अभिनंदन [सचित्र ]

Submitted by प्रभा on 14 May, 2014 - 09:10

बंगलोरला पाकक्रुती स्पर्धा आयोजित केली होती. इनोवेटिव्ह, हेल्दी स्वीट डिश'' अशी थीम होती. लहान मुलांना आवडतील असे पदार्थ बनवायचे होते. त्या स्पर्धेत आमची कन्या-- स्वप्ना- हिला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. तिने मायबोलीत प्रसिद्ध झालेले--; गाजराच्या किसाचे गाजर व बर्फी, खव्याचा पेरु, खोबर्याच्या किसाची कलिंगडाची फोड व आंब्याच्या पल्पचा आंबा '' अशी डिश बनवली होती.
मुलांना सांभाळुन एवढ्या चिकाटीने तिने ही डिश बनवली. कौतुकास्पद आहे.. परिक्षकांनाहि ही डिश खुप आवडली.
हार्दीक अभिनंदन.

विषय: 
प्रांत/गाव: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला फोटोच तन्त्र अजुन जमलेल नाही. याआधी सुमेधा [सून] करायची हे काम. पण आता ती पण जपानला गेली आहे. फोटो आहे. बघते कसे टाकायचे ते. प्रयत्न करेल नक्की.

एक नंबर!!!!!!

अभिनंदन Happy

हेडरमध्ये द्या ना फोटो Happy इथे प्रतिसादात दिलाय तसाच द्यायचा हेडरमध्ये
प्रतिसादातली लिंक कॉपी करून हेडर मध्ये टाका Happy

मला कलिंगड खुप आवडलं Happy