक काव्य म्हणून बघायला आवडतं. त्यात थोडेसे ऐतिहासिक सत्यही आहे पण माझ्यासाठी त्यात धर्म वगैरे नाही.

पन्डु वनात कायमचा गेलेला होता. राम तात्पुरता वनात गेला होता. त्यामुले भरत ऑन बिहाफ ऑf राम राज्य करु शकला.

पन्दु कायमचाच गेला होता. त्यामुले राज्य ध्रुतराश्त्राचेच होते.

अखी,

पांडू वनात गेला तो नियोगाद्वारे वा अन्य प्रकारे पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून. धृतराष्ट्र अंध असल्याने राजा होण्यास योग्य नव्हताच. त्याने काळजीवाहू राजेपद धारण केलं होतं.

कुंती व माद्री यांना वनात पुत्र झाल्याचं हस्तिनापुरी कळलं तेव्हा धृतराष्ट्राला आपल्या मुलास गादी मिळण्याची शक्यता धूसर वाटू लागली. पुढे पांडू व माद्री यांच्या निधनोत्तर कुंती सपुत्रिक परत आली. तेव्हापासून हे पांडव कोण आणि हे कुठून आले असे प्रश्न विचारले गेले (असावेत). दुर्योधनाने हस्तिनापुरावरील अधिकार सांगतांना पांडवांच्या अधिकृतपणावर शंका घेतली आहे.

आ.न.,
-गा.पै.

हायला, नियोग करायला वनात का जावे लागते? घरात नियोग होत नै का? का वाघ सीन्ह नियोग करणार होते?

हिन्दु धर्म हा लबाड लोकान्चा धर्म आहे. सत्यवतीने स्वतः भोग भोगले आणि तुझी पोरं आमचया पोरान्शी भाण्दतील, हे खुळ तिच्या बापाने भीश्माच्या डोक्यात घुसवुन त्याचा स्ण्सार मोडुन टाकला. पण यातला महान विनोद हा आहे की भीश्माचा स्न्सार मोडुन सत्यवतीचा पर्पज सर्व झाला नाही. तिची स्वतः चीच पिल्लावळ महाभारत लढुन मेली. Proud

दशरथ, राम, लक्ष्म्ण, त्यान्च्या बायका, त्या न्ची मुले, ध्रुवबाळ, कर्ण , शिवाजी महाराज , सम्भाजी महाराज असे अनेक महान लोक हिन्दु धर्मातील लबाड बायकाना किण्वा घरच्या कलहाना बळी पडलेले आहेत. भीश्म हेही त्याच यादीत मोडतात. भीश्माने त्याग केला असा उदोउदो करुन या लब्बाड प्रथाना झाकण्याचा प्रयत्न हिन्दु लोक करत असतात.

बायकान्चे अपहरण हाही चुकीचाच निर्णय होता. आधीच्या पिढीत तीन पोरी पळवल्या. मग पुन्हा पुढच्या पिढीत आन्धळ्याला पोरगी मिळत नाही म्हणुन पुन्हा गान्धारीला जबरदद्तीनेच आणले. त्याचा बदला घ्यायला शकुनी भरतान्च्या घरात घुसला, तर लब्ब्बाड हिन्दु लोक आणि लब्बाड गवळ्याचे भक्त शकुनीच वाईट होता असे सांगत फिरतात ! Proud

लब्बाड गवळ्याचा भक्त या एकाच क्रायटेरियावर भीश्माची पापे झाकली जातात आणि निश्पाप शकुनी खलनायक ठरवला जातो

तिकडे पानिपताच्या धाग्यावरही बोम्ब सुरु आहे. आब्दाली परकीय होता म्हणुन . अरे चोरांनो, तुमच्या आन्धळ्याला पोरगी हवी होती, तेंव्हा तुम्ही गण्धाराच्या घरात घुसले ना रे? आणि आता त्यान्नी आक्रमण केले तर ते परकीय कसे ठरतात ? गन्धाराची कुरापत भरतान्नी काधली, मणुन शकुनीने महाभारत घडवले. गन्धार मोघलान्चा की अब्दालीचा , या वादात पेशवे पैशाच्या लालसेने शिरले आणि अब्दालीने त्यान्चे कम्बरडे मोडले. शकुनी आनि अब्दाली या दोन अफगाण्यान्नी लबाड भारतीयाण्चे कम्बरडे मोडुन ठेअवले.

