WHOLE मिल्क कुठल्या ब्रँन्डचे

Submitted by सातू on 21 May, 2014 - 14:24

मला WHOLE मिल्क कुठल्या ब्रँन्डचे चांगले असते कोणी सांगेल का ? मी सध्या great value vitamine D वाले वापरत आहे पण त्याचे पनीर होत नाही किंवा दहीही लागत नाहीये . इथे सर्च केले पण अशी चर्चा सापडली नाही .

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Organic Valley. Horizon,

Organic Valley. Horizon, Lucerne या दुधाचे दही बरे बन्ते/लागते. माझी मैत्रिण तर कुठल्याही दुधाचे करते तीचे छानच बन्ते पण ती दुध २० मिनिटे मायक्रोवेवमधे तापवते. मला मायक्रोवेवमधे २० मिनिटे अती वाटल्याने मी कॉइलवरच तापवते पण तरी ही घट्ट दही नाही होत.

ऑरगॅनिक वॅलीचे मी सायवाले दुध आणलेले त्याचे बाकी मस्त दही लागलेले.

Braums चं दूध मस्त असतं असं मी खूप जणांकडून ऐकलं आहे.
दह्यासाठी मला वाटतं की होमोजनाइज्ड आणि अल्ट्रा पाश्चराइज्ड दूध नसेल तर उत्तम.

कुठल्याही होल मिल्कचे पनीर आणि दही चांगले होते. मी पनीर करायला साधे विनेगर वापरते. दही बनवतना विरजण लावायला live active yogurt culture असलेले दुकानातले दही वापरायचे. दूध कोमट हवे. २% दुधाचे दही पण छान होते.

Organic Valley, Horizon चं ऑरगॅनिक दध चांगलं, त्यातल्या त्यातपण फक्त गवत खाणार्‍या गाईचं दुध तर अजून चांगलं. मी मुलीसाठी आणते, व्होल फुड्स मध्ये मिळते. कॉस्टकोत २% Organic Valley मिळते.