नोंद घेण्यासारखा नाही तुझ्यामध्ये बदल!

Submitted by profspd on 17 May, 2014 - 04:03

नोंद घेण्यासारखा नाही तुझ्यामध्ये बदल!
काय तू म्हणतोस त्याची का कुणी घ्यावी दखल?

वर्तमानालाच जपतो, बेत पुढचे आखुनी....
रोज आवर्जून करतो भूतकाळाची सहल!

शीड नाही, ना सुकाणू गलबताला माझिया....
काय मी सांगू किना-या, केवढी माझी मजल!

यायचे नाही कुणीही द्यायला खांदा तुला....
हे तुझे आहे कलेवर, तूच ते आता ढकल!

पापण्यांचा उंबरा ओलांडला नाही कधी....
त्याच अश्रूंची अरे, ही जाहली आहे गझल!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users