आणि स्वटःचा लबाडपणा झाकुन ठेउन भारतीय लोक आजही या दोन युद्धान्ना आपल्या पराक्रमाचे प्रतिक म्हणुन गोन्जारत बसतात. Proud आणि शकुनी आणि अब्दाली यान्नीच आमची कळ काढली असा खोटा इतिहास सांगत फिरतात.

पान्डु राज्याचा त्याग करुन्च गेलेला होता.

त्यानंतर ध्रुतराश्त्राचा रीतसर राज्याभिषेक झालेला होता.

पण ध्रुतराश्त्र ऑन बिहाफ ऑफ पाण्डु राज्य चालवत होता अस लबाड हिन्दु खोटे सान्गत असतात.

यात टवाळी काय आहे? वस्तुस्थिती आहे ही.

द्रौपदीवर बळजबरी केली तर शत्रुचा नायनाट करायचा अधिकार तिच्या न्वर्‍याना मिळतो. मग त्याच न्यायाने आपल्या बहिणीवर सक्तीने आन्धळा न्वरा लादला तर त्याचा बदला घ्यायचा अधिकार तिच्या भावालाही मिळतोच की. मग असे असताना शकुनी दुस्श्ट होता असे घसा फोडुन आम्हाला का शिकवले जाते? केवळ भीश्माबाबत आदर वाढावा म्हणुन?

हा भाग तुमच्या बुद्धी पलीकडे आहे
महाभारतात सगळ्याच व्यक्तिरेखा सरळसोट स्वच्छ व सरळसोट मलीन नाहीत दोन्हीच्या मधल्या प्रकारच्या आहेत ही व्यासाची बुद्धीमत्ता असावी त्यासाठी हिंदूना नावे ठेवू नयेत

महाभारताबद्दलचे माझे मत निव्वळ असे आहे की हा ग्रंथ तत्कालीन्ब समाजातल्या उच्चभ्रू लोकांची कथा सांगतो अख्खा समाज एकाच प्रकारचे वर्तन करत असणार किंवा समानच नीतीमूल्यांचे पालन करत असणार असे मला वाटत नाही

अरे देवा इथे हिन्दु धर्म कुठुन आला "लगो"?

महाभारताचा धागा साधारणपणे दुसर्‍या पानावर भरकटतो पण इथे पहिल्याच पानावर दहा प्रतिसादानंतर भरकटलेला दिसतो.

लगो,

तुम्ही उचकावण्यासाठी असे खोडसाळ संदेश टाकताहात. तरीपण त्यांना संयत भाषेत उत्तरं देतो.

१.
>> नियोग करायला वनात का जावे लागते? घरात नियोग होत नै का?

एकदा व्यासांकडून नियोग करवून घेतला होता. त्यातून अडचणी निर्माण झाल्या. धृतराष्ट्र, पंडू आणि विदुर तिन्हींना राज्यपद धारण करण्यास अडचणी आल्या.

२.
>> हिन्दु धर्म हा लबाड लोकान्चा धर्म आहे.

पुरावा मिळेल का?

३.
>> तुझी पोरं आमचया पोरान्शी भाण्दतील, हे खुळ तिच्या बापाने भीश्माच्या डोक्यात घुसवुन त्याचा स्ण्सार मोडुन
>> टाकला.

सत्यवतीच्या बापाने केवळ त्याच्या मनातली शंका मांडली होती. भीष्माने आपणहून ब्रह्मचर्य प्रस्तावित केलं.

४.
>> पण यातला महान विनोद हा आहे की भीश्माचा स्न्सार मोडुन सत्यवतीचा पर्पज सर्व झाला नाही.

साफ चूक. महान विनोद हा आहे की भीष्माचा संसारच नव्हता. Lol तुम्ही झोकून बसलेले दिसताय. (मोदी पंप्र होणार याचं दु:ख एव्हढं तीव्र आहे का?)

५.
>> दशरथ, राम, लक्ष्म्ण, त्यान्च्या बायका, त्या न्ची मुले, ध्रुवबाळ, कर्ण , शिवाजी महाराज , सम्भाजी महाराज
>> असे अनेक महान लोक हिन्दु धर्मातील लबाड बायकाना किण्वा घरच्या कलहाना बळी पडलेले आहेत.

बरं मग? या विधानाने काय सिद्ध होते?

ज्युलिअस सीझरही फितुरीला बळी पडला आहे. रोमन लोक लबाड धरायचे का?

