आठवे न कुठल्या जन्मी एवढी उधारी केली....

Submitted by profspd on 15 May, 2014 - 08:09

आठवे न कुठल्या जन्मी एवढी उधारी केली....
या जन्मामध्ये नुसती मी वेठबिगारी केली!

यामुळेच आहे तेथे जेथे मी पूर्वी होतो....
ते कुठच्या कोठे गेले, ज्यांनी लाचारी केली!

श्रीमंत ढेकरा देतो, कोरीत दात वर बसतो...
गरिबांनी पोटासाठी बघ मारामारी केली!

जा कुठल्याही रस्त्यांवर, थांबेच टोलनाक्यांचे....
बघ, सनदशीर मार्गाने चोरांची बारी केली!

रांगाच लावण्यामध्ये आयुष्य उभे गेलेले....
त्यांचेच लागले नंबर, ज्यांनीच हुशारी केली!

आता होवो काहीही, जगण्याचा झाला निर्णय...
जीवना, सर्व गोष्टींची मानसिक तयारी केली!

वय उतार होता माझे, सोडली साथ दाढांनी...
तंबाखू चालू, बंदच मी पान-सुपारी केली!

वाढता व्यसन दारूचे मी शक्कल अशी लढवली....
तिन्हिसांज रोजची माझी साजरी दुपारी केली!

श्वासात गझल भिनलेली, आयुष्य गझलमय झाले!
गझलेचा वारकरी मी, गझलांची वारी केली!!

-------प्रा.सतीश देवपूरकर
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा सर ही गझलांची वारी आवडली बरका Happy

यामुळेच (शेर दुसरा) <<<< म्हणजे नक्की कशामुळे हा भाग शेरात अव्यक्त राहिला बहुतेक.. हा शब्द अनिवार्य असेल तर मला शेर बहुधा समजला नसावा

छान