६.
>> भीश्माने त्याग केला असा उदोउदो करुन या लब्बाड प्रथाना झाकण्याचा प्रयत्न हिन्दु लोक करत असतात.

कुठच्या लबाड प्रथा?

७.
>> बायकान्चे अपहरण हाही चुकीचाच निर्णय होता.

त्या तीन राजकन्यांच्या स्वयंवरप्रसंगी भीष्माची टिंगल झाली. म्हणून त्याने त्यांना पळवलं.

८.
>> त्याचा बदला घ्यायला शकुनी भरतान्च्या घरात घुसला,

काय जावईशोध आहे! दुर्योधनाने शकुनीला पाचारण केलं होतं. शकुनी स्वत:हून गेला नव्हता दुर्योधनाकडे.

९.
>> लब्ब्बाड हिन्दु लोक आणि लब्बाड गवळ्याचे भक्त शकुनीच वाईट होता असे सांगत फिरतात !

दुर्योधन श्रीकृष्णाला गवळ्याचे पोर म्हणून हिणवत असे. तुम्ही स्वत:ला दुर्योधनाच्या बरोबरीचे समजता की काय? आजपावेतो काय पराक्रम दाखवलात तुम्ही? जरा कळू द्या लोकांना.

शकुनीला वाईट कोण म्हणतो? उलट त्याच्या नीतीने वागून आर्य चाणक्याने धनानंदाचा नाश केला. शिवाजीमहाराजांनी कपट खेळून अफझलखानाला फाडला आणि सिद्दी जौहरच्या हातावर तुरी दिल्या. विसरलात वाटतं?

१०.
>> लब्बाड गवळ्याचा भक्त या एकाच क्रायटेरियावर भीश्माची पापे झाकली जातात आणि निश्पाप शकुनी खलनायक
>> ठरवला जातो

कोण झाकतोय भीष्माची पापं? आणि भीष्म आणि शकुनी यांचा संबंधच काय? किती ते नशापाणी करून बसायचं!

११.
>> तुमच्या आन्धळ्याला पोरगी हवी होती, तेंव्हा तुम्ही गण्धाराच्या घरात घुसले ना रे?

कोणाचा आंधळा?

१२.
>> आणि आता त्यान्नी आक्रमण केले तर ते परकीय कसे ठरतात ?

कारण अब्दालीने इस्लामचा पाईक म्हणून आक्रमण केलं होतं. मथुरेत निरपराध साधूंची कत्तल केली. अमृतसरमधील हरमंदिरसाहेबाजवळील तळं शीखांच्या प्रेतांनी भरून टाकलं. याला तुम्ही स्वकीय म्हणता यावरून तुमच्या अकलेचा आवाका कळतो.

१३.
>> गन्धाराची कुरापत भरतान्नी काधली, मणुन शकुनीने महाभारत घडवले.

असं कुठे म्हटलंय?

१४.
>> गन्धार मोघलान्चा की अब्दालीचा , या वादात पेशवे पैशाच्या लालसेने शिरले

आजिबात नाही. दिल्लीचं रक्षण करायची जबाबदारी पेशव्यांवर होती. म्हणून ते युद्धात शिरले.

१५.
>> शकुनी आनि अब्दाली या दोन अफगाण्यान्नी लबाड भारतीयाण्चे कम्बरडे मोडुन ठेअवले.

शकुनीच्या वेळेस अफगाणिस्थान होता...? जरा चांगल्या प्रतीची झोकत जा! बेताने किक लागते.

१६.
>> आणि स्वटःचा लबाडपणा झाकुन ठेउन भारतीय लोक आजही या दोन युद्धान्ना आपल्या पराक्रमाचे प्रतिक
>> म्हणुन गोन्जारत बसतात.

अब्दालीने स्वत:च मराठे अतिशय पराक्रमी आहेत असं म्हणून ठेवलंय. मग भारतीयांनी तसंच म्हंटलं तर ती लबाडी कशी?

१७.
>> शकुनी आणि अब्दाली यान्नीच आमची कळ काढली असा खोटा इतिहास सांगत फिरतात.

शकुनीने कळ काढली असं कोण म्हणतो? कळ दुर्योधनाने काढली होती. आणि अब्दालीचं म्हणाल तर निष्पाप साधूंच्या कत्तली करणे म्हणजे कळ काढणे नव्हे का?

असो.

तुमच्या मतांच्या आधारे तुम्ही आता एक पुस्तक लिहा. जेणेकरून अवघ्या महाराष्ट्रीय सारस्वतास तुमच्या ज्ञानमौक्तिकाचा लाभ घडेल.

आ.न.,
-गा.पै.

अरे देवा इथे हिन्दु धर्म कुठुन आला "लगो"?
अरे देवा. अहो तुम्ही मायबोलीवर बरेच नवे आहात की काय?
इथे च काय, कुठेहि हिंदू धर्म नसला तरी हिंदू धर्माला नावे ठेवायची असली की गझलांच्या धाग्यावर जाऊन सुद्धा नावे ठेवता येतात मायबोलीवर!

लबाड आहेत मायबोलीवरचे लोक! त्यातून लक्ष्मी गोडबोले तर बै फारच लब्बाड आहेत.

उद्या आपण सगळे ख्रिश्चन धर्माचे गोडवे गायलो तर ते ख्रिश्चन धर्माच्या लोकांनाहि लबाड म्हणतील. मग आपण धर्म, देव अजिबात न मानणार्‍या लोकांची स्तुति केली तर त्यांनाहि ते लबाड म्हणतील!

काही लोकांना आपले वाटते की आपण सतत कशावर ना कशावर नुसती टीका करत बसलो की लोक आपल्याला एकदम वावा, किती हुषार्र असे म्हणतील!
त्यांचा तरी काय इलाज म्हणा! अज्जिबात म्हणजे अज्जिबातच अक्कल नाही, माहिती नाही पण लोकांनी मात्र आपल्याला हुषार म्हणावे असे साहाजिकच सर्वांना वाटते, तसे त्यांनाहि वाटते.
अस्से असतात बरेच लोक.

पैलवाना काय काय खरडलेस ते नीट वाचलेस का?

Happy

त्या तीन राजकन्यांच्या स्वयंवरप्रसंगी भीष्माची टिंगल झाली. म्हणून त्याने त्यांना पळवल

Proud

पुरुशान्नी टिन्गल केली म्हणुन बायकान्ना पळवायचं ? आँ !

Happy

शकुनीला वाईट कोण म्हणतो? उलट त्याच्या नीतीने वागून आर्य चाणक्याने धनानंदाचा नाश केला.

असे तुच लिहितोस आणि खाली पुन्हा शकुनीने महाभारत घडबले असे कोन म्हनतो हेही तुच लिहिले आहेस.

Happy

नियोग हा स्वता कुन्तीने मन्त्र म्हनुन केला होता. कर्नाच्या वेळी कुन्तीने तो मन्त्र घरातच म्हतला होता.

Happy

तुमच्या मतांच्या आधारे तुम्ही आता एक पुस्तक लिहा.

पुस्तक नाही, पन लेख लिहायचा आहे. हिन्दु धर्म , लबाड लोक आणि भोगवाद असा. भोगवादी लबाड लोकान्नी दुसर्‍याच्या गळ्यात सक्तीने त्याग लादले , या आशयावर. वर भीश्मावर लिवलेला प्यारेग्राफ हा त्यातीलच आहे. पन सध्या वेळ नाही.

शूर आम्ही भोन्दू आम्हाला काय कुनाची भिती
देव देस अन धर्मापायी लढवु जनता भोळी
Happy

असो

लगो,

१.
>> पुरुशान्नी टिन्गल केली म्हणुन बायकान्ना पळवायचं ? आँ !

क्षत्रियांत स्वयंवरप्रसंगी कन्याहरण उचित मानलं गेलं आहे.

२.
>> शकुनीला वाईट कोण म्हणतो? उलट त्याच्या नीतीने वागून आर्य चाणक्याने धनानंदाचा नाश केला.
>> असे तुच लिहितोस आणि खाली पुन्हा शकुनीने महाभारत घडबले असे कोन म्हनतो हेही तुच लिहिले आहेस.

सुसंगत विचार आहे. शकुनी बरावाईट कसाही असो. त्यानं महाभारत घडवलं नाही. दुर्योधनाने घडवलं.

३.
>> कर्नाच्या वेळी कुन्तीने तो मन्त्र घरातच म्हतला होता.

हा नियोग नव्हे.

४.
>> पुस्तक नाही, पन लेख लिहायचा आहे. हिन्दु धर्म , लबाड लोक आणि भोगवाद असा. भोगवादी लबाड लोकान्नी
>> दुसर्‍याच्या गळ्यात सक्तीने त्याग लादले

जरूर लिहा. वाट पाहतोय.

आ.न.,
-गा.पै.